भाजप आजरा ता. उपाध्यक्ष संदीप पाटील यांचा सत्कार.
( हनुमान पतसंस्था, हनुमान डेअरी यांची वार्षिक सर्वसाधारण सभेत गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न.)
आजरा.- प्रतिनिधी.
मौजे मडिलगे ता. आजरा येथील हनुमान पतसंस्था, हनुमान डेअरी यांची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत संपन्न झाली. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी दूध उत्पादक सभासद व पतसंस्थेचे सभासद आजरा तालुका भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष संदीप पाटील यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा या सर्वसाधारण सभेत संस्थेच्या व डेरी च्या वतीने सत्कार करण्यात आला.

यावेळी संस्थापक अध्यक्ष कृष्णा येसने, तसेच संचालक मंडळ गणपती पाटील, महादेव पाटील, शिवाजी कडगावाकर, पांडुरंग कातकर, रघुनाथ येसने, संभाजी निऊगरे, शामा कांबळे, दिलीप सुतार, पांडुरंग मुंज, भूषण कातकर, आंबाजी जाधव, माजी सरपंच सौ. पुस्पलता जाधव, हिराबाई येसने, शिवाजी देसाई, विनोद लकमले,सह हनुमान पतसंस्था, हनुमान डेअरी सभासद हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
