🛑मंबईत गिरणी कामगारांना हक्कचे घर मिळाले पाहीजे.- काॅ.- शांताराम पाटील.
🛑खाजगी बसच्या प्रवासात महिला प्रवाशाला साडेपाच लाखाच्या सोन्याचा गंडा.
आजरा.- प्रतिनिधी.

देवर्डे ता. आजरा येथील सौ. शितल दिलीप पाटील या महिलेचे
मुंबई ते आजरा खाजगी प्रवासी बसमधून प्रवासादरम्यान महिलेचे ५ लाख ३१ हजारांचे दागिने व ५ हजारांची रोकड चोरट्यांनी लंपास केली असून. याबाबतची फिर्याद सौ. पाटील यांनी आजरा पोलीस ठाण्यात दिली आहे. या घटनेमुळे खाजगी प्रवासी बसमधील प्रवाशांच्या मौल्यवान वस्तू व साहित्याच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून प्रवासी वर्गात खळबळ उडाली आहे. याबाबत पोलीसातून मिळालेली माहिती अशी, रक्षाबंधनासाठी गेलेल्या सौ. पाटील या पतीसह दि. २५ रोजी लोअर परेल, मुंबई येथून रक्षाबंधन आटोपून स्वामी ट्रॅव्हल्स या खाजगी वाहतूक कंपनीच्या ट्रॅव्हल्सने आजरा येथे येण्यासाठी निघाल्या. दि. २६ रोजी सकाळी ७.३० वाजता त्या आजरा येथे पोहोचल्यानंतर त्यांना आपल्या पर्समधील ५ तोळयाचे गंठण व दीड तोळ्याचा नेकलेस, एक तोळे वजनाची सोन्याची चेन असे ५ लाख ३१ हजारांचे दागिने व ५ हजारांची रोकड चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. त्यांनी याबाबत आजरा पोलीसात फिर्याद दिली असून अज्ञात चोरटयाविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे
सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश यमगर यांच्यासहाय्यक मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संजय पाटील पुढील तपास करीत आहेत.

🛑मंबईत गिरणी कामगारांना हक्कचे घर मिळाले पाहीजे काॅ.शांताराम पाटील.
आजरा .- प्रतिनिधी.

गिरणीकामगारना मुंबई बाहेर दिल्या जाणाऱ्या घराचा जी आर रद्द करून, शासनाने मंबईत गिरणी कामगारांना हक्कची घरे देवून पुनर्वसन करावे असे आवाहन काॅ. शांताराम पाटील यानी गिरणीकामगाराच्या बैठकीत केले. प्रास्ताविक नारायण भंडागे यांनी केले.
काॅ. शांताराम पाटील यांनी पुढे बोलताना म्हणाले गिरणीकामगार आज नाही उद्या घर मिळेल, या आशेवर जगत आहेत तर बहुतांश गिरणीकामगार मृत्यू मुखी पडले आहेत . त्याच्या वारसांना व कामगारांना वेळेत घरे मिळण्याबाबत शासनाने तातडीने निर्णय घ्यावा. तसेच आमदार प्रकाश आबिटकर यांनी लावलेल्या गारगोटी कुर येथील मेळाव्यात आमदार सुनिल राणे यांनी मुंबई एनटीशीच्या जागेत गिरणीकामगारना घरे देण्याचे आश्वासन दिले होते. अध्याप पर्यंत कोणतीही हालचाल नाही तसेच शासनाने ही ठोस निर्णय घेतलेला नाही त्यामुळे पुढील काळात तिव्र आंदोलन करण्याचा निर्णय बैठकीत करण्यात आला. यावेळी महादेव होडगे यांनी मत व्यक्त केले, यावेळी दौलती राणे, जानबा धडाम, आबा पाटील, शांताराम हारेर, मनप्पा बोलके, आनंदा ठोकरे, नंदा वाकर, सत्यवती शेटगे, लक्ष्मण पाटील, काका देसाई ,तुकाराम कासार, मारूती मुरूकटे याच्या सह तालुक्यातील गिरणीकामगार प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते, आभार हिंदूराव कांबळे यांनी मांनले.
