Homeकोंकण - ठाणेबदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या घराची तोडफोड- तर 26 ऑगस्टपर्यंत अक्षय शिंदेला...

बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या घराची तोडफोड- तर 26 ऑगस्टपर्यंत अक्षय शिंदेला पोलीस कोठडीची सुनावणी🛑ट्रॅव्हल्स मालकांचा मनमानी कारभार थांबवा.- गणेश उत्सव काळात योग्य दर असावा. आजरा उबाठा.- शिवसेनेचे तहसीलदारांना निवेदन.🛑आम्हाला तुमचे पैसे नको.- मुलांना मोफत शिक्षण व महिलांना संरक्षण द्या.- आजऱ्यात महिलांची निषेध रॅली.

🛑बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या घराची तोडफोड- तर 26 ऑगस्टपर्यंत अक्षय शिंदेला पोलीस कोठडीची सुनावणी
🛑ट्रॅव्हल्स मालकांचा मनमानी कारभार थांबवा.- गणेश उत्सव काळात योग्य दर असावा. आजरा उबाठा.- शिवसेनेचे तहसीलदारांना निवेदन.
🛑आम्हाला तुमचे पैसे नको.- मुलांना मोफत शिक्षण व महिलांना संरक्षण द्या.- आजऱ्यात महिलांची निषेध रॅली.

आजरा.- प्रतिनिधी.

Oplus_131074

आम्हाला तुमचे पैसे नको मुलांना मोफत शिक्षण व महिलांना संरक्षण द्या. आजऱ्यात महिलांची निषेध रॅली या रॅलीत महिला दक्षता समिती आजरा व अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा आजरा, ग्राहक पंचायत महाराष्ट्र, सर्व श्रमिक संघटना यांच्या वतीने
कोलकत्ता येथील आर जी कार मेडिकल कॉलेज व हॉस्पिटल मध्ये झालेल्या निवासी महिला डॉक्टरची लैंगिक अत्याचार करून केलेली निर्गुण हत्येच्या निषेधार्थ तसेच बदलापूर येथील तीन चार वर्षाच्या दोन अजान बालिकेवर झालेल्या लैंगिक छळाच्या विरोधात निषेध व्यक्त करण्यात आला. दोन्ही घटना माणूसकीला काळीमा लावणार्या आहेत. संबंधित आरोपीची चौकशी होवुन लवकरच कार्यवाही व्हावी. या देशातील लहान बालिका पासून सर्व श्रेत्रातील स्त्रिया सुरक्षित नाहीत. याचा गांभीर्याने विचार व्हावा. यासाठी आज दि. २२ रोजी छत्रपती शिवाजी महाराज मूर्ती पासून तहसीलदार कार्यालय पर्यंत या निषेध रॅली मधून काढून निषेध व्यक्त केला. महिलांनी घोषणांनी परिसर दणाणून सोडला यावेळी गीता पोतदार यांनी विविध मागण्या केल्या यामध्ये महिला अत्याचार विरोधात कडक काय‌द्याची अमलबजावणी करा, पोक्सो कायदा कडक करा., पार्न वर बंदी घाला. यावेळी डॉ. स्मिता कुंभार, प्रा. शुभांगी सावंत, माजी नगराध्यक्षा ज्योत्स्ना चराटी, माजी सभापती रचना होलम, छाया तिप्पट, तसेच विद्यार्थिनी लावण्या शिरपूरकर, समीक्षा कांबळे यांनी झालेल्या घटनेचा निषेध व्यक्त करत महिला संरक्षणाबाबत प्रश्न उपस्थित करत आपल्या मनोगतातून विविध मागणी केल्या.
यावेळी आजरा सपोनि नागेश यमगर, व मंडळ अधिकारी अनंत चौगुले यांनी निवेदन स्वीकारले.
यावेळी माजी नगरसेविका सुमैय्या खेडेकर, तसेच सौ. धनश्री देसाई, अनुसया पाटील, कल्याणी सरदेसाई डॉ. अंजली देशपांडे, प्रा. धामणेकर, पद्मजा पिळणकर, भैरवी सावंत, गायत्री पाटील, तसेच मुकुंदराव देसाई, शांताराम पाटील, शिवाजी गुरव, काशिनाथ मोरे, संजय घाटगे, सुधीर सुपल, प्रभाकर कोरवी, आनंदा घंटे, मानसिंग देसाई, सह विद्यार्थी, विद्यार्थिनी सह महिला सामाजिक कार्यकर्ते विविध पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

🛑ट्रॅव्हल्स मालकांचा मनमानी कारभार थांबवा.- गणेश उत्सव काळात योग्य दर असावा. आजरा उबाठा.- शिवसेनेचे तहसीलदारांना निवेदन.

आजरा.- प्रतिनिधी.

गणेश उत्सव काळात येणाऱ्या चाकरमान्यांना अधिक तिकीट दर लावून प्रवाशांची लूट होत ही थांबावी व योग्य असा तिकीट दर घ्यावा. याबाबत आजरा तहसीलदार यांना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या आजरा तालुक्याच्या वतीने निवेदन देण्यात आले. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.‌
आजरा ते मुंबई व मुंबई ते आजरा ये जा करणाऱ्या सर्व ट्रॅव्हल्स मालकांनी सालाबाद प्रमाणे यावर्षीही गणेशोत्सवाच्या काळात तिकिटांचे दर भरमसाठ वाढवले आहेत. साधारणतः शीट चार्ज सहाशे रुपये आणि स्लीपर कोचला आठशे रुपये तिकीट दर असताना त्यांनी ते दर अचानक वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्या संदर्भात त्यांनी कुणाशीही पत्र व्यवहार केलेला नसून ते ट्रॅव्हल्स मालक मनमर्जी कारभार करत आहेत. आणि अव्वाच्या सव्वा दर आकारून मुंबईतील चाकरमान्यांच्या खिशाला कात्री लावण्याचं काम करत आहेत. ज्यांच्या जीवावर हे महाशय वर्षभर आपला धंदा करतात त्याच चाकरमाण्यांचा कसलाही विचार न करता त्यांचाच खिसा रिकामा करण्याचं षडयंत्र रचत आहेत. आणि हे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आजरा तालुका कोणत्याही परिस्थितीत खपवून घेणार नाही, तरी आपण संबधीत ट्रॅव्हर्स गाडी मालकांना बोलावून योग्य सुचना द्यावी. असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे यावेळी.
उपजिल्हाप्रमुख संभाजी पाटील, तालुकाप्रमुख युवराज पोवार तसेच दयानंद भोपळे, शिवाजी इंगळे, कृष्णा सासुलकर
तेजस सडेकर , दिनेश कांबळे महादेव सुतार सह युवा सेना शिवसेना पदाधिकारी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.‌

🟥बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या घराची तोडफोड- तर 26 ऑगस्टपर्यंत अक्षय शिंदेला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

बदलापूर :- प्रतिनिधी.

बदलापूरमधल्या एका शाळेत दोन चिमुकल्यांवर केलेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणी पोलिसांनी शाळेत सफाई कामगार असलेल्या आरोपीला अटक केली आहे. अक्षय शिंदे असं या आरोपीचं नाव असून त्याला 26 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.दरम्यान, आरोपी अक्षय शिंदे यांच्या घराची तोडफोड करण्यात आली आहे. ज्या गावात तो राहात होता, तिथल्या त्याच्या घराची काही अज्ञात लोकांनी ही तोडफोड केली असून अक्षय शिंदेच्या कुटुंबियांनाही गावातून बाहेर काढण्यात आलं आहे. बदलापूरमधल्या खवई या गावात अक्षय शिंदेचं घर आहे. मिळालेल्या माहितीनुसार घराला बाहेर कुलूप होतं, पण लोकांनी घराच्या काचा फोडून आतल्या सामनाची तोडफोड केली.

🟣कोण आहे अक्षय शिंदे?

अक्षय शिंदे हा बदलापूरच्या आदर्श शाळेत सफाई कामगार म्हणून काम करत होता. तो 24 वर्षांचा आहे. शाळेत साफ सफाई करण्याबरोबरच लहान मुला-मुलींना स्वच्छतागृहात घेऊन जाण्याचं काम तो करत होता. मुलं अक्षयला काठिवाला दादा म्हणून ओळखायचे. कंत्राटी पद्धतीवर अक्षयला बदलापूरच्या शाळेत नोकरी मिळाली होती. आरोपी अक्षय शिंदेला 26 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत डांबण्यात आलंय. आरोपी अक्षय शिंदेचं वकीलपत्र कुणीही घेऊ नये, असं आवाहन कल्याण वकील संघटनेनं केलंय. बदलापूर लैंगिक अत्याचार खटल्यात विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आलीये. तपासातील उणिवा शोधणं हे मुख्य काम असणार आहे,असं निकम यांनी स्पष्ट केलंय.

🔴बदलापूर घटनेचे राज्यभर पडसाद

बदलापूर येथील शाळकरी चिमुरड्यांवर लैंगिक अत्याचाराचे संतप्त पडसाद राज्यभरात उमटले आहेत. राजकीय पक्षांनी ठिकठिकाणी आंदोलन केलीत. बदलापुरात सध्या तणावपर्ण शांतता आहे आणि सुरक्षेसाठी पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आलाय. सध्या बदलापुरात शाळांना सुट्टी देण्यात आलीय. इंटरनेट सेवाही बंद ठेवलीय.

🅾️एसआयटीचा तपास सुरु

बदलापूर अल्पवयीन मुली अत्याचार प्रकरणी, नेमलेल्या SIT टीमनं पीडित मुलीच्या पालकांची भेट घेतली. बदलापूरमधील एका नामांकित शाळेत 2 चिमुरडींवर अत्याचार झाला. या घटनेच्या निषेधार्थ काल पालकांनी बदलापूरमध्ये रेल रोको आंदोलन करत आरोपीला फाशी देण्याची मागणी केली. त्यानंतर याप्रकरणी SIT टीम स्थापन करण्यात आली. या टीमनं दोघींच्याही पालकांचा जबाब नोंदवला.
🟣दरम्यान, बदलापूरमध्ये निषेधाचे बॅनर लागलेत. बदलापूरमध्ये विकृत राजकारण नको अशा आशयाचे बॅनर लागलेत…बदलापूरकर म्हणून आम्ही दुर्दैवी प्रकाराचा निषेध करतो आणि त्या दुर्दैवी प्रकरणावर बदलापुरात विकृत राजकारण नको अशा आशयाचे बॅनर्स लागलेत. माय चाईल्ड इज नॉट फॉर पॉलिटीक्स असंही बॅनर्सवर लिहिण्यात आलंय.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.