Homeकोंकण - ठाणेमुंबई-गोवा महामार्गाच्या ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल.- अभियंता सुजित सदानंद कावळे यांना...

मुंबई-गोवा महामार्गाच्या ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल.- अभियंता सुजित सदानंद कावळे यांना अटक!🟥मुंबईत सापडले घबाड.- १७ कोटींचे सोने केले जप्त.- दोन महिलांसह साथीदाराला अटक

🟥मुंबई-गोवा महामार्गाच्या ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल.- अभियंता सुजित सदानंद कावळे यांना अटक!
🟥मुंबईत सापडले घबाड.- १७ कोटींचे सोने केले जप्त.- दोन महिलांसह साथीदाराला अटक

अलिबाग :- प्रतिनिधी.

मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरी करणाच्या इंदापूर ते वडपाले या २६.७ कि.मी. अंतराचा महामार्गाचे चौपदीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे केल्यामुळे या कामाच्या ठेकेदाराविरुद्ध माणगाव पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकल्प समन्वयक अभियंता सुजित सदानंद कावळे यांना अटक करण्यात आली आहे.


महामार्गाचेनिकृष्ठ काम केल्याप्रकरणी मे. चेतक एंटरप्रायझेस लिमीटेड (मे. चेतक अॅप्को (जेव्ही)) (कॉन्ट्रॅक्टर), ५०१, नमन सेंटर, सी-३१, जी ब्लॉक, बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स, बांद्रा (पश्चिम), मुंबई-५१ या कंपनीचे व्यवस्थापकिय संचालक हुकमीचंद जैन, जनरल मॅनेजर अवधेश कुमार सिंह, प्रकल्प समन्वयक अभियंता सुजित सदानंद कावळे व कंपनीच्या इतर जबाबदार व्यक्ती यांच्या विरुध्द प्रकल्प अभियंता, राष्ट्रीय महामार्ग यांनी तक्रारी केली होती. त्यानुसार माणगाव पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहीता कलम १०५,१२५ (अ) (ब) व ३ (५) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. कंपनीने महामार्गाच्या रुंदीकरण व आधुनिकी करणाचे काम सुरु केले. परंतू त्यांनी हे काम मुदतीत पूर्ण न करता दर्जाहिन काम केले.


दर्जाहिन कामामुळे व अपूर्ण असलेल्या कामाच्या ठिकाणी महामार्गास खड्डे पडले. काम पूर्ण झालेल्या ठिकाणी आवश्यक त्या सुरक्षा उपाययोजना त्यामध्ये थर्मोप्लास्टीक पेंट (पांढ-या पट्टया), कॅट आईज, डेलीनेटर, वाहन चालकांच्या माहितीसाठीचे माहिती, सूचना फलक लावणे, अनधिकृत रस्ते दुभाजक बंद करणे आवश्यक होते. हे काम केले नाही. त्यामुळे या महामार्गावर अपघात होऊन होऊ लागले. २०२० पासून एकूण १७० मोटार अपघात झाले. त्यामध्ये एकूण ९७ प्रवाशांच्या मृत्यूस झाला. २०८ प्रवाशी जखमी झाले. त्याचप्रमाणे वाहनाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे या ठेकदार कंपनी विरुद्द मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील अधिक तपास रायगडचे पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक बेलदार करीत आहेत.

🟥मुंबईत सापडले घबाड.- १७ कोटींचे सोने केले जप्त.- दोन महिलांसह साथीदाराला अटक

मुंबई :- प्रतिनिधी.

तस्करीतील 17 कोटींचे सोने बाळगणाऱ्या तिघांना या कारवाईत अटक करण्यात आली आहे. त्यात दोन महिलांचा समावेश आहे. मुंबई सेंट्रल येथे महसुल गुप्तवार्ता संचालनालयाने (डीआरआय) केलेल्या कारवाईत तस्करीतील सोने लपवण्यासाठी जाणाऱ्या तिघांना अटक करण्यात आली. या आरोपींकडून 23 किलो सोने हस्तगत करण्यात आले आहे. बाजारातील किंमत सुमारे 17 कोटींच्या घरात आहे. गिरगाव फणसवाडी येथून मुंबई सेंट्रल येथे सोने घेऊन जात असताना आरोपींना अटक करण्यात आली. याप्रकरणी आणखी एका आरोपीचा सहभाग उघड झाला आहे.


🛑आरोपी सोने लपवण्याच्या तयारीत होते. त्यासाठी त्यांनी सर्व योजना आखली होती. त्याअगोदरच त्यांच्यावर कारवाई झाली. हे तिघेही फणसवाडी येथून सोने घेऊन मुंबई सेट्रल येथील घरी ठेवण्यासाठी घेऊन जात होते. त्याबाबतची माहिती डीआरआयला मिळाली. त्यानुसार डीआरआयने सापळा रचला. तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडील बॅगेच्या झडतीत 22.89 किलोग्रॅम तस्करी केलेले सोने सापडले. याशिवाय तस्करी केलेल्या सोन्याच्या विक्रीच्या उत्पन्नाचे 40 लाख रुपये घरात लपवले होते. ती रक्कमही हस्तगत करण्यात आली.

जप्त करण्यात आलेल्या सोन्याची किंमत 16 कोटी 91 लाख रुपये आहे. आरोपींविरोधात सीमा शुल्क कायदा, 1962 च्या तरतुदी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आली आहे. तिघांना पण अटक करण्यात आली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.