🛑शेतकत्यांच्या नुकसानीना व मानसिक त्रासाला कोण जबाबदार.- भूमि अभिलेख कारभाराच्या विरोधात आजरा तहसील कार्यासमोर बेमुदत आंदोलन.
🛑आजरा – अक्कलकोट नवीन बस सेवा चालू करणे बाबत.- आजरा अन्याय निवारण समितीचे निवेदन.
आजरा.- प्रतिनिधी.
आजरा – अक्कलकोट नवीन बस सेवा चालू करणे बाबत. अन्याय निवारण समिती आजरा यांनी
विभाग नियंत्रक राज्य परिवहन मंडळ कोल्हापूर विभाग
आगार व्यवस्थापक राज्य परिवहन मंडळ, आजरा निवेदन दिले आहे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. आजरा तालुक्यातील जास्तीत जास्त नागरिक , प्रवासी हे श्री स्वामी समर्थाचे व विठ्ठलाचे भक्त आहेत. तरी त्यांना श्री स्वामी समर्थ याच्या अक्कलकोट येथे व पंढरपूर येथे जाणे करिता आपल्या आगारातून कोणतीही सरळ गाडीची सोय नाही आहे. त्यामुळे श्री स्वामी समर्थ भक्तांना अक्कलकोट येथे व वारकरी लोकांना जाणे करिता आजरा – कोल्हापूर-सोलापूर-अक्कलकोट असा टप्प्या टप्पाने प्रवास करावा लागतो. तरी आजरा तालुक्यातील भक्तांचे सोयीसाठी आजरा येथून कोल्हापूर – मिरज – पंढरपूर – अक्कलकोट अशी नवीन बस सेवा चालू करणेबाबत निवेदना अन्वये आपलेकडे विनंती करणेत येत आहे . सदर गाडी आजरा – कोल्हापूर – मिरज – पंढरपूर – अक्कलकोट व परत येणेसाठी अक्कलकोट ते आजरा अशी बस सेवा राज्य परिवहन मंडळ व भक्तांचे सोयीनुसार असावी.” तसेच रवळनाथ कॉलनी गल्ली क्रं १ या ठिकाणी एसटी बस थांबा करावा, म्हणजे रवळनाथ कॉलनी, शिवकॉलनी, आयडियल कॉलनी येथील प्रवाशांची चित्री धरण व आजूबाजूचे गावांना व पेशंटना ग्रामीण रुग्णालयाकडे जाणे येणे तसेच आजरा स्टॅण्ड वर जाणे सोयीचे होणार आहे. असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे या नियोजनावर. अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष परशुराम बामणे सह समिती सदस्य नागरिकांच्या सह्या आहेत.
🛑शेतकत्यांच्या नुकसानीना व मानसिक त्रासाला कोण जबाबदार.- भूमि अभिलेख कारभाराच्या विरोधात आजरा तहसील कार्यासमोर आंदोलन.
आजरा. प्रतिनिधी.

शेतकत्यांच्या नुकसानीना व मानसिक त्रासाला कोण जबाबदार याबाबत अन्यायग्रस्त शेतकरी आजरा तहसील कार्यासमोर शंकर पांडुरंग पाटील वगैरे सहा रा. किटवडे, ता. आजरा यांनी आज दि. २० रोजी आंदोलन बसून निदर्शने केली. यापूर्वी स्थगित केलेले आंदोलन पुन्हा सुरू करत असले बाबत.
दि ८/७/२०२४ रोजी तहसील कार्यालय येथे बेमुदत धरणे बांदोलन चालू केले होते. व तात्पुरते स्थगित केले होते. सदर दिवशी तहसीलदार व उपवधीक्षक भूमी अभिलेख आजरा यांचे दरम्यान तहसिलदार यांचे दालनात आंदोलनाचे प्रतिनिधी सोबत बैठक घेऊन योग्य न्याय देणेचावत आश्वासन दिले होते. मात्र एक महिन्याच्या मुदतीनंतर आंदोलकांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम करत ११ मार्च २०२३ रोजी त्याच्या कार्यालयातीन कर्मचा-यांनी केलेली मोजणी रद्द करत असल्याचे पत्र दिले आहे.
शेतक:यांनी मोजणीचे पैसे भरले, मोजणी झाली, त्याचा नकाशा तयार झाला मात्र लगत धारक शेतकरी कृष्णा पाटील यांनी मोजणी बावत तक्रार दाखल केली म्हणून त्याच गटाची पुन्हा एकाच मोजनी कर्मचार्यांनी पट्टीच्या नात्याने मोजणी केली. यावेळी टेबलही न लावला अशी मोजणी केली व सदरचा निकाल चुकीचा दिला आहे. वास्तविक तक्रारदार कृष्णा बडू पाटील यांच्या गटाची मोजणी करून त्यांनी स्वतःच्या जमिनीची खात्री करणे योग्य होते. मात्र तसे न करता २२ एकराचा गट पुन्हा मोजणी केली त्याचे पैसे भरून घेतले त्या ऐवजी तक्रारदार कृष्णा पाटील बांच्या तीन एकराची मोजणी करणे सोपे होते पण तसे केले नाही. एकाच कार्यालयातील दोन मोजणीदार एकमेकांवर त्यांनी केलेली मोजणी चुकीची व मी केलेली मोजणी बरोबर माणत बसतील तर शेतकत्यांच्या नुकसानीना व मानसिक त्रासाला कोण जबाबदार बसा पत्र निर्माण आला आहे. मदर कर्मचारी यांची कसून अधिका-यांनी चौकशी करून त्यांच्यावर कार्यवाही व्हावी. व शेतकऱ्याचे नुकसान भरपाई मिळावी व वेगळे मोजनीदार मोजून योग्य ती मोजणी करून न्याय मिळावा वासाठी दि. २४/६/२०२४ रोजीच्या निवेदनातील आमच्या प्रमाणे न्याय मिळावा.
अन्यथावापूर्वी दि. ८/७/२०२४ रोजी चे स्थगित केलेले आंदोलन पुन्हा दि. २०/८/२०२४ पासून आंदोलन चालू केले आहे. व आंदोलनाच्या अशा मागण्या केल्या आहेत. या बेमुदत आंदोलनात कॉम्रेड शिवाजी गुरव सह शेतकरी
शंकर पाटील, सुधाकर पाटील, जयवंत पाटील, यशवंत पाटील, गावडु पाटील, अंकुश पाटील सहभागी आहेत.