Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रआजरा अर्बन बँकेच्या ३४ व्या कल्याण शाखेचा उदघाटन सोहळा उत्साहात संपन्न.

आजरा अर्बन बँकेच्या ३४ व्या कल्याण शाखेचा उदघाटन सोहळा उत्साहात संपन्न.

आजरा अर्बन बँकेच्या ३४ व्या कल्याण शाखेचा उदघाटन सोहळा उत्साहात संपन्न.

आजरा.- प्रतिनिधी.

Oplus_0

मल्टी स्टेट दर्जा प्राप्त केलेली देशातील २१ वी नॉन शेड्यूल्ड नागरी सहकारी बँक व शेड्यूल्ड दर्जाकडे वाटचाल असलेल्या दि आजरा अर्बन को-ऑप. बँक लि., आजरा (मल्टी-स्टेट) या बँकेच्या ३४ व्या कल्याण शाखेचे बुधवार दि. २८/०८/२०२४ रोजी मोरेश्वर श्रीराम भोईर माजी उपमहापौर कल्याण डोंबिवली महानगरपालिका, उपाध्यक्ष भाजपा कल्याण यांचे शुभहस्ते उद्घाटन सोहळा पार पडला, कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी बँकेचे चेअरमन रमेश गुरुलिंगआप्पा कुरुणकर होते त अशोकअण्णा का. चराटी प्रमुख, अण्णा भाऊ संस्था समूह व संचालक, उपाध्यक्ष, भाजपा कोल्हापूर जिल्हा संतोष डावखरसो बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, सीईओ मे, डावखर इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. कल्याण व शिवाजी पाटीलसो अध्यक्ष, भारतीय जनता माथाडी जनरल कामगार (रजि.) प्रमुख उपस्थिती होते.
उदघाटन प्रसंगी अण्णा भाऊ संस्था समूह प्रमूख व बँकेचे संचालक अशोकअण्णा चराटी यांनी बँकेच्या स्थापने पासूनची माहिती दिली. तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे आपल्या बँकेकडे महिलांच्या खात्यावर २१ लाख २४ हजार इतकी रक्कम जमा झाली असून या योजनेच्या सर्व सुविधा आपल्या बँकेकडे असून त्याचा सर्व ग्राहकांनी लाभ घ्यावा अशी विनंती केली. तसेच भविष्यात पनवेल शाखा सुरू करण्याबाबत प्रयत्न करणार असलेचे सांगितले.
माजी उपमहापौर कल्याण डोंबिवली महानगरपालिका, उपाध्यक्ष भाजपा कल्याण मोरेश्वर श्रीराम भोईरसो यांनी आपल्या भाषणात बँकेच्या प्रगतीचा उल्लेख केला असून आजरा बँकेच्या कल्याण शाखेमुळे आपल्या परिसराचा नकीच आर्थिक विकास होईल असे मत व्यक्त केले. भारतीय जनता माथाडी जनरल कामगार चे अध्यक्ष शिवाजी पाटील यांनी आपल्या भाषणामध्ये वसई-विरार भागामध्ये बँकेची शाखा काढावी त्याकरिता लागणारे सर्वतोपरी प्रयत्न आम्ही करू असे संगितले
तसेच बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत गंभीर यांनी बँकेत आधुनिक अशा FCO कार्य प्रणालीच्या माध्यमातून सेव्हिंग खाती उघडण्याबाबतची व केंद्र शासनाची PMFME (सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग) व PMEGP व राज्य शासनाची अण्णासाहेब पाटील महामंडळ कर्ज योजना, मोबाईल बैंकिंग, Google Pay, PhonePe, Paytm, QR Code या सुविधांची माहिती दिली.


उदघाटन प्रसंगी अण्णा भाऊ संस्था समूह प्रमूख व बँकेचे संचालक अशोकअण्णा चराटी, चेअरमन रमेश कुरुणकर, व्हा.चेअरमन सुनिल मगदुम व सुरेश डांग, विलास नाईक, डॉ. दीपक सातोसकर, डॉ. अनिल देशपांडे,
किशोर भुसारी, बसवराज महाळंक,मारुती मोरे, आनंदा फडके, सौ. प्रणिता केसरकर, श्रीमती शैला टोपले, सौ.अस्मिता सबनिस, सुर्यकांत भोईटे, किरण पाटील, संजय चव्हाण, अॅड. सचिन इंजल, मनोहर कावेरी, जयवंत खराडे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत गंभीर तसेच परिसरातील प्रतिष्ठित मंडळी व मान्यवर उपस्थित होते.


बँकेचे चेअरमन रमेश कुरुणकरसो यांनी बँकेचा पूर्ण आढावा घेवून सर्व उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक केले. त्यानंतर मान्यवरांचे यथोचित सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन बँकेचे सहाय्यक सरव्यवस्थापक तानाजी गोईलकर यांनी केले तर आभार व समारोप बँकेचे संचालक विलास नाईक यांनी मानले.

Previous article
Next article
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.