🛑कोविड काळातील महिना १०००/- रुपये मानधन द्यावे आजरा नगरपंचायतला. बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने निवेदन.
🛑श्री राम सहकारी गृह तारण संस्था मर्यादीत पेरणोली या शाखेचा उद्घाटन सोहळा संपन्न.
आजरा.- प्रतिनिधी.

कोविड काळातील महिना १०००/- रुपये मानधन द्यावे आजरा नगरपंचायतला. बहुजन मुक्ती पार्टीच्या दि. २९ रोजी निवेदन देण्यात आले. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. कोविड काळामध्ये काम करण्यासंदर्भात नगरपंचायतीकडून आदेश देण्यात आले होते. त्यामुळे तेथील सर्व आशा सेविकांनी स्वतःचा जीव धोक्यात घालूनही कामाला रुजू होऊन त्यांना दिलेले काम वेळोवेळी पूर्ण केले. त्यावेळी त्यांना प्रति महिना १०००/- रुपये मानधन देण्याचे नगरपंचायतीच्या वतीने मान्य करण्यात आले होते. परंतु तसे असले तरीही त्यांना केवळ तीन महिन्यांचेच मानधन अदा करण्यात आले. आशा सेविकांनी त्यानंतरही जवळपास दहा महिने नगरपंचायतीच्या सांगण्यावरून काम केलेले आहे.

परंतु त्या कामाचा मोबदला त्यांना अद्याप देण्यात आलेला नाही याबद्दल आशा सेविकांनी अनेकदा नगरपंचायतीकडे तक्रार अर्ज केले होते. याशिवाय अनेक पक्ष व संघटनांच्या माध्यमातूनही त्यांनी केलेल्या कामाचे मानधन मागण्यासाठी आंदोलने केलेली होती. परंतु नगरपंचायतीने त्यांना दाद दिली नाही. बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने गेल्या एक महिन्यापासून या विषयाच्या संदर्भात नगरपंचायतीला निवेदने देणे स्मरणपत्रे देणे अशा प्रकारचे कार्यक्रम घेण्यात आले परंतु त्यालाही न जुमानल्यामुळे बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने एक दिवसीय धरणा प्रदर्शन तहसील कार्यालयाच्या आवारात घेण्यात आले.

यावेळी सर्व पीडित आशा सेविका उपस्थित होत्या. बहुजन मुक्ती पार्टीचे, जिल्हा युवा आघाडी अध्यक्ष किरण के के यांच्या नेतृत्वामध्ये सदर आंदोलन करण्यात आले. यावेळी राहुल मोरे, अमित सुळेकर, संदीप दाभिलकर, स्वप्निल लांजेकर, काशिनाथ मोरे, जुबेर माणगांवकर, डॉ. उल्हास त्रिरत्ने, ज्योतिबा सुतार, सौ. द्वारका कांबळे इ. कार्यकर्ते आणि मा. दिपा बुरुड, शीतल मोरबाळे, भारती माळी, लक्ष्मी कांबळे, विमल कसेकर, जबीन सोनेखान, इ. आशा सेविकांनी उपस्थित होत्या.

चौकट.
आंदोलनाची दखल घेऊन नगरपंचायतीचे अधिकारी राकेश चौगुले यांनी सद्य परिस्थितीत नगरपंचायतीजवळ पुरेसा निधी उपलब्ध नसल्याने या प्रश्नावर वरिष्ठ कार्यालयाशी संपर्क साधून लवकरात लवकर तोडगा काढू असे लिखित आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. यानंतर जर पंधरा दिवसात सदर मानधन दिले नाही तर येत्या १४ सप्टेंबर २००४ रोजी नगरपंचायतीच्या आवारात हलगी वाजवून बोंब मारो आंदोलन करण्याचा इशारा बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने देण्यात आला..
🛑श्री राम सहकारी गृह तारण संस्था मर्यादीत पेरणोली या शाखेचा उद्घाटन सोहळा संपन्न.
आजरा.- प्रतिनिधी.

श्री राम सहकारी गृह तारण संस्था मर्यादीत पेरणोली शाखेचा उद्घाटन सोहळा शनिवार दि. २४ रोजी पेरणोली. ता. आजरा येथे आजरा निवासी नायब तहसीलदार म्हाळसाकांत देसाई यांच्या हस्ते करण्यात आला. या निमित्ताने केंद्र शाळा पेरणोली मधील शिष्यवृत्ती परीक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचे तसेच मार्गदर्शक शिक्षिका सौ.कविता नाईक तसेच चेतन जाधव आय आय टी मुंबई येथे निवड, प्रणव पाटील विविध स्पर्धा परीक्षेत यश संपादन केले त्या निमित्त, संजय मोहिते यांचा सेवानिवृत्ती निमित्त वतीने असे विविध सत्कार करण्यात आले. संस्थेच्या कार्यक्रमाला आजरा ग्रामपंचायत माजी सरपंच अरुण दादा देसाई, स्वामी विवेकानंद पतसंस्था आजरा चे संचालक सुधीर बापू कुंभार, जनरल मॅनेजर अर्जुन कुंभार, सुरेश सावंत, सुरेश मिटके तसेच कर्मचारी उपस्थित होते. हिरण्यकेशी गृह तारण संस्था आजरा चे संस्थापक प्रकाश तीबिले, विघ्नहर्ता गृह तारण संस्था उत्तुर चे व्हा.चेअरमन संजीव नाईक यांनीही प्रत्यक्ष भेटून शुभेच्या दिल्या. बिद्री साखर कारखाना चेअरमन माजी आमदार के.पी.पाटील यांनी दूरध्वनी द्वारे शुभेच्या दिल्या.कार्यक्रमासाठी सर्व संचालक, सल्लागार मंडळ, पेरणोली मधील ग्रामस्थ उपस्थित होते.प्रास्ताविक लहू सावंत यांनी केले. सूत्रसंचालन, कुंडलिक नावलकर सर यांनी केले. आभार संस्थापक जयवंत येरुडकर यांनी मानले.
