मुंबई येथे उद्योजक मानसिंग खोराटे आयोजित जनसंवाद मेळाव्याला उस्फूर्त प्रतिसाद….
मुंबई.- प्रतिनिधी.
चंदगड विधानसभेच्या रिंगणात उतरलेले उद्योजक मानसिंग खोराटे यांनी रविवारी, दि.१ सप्टेंबर रोजी मुंबई येथील श्रमिक जिमखाना मैदान, लोअर परेल याठिकाणी जनसंवाद मेळाव्याचे आयोजन केले होते. खोराटे यांनी चंदगड विधानसभा कोणत्याही परिस्थितीत लढवून राखायची या ईर्षेने कामाला लागल्याचे दिसून येत आहेत. त्याचाच भाग म्हणून त्यांनी मुंबई याठिकाणी कामानिमित्त स्थायिक असणाऱ्या चंदगड- आजरा – गडहिंग्लज येथील मुंबई रहिवासी यांना जनसंवाद मेळाव्यातून एकत्रित येण्याची साद घातली व त्याला मुंबई येथील स्थायिक रहिवाशांनी देखील मोठा प्रतिसाद दिला.

यावेळी श्री. खोराटे यांनी प्रयत्नांची पराकाष्टातून आणि खडतर प्रवासातून उत्कृष्ट उद्योजकता कशी मिळवली याविषयीचा त्यांनी आपला अनुभव सांगितला आणि याच अनुभवातून चंदगड तालुक्यातील दहा वर्ष बंद पडलेला दौलत साखर कारखाना यशस्वीरित्या चालवून गतवैभव प्राप्त करून दिल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच अथर्व-दौलत कारखान्याच्या माध्यमातून चंदगड विधानसभा क्षेत्रात मोफत रोजगार मेळावा, प्रोत्साहन म्हणून तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार , पूरग्रस्तांना मदत असे विविध उपक्रम राबवून सामाजिक बांधिलकी जोपासत आहेत त्याचप्रमाणे हे सर्व चांगले कार्य करत असताना सर्व स्तरावरून खोराटे आणि अथर्व-दौलत कारखान्याला राजकीय कुरघोडी करून अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा त्यांनी यावेळी आवर्जून उल्लेख केला. यातूनच या सर्व अडचणींवर सक्षमपणे मात करण्यासाठी आणि सर्व संसाधने समाविष्ट असणाऱ्या चंदगड-आजरा-गडहिंग्लज या क्षेत्राचा शाश्वत विकास करण्यासाठी २०२४ विधानसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात असल्याचे नमूद करून उपस्थित लोकांना पाठिंबा देण्यासाठी त्यांनी आवाहन केले आणि त्यावेळी उपस्थित लोकांनी टाळ्यांच्या गजरात एकमुखाने समर्थन देऊन त्यांना पाठिंबा दर्शविला.

यावेळी प्रस्ताविक राजेंद्र निकम यांनी केले तसेच उपस्थितांमध्ये ॲड.संतोष मळवीकर, ॲड.चंद्रकांत निकम, वर्षा केसरकर, सरोजनी खोराटे, सुरेश दिनकर आपके – मंडळ अध्यक्ष, लक्ष्मण मोरे, ॲड.नामदेव जाधव, दीपक येसादे त्याचप्रमाणे कोल्हापूर जिल्हा ग्रामस्थ प्रतिष्ठान मुंबईचे बाजीराव देवरकर, सुशांत मुरकुटे,संदीप रेडेकर, सतीश पाटील, प्रवीण पावले तसेच कोल्हापूर जिल्हा मित्र मंडळ मुंबई येथील रत्नाकर देसाई,आकाश सावंत, अक्षय देसाई ,राज देसाई, नामदेव हेळवाडकर, कोल्हापूर जिल्हा महिला मंडळ मुंबई येथील चेतना सावंत ,श्रुती पाटील ,सुषमा निकम, हालेवाडी ग्रामविकास मंडळाचे अविनाश आपके, सतीश आपके, विजय तानवडे,दीपक येसादे,विलास येजरे व चंदगड-आजरा-गडहिंग्लज मुंबई येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी सूत्रसंचालन संग्राम आपके यांनी केले व आभार विजय तानवडे यांनी मांडले.