कोल्हापूरात शियेत १० वर्षीय चिमुकलीचा खून.-
दोन संशयीतांना अटक .
कोलकत्ता बदलापूर ची घटना ताजी असताना कोल्हापुरात.- नवी घटना.
कोल्हापूर.- प्रतिनिधी.

कोलकत्ता तसेच बदलापूर येथील घटना ताजी असताना
कोल्हापूर येथील शिये रामनगर येथे शेतामध्ये एका अल्पवयीन मुलीचा संशयास्पद मृत्यू झाला. असून हा मृतदेह कोल्हापूर पोलिसांना आढळून आला.
ही मुलगी पर प्रांतीय असून ती आपल्या कुटुंबा समवेत शिये रामनगर येथे राहत होती.
२१ऑगस्ट च्या संध्याकाळी पासून मुलगी बाहेर गेली होती. याच दरम्यान ती बेपत्ता झाली होती.बेपत्ता झालेल्या मुलीचा शोध घेण्यासाठी तिच्या कुटुंबियानी आजू बाजूच्या परिसरात शोध घेतला मात्र त्यांच्या हाती काहीच लागले नाही.
यानंतर
मुलगी बेपत्ता झाले बाबतची फिर्याद तिच्या कुटुंबियांनी पोलीस ठाणे येथे दाखल केली होती.
दाखल केलेल्या फिर्यादी नुसार पोलिसांनी
काल रात्री पासून च शोध घेण्यास सुरुवात केली होती.
मात्र काल २२ ऑगस्ट रोजी १ च्या सुमारास त्या मुलगीचा मृतदेह एका हॉटेल शेजारी शेतात आढळून आला. यावेळी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित आणि फॉरेन्सिक ची टीम घटना स्थळी दाखल झाले होते. या घटने बाबत ची माहिती देताना पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित म्हणाले कि, या गुन्ह्याशी संबंधित काही सीसी टीव्ही फुटेज हाती लागले असल्याचे सांगितलं आहे.सदर घटनेची नोंद शिरोली पोलीस ठाणे येथे झाली असून पुढील तपास शिरोली पोलीस करत आहेत.