Homeकोंकण - ठाणेआचरा हिर्लेवाडी समुद्रात मासेमारी पात नौका उलटून तिघांचा मृत्यू ( एक खलाशी...

आचरा हिर्लेवाडी समुद्रात मासेमारी पात नौका उलटून तिघांचा मृत्यू ( एक खलाशी बचावला.)

आचरा हिर्लेवाडी समुद्रात मासेमारी पात नौका उलटून तिघांचा मृत्यू ( एक खलाशी बचावला.)

मालवण :- प्रतिनिधी.

आचरा तालुक्यातील सर्जेकोट येथून न्हय मासेमारीला गेलेली पात नौका आचरा हिर्लेवाडी येथील समुद्रात दाट धुक्यामुळे दुर्घटना ग्रस्त झाली. ही घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडली. या दुर्घटनेत तीन मच्छिमारांचा मृत्यू झाला तर एक खलाशाने पोहत किनारा गाठल्याने तो बचावला.
🅾️मृतात सर्जेकोट सोसायटीचे चेअरमन गंगाराम उर्फ जीजी आडकर यांचा समावेश आहे. श्री. आडकर हे चौके हायस्कुल मधून शिक्षक म्हणून सेवानिवृत्त झाले होते. या दुर्घटनेमुळे ऐन नारळी पौर्णिमेला सर्जेकोट गावावर शोककळा पसरली आहे.
🟥सर्जेकोट येथील जीजी आडकर हे काल सायंकाळी आपली मच्छीमारी पातनौका घेऊन समुद्रात मासेमारीला गेले होते. आचरा पिरावाडी येथील समुद्रात दाट धुक्यामुळे अंदाज न आल्याने ही नौका पलटी झाली. यावेळी नौकेतील चारही मच्छीमार समुद्रात फेकले गेले. एकाने किनारा गाठला तर तीन जण समुद्रात बुडाले. या सर्वांचे मृतदेह आचरा हिर्लेवाडी किनाऱ्यालगत सकाळी आढळले. ते आचरा ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले आहेत. या दुर्घटनेमुळे मच्छिमारांवर शोककळा पसरली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.