Homeकोंकण - ठाणेआंदोलकांवर पोलिसांचा लाठीचार्ज.- बदलापूर रेल्वे स्थानकावर मोठा राडा.( अखेर पोलीसांनी बळाचा वापर...

आंदोलकांवर पोलिसांचा लाठीचार्ज.- बदलापूर रेल्वे स्थानकावर मोठा राडा.( अखेर पोलीसांनी बळाचा वापर केला. )🛑धनगरमोळा बस स्थानाकावर आजरा मनसेचा बस रोको स्थगित.- पण शालेय विद्यार्थ्यांनच्या मदतीला धावले मनसे पदाधिकारी!🟥बदलापूरच्या नामांकित शाळेत चिमुरड्या मुलींचं लैंगिक शोषण.- पालकांना 12 तास ताटकळत ठेवणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याची उचलबांगडी.👇

🛑आंदोलकांवर पोलिसांचा लाठीचार्ज.- बदलापूर रेल्वे स्थानकावर मोठा राडा.
( अखेर पोलीसांनी बळाचा वापर केला. )
🛑धनगरमोळा बस स्थानाकावर आजरा मनसेचा बस रोको स्थगित.- पण शालेय विद्यार्थ्यांनच्या मदतीला धावले मनसे पदाधिकारी!
🟥बदलापूरच्या नामांकित शाळेत चिमुरड्या मुलींचं लैंगिक शोषण.- पालकांना 12 तास ताटकळत ठेवणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याची उचलबांगडी.👇

🛑धनगरमोळा बस स्थानाकावर मनसेचा बस रोको स्थगित.- पण शालेय विद्यार्थ्यांनच्या मदतीला धावले मनसे पदाधिकारी!

आजरा.- प्रतिनिधी.

Oplus_0

आजरा येथील मनसेच्या वतीने मंगळवारी धनगरमोळा बस स्थानाकावर मनसेचा बस. एस. टी रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदन आजरा आगारात देण्यात आले होते. आजरा तालुक्यातील पश्चिम भागातील विद्यार्थी आणि सामान्य नागरिकांचा जिव्हाळ्याचा प्रश्न बनलेला आहे. महामंडळाच्या वाहन व चालक अजिबात एस. टी थांबवत नाहीत….तर
सावंतवाडी बस डेपोच्या गाड्या थांबवण्यात बाबत सकारात्मक चर्चा करा अन्यथा आजरा तालुक्यातून एस. टी रस्त्यावर फिरु देणार नाही… आणि बस डेपो मध्ये आयोजित केलेला प्रवाशी राजा कार्यक्रमक भंपक असून प्रवाशी राजा स्टॅन्ड वर कोलमडलेल्या वेळापत्रकावर टाहो फोडत आहे.

Oplus_0

तिथं का कार्यक्रम घेत नाही.‌ असा सवाल मनसेने केला होता. याबाबतचे निवेदन आजरा मनसेच्या वतीने पदाधिकारी यांनी दिले होते. पण पोलीस प्रशासन व आजरा आगार व्यवस्थापनाशी चर्चा करून सावंतवाडी , मालवण आगाराशी चर्चा करून पत्रव्यवहार झाला असल्याने यापुढे असे होणार नाही. यामुळे आंदोलन स्थगित करण्यात आले होते. परंतु या मार्गावर आजरा आगार प्रमुखांनी दिलेल्या शब्द व लेखी आश्वासन याबाबत वस्तुस्थिती काय आहे. हे पाहण्यासाठी मनसे पदाधिकारी गेले असता मनसे पदाधिकारी यांना लेखी आश्वासन देऊन बसडेपो अधिकाऱ्यांनी आंदोलन मागे घेण्यास सांगितले.
याचाच आढावा घेण्यास गेलेल्या जिल्हा सरचिटणीस सुधिर सुपल, तालुका अध्यक्ष आनंदा घंटे व पदाधिकारी यांना पारीक्षेसाठी चाललेल्या मुलांना बस आली नसून काही बिघाड झाल्याची घटना समजली, लगेचच घनगरमोळा शाखा अध्यक्ष व तालुका उपाध्यक्ष प्रेमानंद खरुडे यांच्या सहकार्याने खाजगी वाहनाने त्वरित त्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी रवाना केले याचे कौतुक सर्वत्र होत आहे
.

🛑आंदोलकांवर पोलिसांचा लाठीचार्ज.- बदलापूर रेल्वे स्थानकावर मोठा राडा.
( अखेर पोलीसांनी बळाचा वापर केला. )

बदलापूर.- प्रतिनिधी.

Oplus_0

अखेर बदलापूर रेल्वे स्थानकावर पोलिसांकडून आंदोलकांवर सौम्य लाठीचार्ज करावा लागला आहे. पोलिसांच्या लाठीचार्जनंतर आंदोलकांकडून दगडफेक देखील झाली. पण पोलिसांनी पोलीस बळाचा वापर करत गर्दीला पांगवण्याचा यशस्वी प्रयत्न केला. पोलिसांनी संपूर्ण बदलापूर रेल्वे स्थानक खाली केलं आहे. पोलीस हेल्मेट घालून रेल्वे रुळावर उतरले. त्यांनी आंदोलक पुरुष आणि तरुणांना लाठ्यांचा प्रसाद दिला. तर महिलांना सुरक्षितपणे बाजूला केलं. पोलिसांच्या लाठीचार्जनंतर आंदोलक रेल्वे रुळाच्या बाहेरच्या दिशेला निघाले. संपूर्ण बदलापूर रेल्वे स्थानक रिकामं करण्यात पोलिसांना यश आलं
🟥बदलापूर रेल्वे स्थानकावर पोलिसांनी आंदोलकांना वारंवार विनंती करुन देखील आंंदोलक आंदोलन मागे घेण्यास तयार नव्हते. आंदोलकांनी जवळपास 9 तास रेल्वे सेवा ठप्प केली होती. मंत्री गिरीश महाजन स्वत: रेल्वे स्थानकावर आले. त्यांनी आंदोलकांना आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. आरोपीवर कठोरात शिक्षा होईल, असं आवाहन गिरीश महाजन यांनी केलं होतं. पण तरीही आंदोलक हटले नाहीत. त्यामुळे अखेर पोलिसांना आदोलकांवर लाठीमार करावा लागला. पोलिसांनी गर्दी पांगवण्यासाठी आंदोलकांवर लाठीमार केला. पोलिसांनी आंदोलकांना पळवून पळवून लाठीमार केला. पोलिसांनी आंदोलकांना पांगवल्यानंतर काही आंदोलकांकडून पोलिसांच्या दिशेला दगडफेक केली.
🛑आंदोलनानंतर पोलिसांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावं. आंदोलक सकाळपासून रेल्वे रुळावर जमले होते. आंदोलकांना वारंवार विनंती केली जात होती. पण आंदोलक रेल्वे रुळावरुन हटण्यास तयार नव्हते. अखेर लाठीचार्ज करुन जमाव पाच मिनिटात रेल्वे रुळावरुन हटवण्यात आलं आहे. हे ऑपरेशन होणं गरजेचं आहे. रेल्वे वाहतूक सुरु व्हायला हवी. यासाठी रेल्वे प्रशासनला आम्हाला अहवाल पाठवायचा आहे. यानंतर रेल्वे वाहतूक सुरु होईल, अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी मीडियाला दिली. पोलिसांच्या लाठीचार्जनंतर काही आंदोलक जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. तर काही आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
बदलापूर रेल्वे स्थानकाला सध्या छावणीचं स्वरुप आलं आहे. पुन्हा कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची काळजी पोलिसांकडून घेतली जात आहे. पोलिसांनी रेल्वे स्थानक आणि स्थानकाच्या बाहेरील गर्दी हटवली आहे. पोलीस सर्व परिस्थितीकडे बारकारईने लक्ष देवून आहेत. पोलिसांच्या लाठीचार्जनंतर आंदोलकांनी पोलिसांच्या गाडीवर हल्ला केला. बदलापूर रेल्वे स्थानकावर पोलिसांच्या गाड्या उभ्या होत्या. यावेळी आंदोलकांनी पोलिसांची गाडी उलटली. तसेच आणखी एका गाडीच्या काचा फोडल्या. गाड्यांची अवस्था पाहून आंदोलक किती आक्रमक होते याची जाणीव होत आहे. दरम्यान, बदलापूर रेल्वे स्थानकात सध्या सर्वसामान्य नागरिकांना प्रवेशबंदी आहे. संपूर्ण बदलापूर स्थानकाला पोलीस छावणीचं स्वरुप आलं आहे.

🟥बदलापूरच्या नामांकित शाळेत चिमुरड्या मुलींचं लैंगिक शोषण.- पालकांना 12 तास ताटकळत ठेवणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याची उचलबांगडी

कोलकातामध्ये एका महिला डॉक्टरचा अमानुष छळ करुन तिची हत्या केल्याची घटना ताजी असतानाच मुंबईपासून काही अंतरावर असलेल्या बदलापूरमधील एका नामांकित शाळेत दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना नुकतीच समोर आली होती.या दोन्ही मुली अवघ्या साडेतीन ते चार वर्षांच्या आहेत. त्यामुळे या घटनेबाबत प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. त्याचप्रमाणे शाळेसमोर हजारोंच्या संख्येने पालक, राजकीय मंडळी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी शाळेसमोर आंदोलन सुरु केले आहे. पोलीस ठाण्यात तक्रार करण्यासाठी गेलेल्या मुलींच्या पालकांना तब्बल 12 तास ताटकळत ठेवण्यात आले होते.
बदलापूरमधील एका नामांकित शाळेत साडेतीन वर्षाच्या दोन मुलींचे कंत्राटी सफाई कामगाराने शारीरिक शोषण केल्याने पालकवर्ग हादरला होता. या प्रकरणात अखेर 4 दिवसांनी शाळा प्रशासनाने आपली बाजू मांडली असून शाळेच्या मुख्याध्यापिकांना निलंबित, तर वर्गशिक्षिका आणि आया यांना थेट नोकरीवरून काढून टाकण्यात आलं आहे. तर आरोपी कंत्राटी सफाई कामगार ज्या कंत्राटदारामार्फत पुरवण्यात आला होता त्याच्यासोबतचा करारही शाळेने रद्द केला असून शाळेच्या सर्व पालक वर्गाची शाळेने जाहीर माफी मागितली आहे.
बदलापूर शहरातील एका जुन्या आणि नामांकित शाळेत हा संतापजनक प्रकार घडला होता. यानंतर पोलीस ठाण्यात तक्रार करण्यासाठी गेलेल्या मुलींच्या पालकांना तब्बल 12 तास ताटकळत ठेवण्यात आलं होतं. अखेर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या हस्तक्षेपानंतर रात्री एक वाजता पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. यावरून पोलीस प्रशासनाविरोधात संताप व्यक्त होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक शुभदा शितोळे यांची तडकाफडकी बदली करण्यात आली.तसेच बदलापूर पोलीस ठाण्यात दोन नवीन पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली.आंदोलन सुरु असून पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे
.

🛑शाळेचा माफीनामा

या सगळ्या प्रकारानंतर शाळेकडून एक माफीनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे. यामध्ये म्हटले आहे की, घडलेला प्रकार दुर्दैवी, घृणास्पद आणि निंदनीय आहे. या प्रकारानंतर सबंधित आरोपी विरुद्ध कारवाई करण्यासाठी पूर्ण क्षमतेने संस्थेने पोलिसांना सहकार्य केले. या घटनेनंतर सबंधित कर्मचाऱ्यावर कठोर शिक्षा व्हावी यासाठी संस्थेचा आग्रह आहे, असे शाळेने निवेदनात म्हटले आहे.

🅾️पूर्व प्राथमिक आणि शिशु वर्गाच्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या आणि सांभाळ करण्याच्या दृष्टीने फक्त महिलांचीच नेमणूक केली जाणार आहे. या प्रकरणात पालकांना झालेल्या मनस्तापाबद्दल संस्थेने त्यांची जाहीर माफी मागितली असून त्यांना कायदेशीर मदत देऊ केली आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या शिक्षणात कोणताही अडथळा येऊ नये यासाठी सर्व पालक, विद्यार्थी आणि शहरातील सजग नागरिकांना संस्थेने शांततेचे आवाहन केले आहे. कोणत्याही प्रकारच्या चर्चेसाठी संस्था तयार असल्याचेही संस्थेचे अध्यक्ष उदय कोतवाल यांनी सांगितले आहे.

🟥शाळेच्या गेटवर पालकांची मोठी गर्दी

हे प्रकरण इतकं संवेदनशील असतानाही बदलापूर पूर्व पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकानी गुन्हा दाखल करण्यासाठी 12 तासांचा अवधी घेतला . शिवाय शाळा प्रशासनाने हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला.त्यामुळे पालकांनी मंगळवारी सकाळी आक्रमक होत शाळेला जाब विचारण्यासाठी शाळेच्या गेटवर मोठी गर्दी केली आहे. शाळा प्रशासनाने येऊन आमच्याशी बोलावं अशी पालकांची मागणी आहे. त्याचबरोबर आज नागरिकांनी बदलापूर बंदची हाक दिली आहे ,या बदलापूर बंदमध्ये रिक्षा चालक, व्यापारी संघटना,शाळा बस चालक देखील सहभागी झालेत. घटनास्थळी सध्या पालक वर्ग शाळा प्रशासन आणि पोलीस प्रशासनाच्या विरोधात घोषणा देत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.