Homeकोंकण - ठाणेदहीहंडी सणाला गालबोट!- मुंबईत थरावरुन कोसळून 15 गोविंदा जखमी.- रुग्णालयात उपचार सुरु🟥मुंबई,...

दहीहंडी सणाला गालबोट!- मुंबईत थरावरुन कोसळून 15 गोविंदा जखमी.- रुग्णालयात उपचार सुरु🟥मुंबई, ठाणे, पुणे, नवीमुंबईत दहीहंडीचा उत्साह शिगेला.- दहीहंड्या फोडण्यासाठी गोविंदा पथके सज्ज🔴सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व शिवप्रेमींनी 28 रोजी उपस्थित राहण्याचे जाहिर आवाहन.- शिवसेना जिल्हाप्रमुख श्री.संदेश पारकर

🟥दहीहंडी सणाला गालबोट!- मुंबईत थरावरुन कोसळून 15 गोविंदा जखमी.- रुग्णालयात उपचार सुरु
🟥मुंबई, ठाणे, पुणे, नवीमुंबईत दहीहंडीचा उत्साह शिगेला.- दहीहंड्या फोडण्यासाठी गोविंदा पथके सज्ज
🔴सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व शिवप्रेमींनी 28 रोजी उपस्थित राहण्याचे जाहिर आवाहन.- शिवसेना जिल्हाप्रमुख श्री.संदेश पारकर

मालवण :- प्रतिनिधी.

मालवण किल्ल्यावर गेल्या वर्षीच्या डिसेंबर महिन्यात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्र आणि राज्य सरकारने घाईगडबडीने निकृष्ट बांधकाम करुन उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सोमवार दिनांक 26 ऑगस्ट रोजी जमीनदोस्त झाला. यामुळे जगभरातील तमाम शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या असुन सर्वसामान्य जनतेमध्ये केंद्र आणि राज्य सरकार विरोधात तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
याच पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेतर्फे बुधवार दि.28 ऑगस्ट 2024 रोजी मालवण तालुक्यातील भरडनाका ते मालवण तहसिल कार्यालय भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. यावेळी महाराष्ट्र विधानपरिषद विरोधीपक्ष नेते श्री.अंबादास दानवे, शिवसेना नेते माजी खासदार श्री.विनायक राऊत, शिवसेना नेते आमदार श्री.भास्कर जाधव, आमदार श्री.वैभव नाईक यांच्यासह सर्वपक्षीय नेते उपस्थित राहणार आहेत. तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तमाम शिवप्रेमींनी तसेच सर्वपक्षीय नेते आणि कार्यकर्त्यांनी मालवण भरडनाका येथे सकाळी 10 वाजता उस्फूर्तपणे उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात येत आहे.

🟥मुंबई, ठाणे, पुणे, नवीमुंबईत दहीहंडीचा उत्साह शिगेला.- दहीहंड्या फोडण्यासाठी गोविंदा पथके सज्ज

मुंबई :- प्रतिनिधी.

“गो गो गो गोविंदा”… गोविंदा रे गोपाळा, यशोदेच्या तान्ह्या बाळा…’ असा जयघोष सध्या मुंबईसह संपूर्ण ठाणे, नवी मुंबई आणि पुण्यात पाहायला मिळत आहे. मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात दहीहंडीचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही मुंबई, ठाण्यात लाखो रुपयांचे पारितोषिक असलेल्या उंचच उंच दहीहंडी बांधण्यात आल्या आहेत. तर त्यांना फोडण्यासाठी दहीहंडी पथकांमध्ये चुरस रंगणार आहे. मुंबईत दादरमधील आयडिअल, जांभोरी मैदान, घाटकोपर, आयसी कॉलनी या ठिकाणी मोठ्या दहीहंडी पाहायला मिळत आहे. तसेच यंदाही संस्कृती युवा प्रतिष्ठान, मनसेची दहीहंडी, टेंबी नाका, स्वामी प्रतिष्ठान, संकल्प प्रतिष्ठान यांच्याही हंड्या उभारण्यात आल्या आहेत. यावेळी लाखो रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे.
🟥यंदाही दहीहंडी महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रक मंडळाच्या माध्यमातून आयोजित करण्यात आली आहे. पर्यावरण विषयावरील पथनाट्यही इथे सादर करण्यात येणार आहे. आयडियल बुक डेपो चौकात सेलिब्रेटी हंडी आयोजित करण्यात आली आहे. या ठिकाणी महिला दहीहंडी, अंध व्यक्तींची दहीहंडी, दिव्यांगांची दहीहंडी होणार आहे. मुंबईतील वरळी येथील जांभोरी मैदानात यंदा दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. भाजपचे नेते संतोष पांडे यांच्या वतीने परिवर्तन दहीहंडी आयोजित करण्यात आली आहे. परिवर्तन दहीहंडी उत्सवात “अफजलखान वध” हा देखावा विशेष आकर्षण ठरणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार हे उपस्थित राहणार आहेत.
🔴बोरिवली माघाठणे परिसरात प्रकाश सुर्वे यांची दहीहंडी आयोजित करण्यात आली आहे. यात लाखो रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले आहे. या दहीहंडीसाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कलाकार विकी कौशल, गोविंदा, करिष्मा कपूर, अमृता खानविलकर, नृत्यकलाकार गौतमी पाटील, राधा पाटील यांसह विविध सेलिब्रेटी हजेरी लावणार आहेत. घाटकोपरमध्ये राम कदम यांनी दहीहंडी आयोजित करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री उदय सामंत, रोहित शेट्टी, सलमान खान, विकी कौशल- कटरीना कैफ, शक्ती कपूर, असराणी, जितेंद्र, जया प्रधा, गणेश आचर्य, टेरेंस लुईस, रेमो फर्नांडिस, सलीम सुलेमान, दानीश गायक, फुकरे टीम, गदर टीम हे कलाकार उपस्थित राहणार आहेत. घाटकोपरमध्ये राष्ट्रवादीच्या वतीनेही दहीहंडी आयोजित करण्यात आली आहे. या दहीहंडीला जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड आणि राष्ट्रवादीचे अनेक नेते उपस्थित राहतील. या हंडीत महिला आणि अंध मुलांचे पथक हंडी फोडणार आहे.
🅾️भाजप आणि शिवराज प्रतिष्ठान मार्फत प्रवीण दरेकर यांनी दहीहंडीचे आयोजन करण्यात आले आहे. केंद्रीय मंत्री पियुष गोयल, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेते उपस्थित असणार आहेत. प्रताप सरनाईक यांनी यंदाही संस्कृती युवा प्रतिष्ठानतर्फे प्रो गोविंदाचे आयोजन केलं आहे. या ठिकाणी विश्वविक्रम करणाऱ्या पथकाला 11 लाख रुपये दिले जाणार आहेत. संस्कृती युवा प्रतिष्ठानच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हजर असणार आहेत. मनसेतर्फे ठाण्यात दहीहंडीचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 9.30 जय जवान गोविंदा मंडळ आणि शिवसाई गोविंदा पथक 9 थर रचणार आहे. जय जवान गोविंदा पथकाकडून 10 थर रचून विश्वविक्रम करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. 10 थर लावणाऱ्या गोविंदा पथकाला 11 लाखांच पारितोषिक दिलं जाणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दहीहंडी म्हणून ही हंडी प्रसिद्ध आहे. या दहीहंडीला एकनाथ शिंदे उपस्थित राहणार आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अवधूत गुप्ते आणि इतर सेलिब्रिटी या दहीहंडी उत्सवात सहभागी होणार आहेत.

🟥दहीहंडी सणाला गालबोट!- मुंबईत थरावरुन कोसळून 15 गोविंदा जखमी.- रुग्णालयात उपचार सुरु

मुंबई :- प्रतिनिधी.

मुंबईसह महाराष्ट्रात दहीहंडीचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. मुंबई, ठाणे परिसरात लाखो रुपयांचे पारितोषिक असलेल्या उंचच उंच दहीहंडी फोडण्यासाठी पथकांमध्ये चुरस रंगली आहे.मुंबईत जल्लोषात दहीहंडीचा उत्साह सुरु असताना दुसरीकडे थरावरुन कोसळल्याने काही गोविंदा जखमी झाले आहेत. त्यामुळे दहीहंडी सणाला गालबोट लागले आहे. मुंबईत आतापर्यंत 15 गोविंदा जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे.

🔴मुंबई महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत दुपारी 12 वाजेपर्यंत विविध पथकातील 15 गोविंदा जखमी झाले आहे. या सर्व गोविंदांवर महापालिकेच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यात मुंबईतील केईएम रुग्णालयात 1, नायर रुग्णालयात 4, सायन रुग्णालयात 2, सेंट जॉर्ज हॉस्पिटलध्ये 1, पोद्दारमध्ये 4, राजावाडीमध्ये 1, एमटी अगरवार रुग्णालयात 1 आणि कुर्ला भाभा रुग्णालयात एका रुग्णावर उपचार सुरु आहेत.या सर्व जखमी गोविंदांवर ओपीडीमध्ये उपचार सुरू आहेत. सुदैवाने यातील कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही. सध्या या सर्व गोविंदांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मुंबई महापालिकेने दिली आहे.

जखमी गोविंदांसाठी मुंबईतील रुग्णालये सज्ज.

🟥दरवर्षी दहीहंडी फोडताना मोठ्या प्रमाणात गोविंदा जखमी होतात. या गोविंदांना तातडीने वैद्यकीय उपचार मिळावेत यासाठी मुंबईतील राज्य सरकारबरोबरच महानगरपालिकेची रुग्णालये सज्ज ठेवण्यात आली आहेत. गेल्या दोन वर्षांत जखमी गोविंदांची संख्या 200 वर पोहचली आहे.तरुण गोविंदा मोठ्या प्रमाणात जखमी होत असल्याने व त्यांना तातडीने वैद्यकीय उपचार मिळावेत यासाठी मुंबईतील राज्य सरकारच्या तसेच महानगरपालिकेची केईएम, शीव, नायर व कूपर ही रुग्णालये सज्ज झाली आहेत. नायर रुग्णालयामध्ये ट्रॉमा, शल्यचिकित्सा विभाग आणि अस्थिव्यंगशल्य चिकित्सा विभागात जखमी गोविंदांसाठी 8 ते 10 खाटा राखीव ठेवण्यात आल्या असून, आवश्यक सर्व औषधांचा साठा उपलब्ध करण्यात आल्याचे नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर मेढेकर यांनी सांगितले.
🟥दरम्यान मुंबईत दादरमधील आयडिअल, जांभोरी मैदान, घाटकोपर, आयसी कॉलनी या ठिकाणी मोठ्या दहीहंडी पाहायला मिळत आहे. तसेच यंदाही संस्कृती युवा प्रतिष्ठान, मनसेची दहीहंडी, टेंबी नाका, स्वामी प्रतिष्ठान, संकल्प प्रतिष्ठान यांच्याही हंड्या उभारण्यात आल्या आहेत. यावेळी लाखो रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे.
🔴मुंबई आणि ठाण्यात जवळपास 1 हजार 354 दहीहंडी उत्सवांचं आयोजन करण्यात आलं आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही मुंबई, ठाण्यात लाखो रुपयांचे पारितोषिक जाहीर करण्यात आली आहेत. यावेळी गिनीज बुक वर्ल्ड रेकॉर्ड मोडणाऱ्या गोविंदा पथकाला 25 लाखांचे बक्षीस दिले जाणार आहे. तर ठाण्यात टेंभी नाक्याला मुख्यमंत्री शिंदेंची दहीहंडी असून बक्षिसाची रक्कम पुरुषांसाठी 1 लाख 51 हजार, महिलांसाठी 1 लाख आहे. त्याशिवाय प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडीत 1 लाख रुपयाच्या बक्षीसाची घोषणा करण्यात आली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.