🛑सांबराची शिकारप्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल
(वनविभागाकडून दोघांना अटक तर दोघे फरारी. )
🟥वेत्ये खांबलवाडीत घरफोडी.- सव्वा दोन लाखांचे दागिने लंपास.
🛑आजऱ्यातील लिंगायत गल्ली गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी निलेश निपाणी यांची निवड.
दोडामार्ग :- प्रतिनिधी.
दोडामार्ग वनपरिक्षेत्रातील तिलारी धरण क्षेत्रातील पाटये सांबराची शिकार केल्या प्रकरणी वनविभागाने दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे सांबराचे मांस आढळून आले. तर दोघेजण घटनास्थळावरून फरार झाले. ताब्यात घेण्यात आलेल्या दोघांसह अन्य फरार दोन व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर ताब्यात घेतलेल्या दोन व्यक्तींना अटक करण्यात आली असून त्यांची चौकशी सुरू आहे.
याबाबत वनविभागाने दिलेल्या माहितीनुसार, दोडामार्ग वनपरिक्षेत्रातील तिलारी धरण क्षेत्रातून आत असलेल्या पाटये हददी मध्ये ४ इसम शिकारीच्या उद्देशाने गेले असल्याची गोपनीय माहिती वनरक्षक सुर्यभान गिते यांना मिळालेली होती. सदर गोपनिय माहितीच्या अनुषंगाने वनरक्षक पाटये, व वनरक्षक तपासणी नाका कोनाळ यांनी तात्काळ घटनास्थळी गेले असता सकाळी सुमारे १०.३० वा. सुमारास एका बोटीतून प्रवास करून ४ इसम धरणाच्या बोटीच्या थांब्याच्या ठिकाणी आले. सदरील बोटीची व त्यातील इसमाची तपासणी केली असता दोघेजण दुचाकीने फरार झाले व त्यातील दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले. साईनाथ प्रभाकर नाईक (रा. पाटये पुनर्वसन सासोली ता. दोडामार्ग ) व अनिल गोविंद नाईक ( रा. पाटये पुनर्वसन सासोली ता. दोडामार्ग ) अशी त्यांची नावे आहेत. तर त्यांनी दिलेल्या माहितीनुसार फरार व्यक्तींमध्ये समिर पांडुरंग गवस व त्याचा कामगार असल्याचे सांगितले. चौकशी दरम्यान मांस आढळून आले. सदरील मांस हे वन्य प्राणी सांबर याचे असलेबाबत त्या दोघांनिही कबुल केले आहे.त्यानुसार चौघां विरोधात भारतीय वन्यूजीव (संरक्षण) अधिनियम 1972 सुधारीत 2022 चे कलम 9, 39,(1) (3), 4913,51 प्रथम गुन्हा रिपोर्ट क्रमाक डब्लयू 01/2024 दिनांक 29.08.2024 अन्व्ये गुन्हा नोंद करून त्यातील दोन आरोपीना अटक केली आहे.
सदरची कारवाई उपवनसंरक्षक नवकिशोर रेडडी, यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक वनसंरक्षक वैभव बोराटे, वनक्षेत्रपाल दोडामार्ग अमित कटके, वनपाल कोनाळ किशोर जंगले, वनपाल फिरते पथक मधुकर काशिद, वनरक्षक फिरते पथक प्रमोद जगताप, वनरक्षक पाटये सुर्यभान गिते, वनरक्षक तपासणी नाका कोनाळ गणेश भोसले, वनरक्षक कोनाळ अजित कोळेकर, वाहन चालक नितिन सावंत, नितेश देसाई, मदतनीस कोनाळ यांनी पार पाडली. दरम्यान, अशा प्रकारच्या घटना घडल्यास किंवा वन्य् प्राणी शिकार, तस्क्री होत असेल तर वनविभागाच्या टोल फ्री क्रमांक 1926 वर संपर्क साधण्याचे आवाहन वनविभागाच्या वतीने करणेत आले आहे.
🟥वेत्ये खांबलवाडीत घरफोडी.- सव्वा दोन लाखांचे दागिने लंपास
सावंतवाडी :- प्रतिनिधी.
गावातील मुख्य घरात धार्मिक कार्यक्रम सुरू असताना घरात कोणी नसल्याची संधी साधत दागिन्यांसह रोकडीवर डल्ला मारण्याची घटना वेत्ये-खांबलवाडी येथे गुरुवारी दुपारी घडली. सिताराम पाटकर यांच्या घराची कौले काढून अज्ञात चोरट्याने सुमारे सव्वा दोन लाखाचे दागिने लंपास केले आहे. याबाबत पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती.
🟥याबाबत अधिक माहिती अशी की, सिताराम पाटकर कुटुंबीय गावातच असलेल्या जुन्या घरात धार्मिक कार्यक्रम असल्यामुळे गेले होते. यावेळी घरात कोणी नसल्याची संधी साधून चोरट्यांकडून हा प्रकार करण्यात आला. त्यामुळे चोरटा माहितगार असण्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. यात मंगळसूत्र, कानातले दागिने व हार असा मुद्देमाल चोरीला गेल्याची माहिती पोलीस पाटील रमेश जाधव यांनी दिली. त्यानुसार सावंतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते.



🛑आजऱ्यातील लिंगायत गल्ली गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी निलेश निपाणी यांची निवड.
आजरा.- प्रतिनिधी.

आजरा येथील लिंगायत गल्ली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी निलेश निपाणी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.
मंडळाचे हे ३४ वे वर्ष असून मंडळाच्या नुकत्यात झालेल्या बैठकीत सर्वानुमते हा निर्णय घेण्यात आला. यावेळी उपाध्यक्ष पदी शिवकुमार गुंजाटी, खजिनदार पदी अनिकेत शिंत्रे, सेक्रेटरी पदी अभिषेक रोडगी आणि अनुप चराटी, रुपेश डांग, अभिषेक हुकेरी, शेखर शेट्टी, अनुप कुरुणकर यांची सदस्यपदी निवड करण्यात आली.
मंडळाने आतापर्यंत अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविले असून यापुढे देखील अनेक समाजोपयोगी कार्यक्रम राबविण्याचे मंडळाने ठरवले आहे.