Homeकोंकण - ठाणेशाळेतील २ चिमुकलींवर लैंगिक अत्याचार.- संतापाची लाट उसळल्यानंतर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री'ॲक्शन मोड'वर!.🛑"तुमच्या दीड...

शाळेतील २ चिमुकलींवर लैंगिक अत्याचार.- संतापाची लाट उसळल्यानंतर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री’ॲक्शन मोड’वर!.🛑”तुमच्या दीड हजारांनी काहीही होणार नाही.- आम्हाला लाडकी बहीण नको, पण न्याय द्या”. संरक्षण द्या.( बदलापूर अत्याचार प्रकरणावर आंदोलक महिलेचा संताप!)

🟥शाळेतील २ चिमुकलींवर लैंगिक अत्याचार.- संतापाची लाट उसळल्यानंतर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री’ॲक्शन मोड’वर!.
🛑”तुमच्या दीड हजारांनी काहीही होणार नाही.- आम्हाला लाडकी बहीण नको, पण न्याय द्या”. संरक्षण द्या.
( बदलापूर अत्याचार प्रकरणावर आंदोलक महिलेचा संताप!)

बदलापूर :- प्रतिनिधी

बदलापूर शहरातील एका नामांकित शाळेत चार वर्षांच्या दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची गंभीर घटना घडली. या घटनेनंतर पीडित मुलींच्या पालकांसह नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली असून या प्रकरणातील आरोपीला कठोर शिक्षा व्हावी, या मागणीसाठी आज संतप्त नागरिकांनी बदलापूर स्थानकावर रेल्वे गाड्या रोखत आंदोलन केलं. नागरिकांच्या उद्रेकानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस प्रशासनाला सूचना करत याप्रकरणी कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
🟥आरोपीला कडक शासन करण्यासाठी जलदगती न्यायालयात तातडीने खटला चालवावा, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून देण्यात आले आहेत. या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी पोलीस आयुक्तांशी देखील चर्चा केली. सखी सावित्री समित्या शाळांमध्ये स्थापन झाल्या आहेत किंवा नाही ते तपासण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत.या प्रकरणाची माहिती मिळताच मुख्यमंत्र्यांनी तातडीने शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्याशी चर्चा केली आणि अशा घटना होऊ नयेत म्हणून कायमस्वरूपी ठोस उपाययोजना करण्यास सांगितलं. ज्या विद्यार्थी किंवा पालकांना अडचणी येत असतील त्यांच्यासाठी प्रत्येक शाळेत एक तक्रार पेटी लावावी अशी सूचना त्यांनी केली. याशिवाय शाळेतील ज्या कर्मचाऱ्यांचा विद्यार्थ्यांशी सातत्याने संपर्क असतो त्यावर बारकाईने लक्ष ठेवणे आणि त्याचा ट्रॅक ठेवणे, त्यांची पार्श्वभूमी माहिती करून घेणे गरजेचे आहे. विद्यार्थिनींना थोडा जरा संशय आल्यास त्यांना तातडीने प्राचार्य, मुख्याध्यापक किंवा शिक्षकांना न घाबरता सदर प्रकार निदर्शनास आणून देता आला पाहिजे अशी यंत्रणा हवी, असं मुख्यमंत्री म्हणाले.

🅾️देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या घटनेबाबत संताप व्यक्त करत आरोपींवर कठोर कारवाई होईल, असं आश्वासन दिलं आहे. “बदलापूर येथील दुर्दैवी घटनेत दोन तासांत आरोपीला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात संस्थेचीसुद्धा चौकशी करण्यात येईल. दोषींवर कठोर कारवाई केली जाईल आणि हा खटला जलदगती न्यायालयात चालवण्यासाठी आजच प्रस्ताव सादर करण्याचे आदेश ठाणे पोलिस आयुक्तांना देण्यात आले आहेत,” अशी माहिती फडणनवीस यांनी दिली आहे.

🟥नेमकं काय घडलं?

बदलापूर शहरातील एका नामांकित शाळेतील चार वर्षांच्या दोन चिमुकल्या मुलींवर नराधमाने अत्याचार केले. या प्रकरणात एका मुलीवर अत्याचार करण्यात आले आहेत, तर दुसऱ्या मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न झाला आहे. या मुली प्रसाधनगृहात जात असताना शाळेतील एका कर्मचाऱ्याने संतापजनक प्रकार मुलींसोबत केला. दोन्ही मुलींनी पालकांना याबाबत माहिती दिल्यानंतर पालकांनी त्यांची वैद्यकीय तपासणी करून घेतल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. १२ ते १३ ऑगस्टला हा प्रकार घडला होता. त्यानंतर पालकांनी शाळा प्रशासनाला माहिती दिल्यावर मुलींची खाजगी रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली. या तपासणी नंतर मुलींवर अत्याचार झाल्याचे उघडकीस आले. बदलापूर शहरात काही दिवसांपूर्वीच एका बारा वर्षे मुलीवर सुद्धा अत्याचार झाला होता. याचा अजून पोलिसांना तपास लागलेला नाही. त्यातच आता हा समाजाला काळीमा फासणारा प्रकार घडल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, हा प्रकार पालकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यासाठी गेले असता त्यांना तब्बल १२ तास रखडवून ठेवण्यात आले आणि १२ तासांनंतर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया करण्यात आली.

🛑”तुमच्या दीड हजारांनी काहीही होणार नाही.- आम्हाला लाडकी बहीण नको, न्याय द्या”.
( बदलापूर अत्याचार प्रकरणावर आंदोलक महिलेचा संताप!)

बदलापूर :- प्रतिनिधी.

बदलापूरमध्ये एका चार वर्षांच्या तसेच सहा वर्षांच्या दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. बदलापूरमधील एका शाळेतील सफाई कर्मचाऱ्याने हे दृष्कृत्य केलं आहे.ही घटना उजेडात आल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात संताप व्यक्त केला जात आहे. बदलापूरमध्ये नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. ज्या शाळेत हा प्रकार घडला त्या शाळेला आदोलकांनी घेराव घातला आहे. तर बदलापूर रेल्वे स्थानकावरही शेकडो आंदोलक जमा झाले असून त्यांनी सर्व रेल्वे रोखून धरल्या आहेत. याच आंदोलनातील एका महिलेने सरकारवर टीकेचे आसूड ओढले आहेत. आम्हाला लाडकी बहीण योजना नको आहे. तुमचे दीड हजार रुपये आम्हाला नको आहेत. आमच्या मुलीच सुरक्षित नसतील तर आम्ही काय करावं? असा संतप्त सवाल या महिलेने राज्य सरकारला केलाय.

🛑 लाडक्या बहिणीला न्याय द्या संरक्षण द्या.आम्हाला दहीहंडी नको आहे. दहीहंडीच्या कार्यक्रमाला आम्हाला कोणी सेलिब्रिटी नको आहे. पण आम्हाला न्याय हवा आहे. अशा प्रसंगात तुम्ही राजकारणी लोक इथं येऊ शकत नसतील तर तुमचा काय फायदा. तुम्ही आम्हाला लाडकी बहीण म्हणता मग लाडक्या बहिणींच्या मुलीला न्याय द्यायला तुम्ही कुठे आहात? असा परखड सवाल आंदोलक महिलेने केला.

तुमच्या दीड हजार रुपयांनी काहीही होणार नाही.

आम्हाला लाडकी बहीण नको आहे. लाडक्या बहिणीच्या मुलींना आधी न्याय द्या. आम्हाला तुमचा पैसा नको आहे. तुमच्या दीड हजार रुपयांनी काहीही होणार नाही. आम्ही प्रशासनाच्या विश्वासावर आमची मुलं सोडतो आणि कामाला जातो. आमची मुलं सुरक्षित नसतील तर आम्ही काम तरी कशासाठी करावं. आम्हाला तुमची लाडकी बहीण योजना नको आहे, अशी संतप्त भावना एका आंदोलक महिलेने व्यक्त केली.

..तर आमच्या मुलींना बाहेर काढताना विचार करावा लागेल.

आमच्या मुलींना सुरक्षित ठेवा. अशाच घटना घडत राहिल्या तर आमच्या मुलींना आम्हाला घराच्या बाहेर काढताना विचार करावा लागेल. माझी मुलगी सुरक्षित आहे का? आम्ही रोज मुलांना गुड टच, बॅड टच शिकवतो. पण समोरच्या नराधमाला गुड टच, बॅड टच काय असतो हे समजत नसेल तर काय फायदा? असा सवाल या संतप्त महिलेने राज्य सरकारला विचारला.

🟥आता मुलांना शिक्षण देण्याची गरज आहे.

आम्ही आमच्या मुलांना शिकवून उपयोग काय? मी जगातल्या सर्व बायकांना सांगेन की तुम्ही मुलींना गुड टच, बॅड टच शिकवू नका. पण आधी मुलांना हे शिकवलं पाहिजे. महिलांची इज्जत करायची असते हे अगोदर मुलांना शिकवणं गरजेचं आहे. प्रत्येक आईने मुलांना शिकवणं गरजेचं आहे, अशा भावना या महिलेने व्यक्त केल्या.

कोण आहे काठीवाला दादा? बदलापूर प्रकरणातील आरोपीकडे शाळेने दिली होती ‘ही’ जबाबदारी – या घटनेतला आरोपी अक्षय शिंदे हा नेमका कोण आहे

अक्षय शिंदे हा संबंधित शाळेमध्ये सफाई कामगार म्हणून काम करत होता. शाळेमध्ये स्वच्छता ठेवणे, मुलांना वॉश रुमला घेऊन जाणे, अशी जबाबदारी त्याच्यावर होती. अक्षयचं वय २४ वर्षे आहे. शाळेमध्ये आऊटसोर्सिंगद्वारे त्याची नेमणूक झाली होती. त्याने शाळेतल्या दोन चिमुकलींवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. ही घटना १४ ऑगस्ट रोजी घडली.अत्याचाराची घटना घडल्यानंतर पीडित चिमुकलीने प्रायव्हेट पार्टजवळ त्रास होत असल्याचं घरी सांगितलं. पीडितेच्या आजोबांना प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी दुसऱ्या पीडित मुलीच्या पालकांना याबाबत सांगितलं. सखोल चौकशी केल्यानंतर दोन्ही मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याचं निष्पन्न झालं. ज्याने हा प्रकार केला त्याचा उल्लेख चिमुकल्यांनी ‘काठीवाला दादा’ असा केला होता.
दुसरीकडे पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेलेल्या पालकांना पोलिसांनी १२ तास ताटकळत ठेवलं होतं. त्यामुळे संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणी सीनिअर पोलिस इन्स्पेक्टर शुभदा शितोळे यांची बदली करण्यात आलेली आहे. तर बदलापूर ठाण्यात दोन पोलिस अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलीय.
🟥दरम्यान, आरोपी अक्षय हा गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून शाळेत सफाई कामगार म्हणून काम करत होता. आरोपी अक्षयला पाहताच पोलिसांना त्याच्या विकृत मनस्थितीची जाणीव झाली. मात्र, ही बाब शाळा प्रशासनाच्या लक्षात का आली नाही? असा प्रश्न पालकांनी उपस्थित केला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.