Homeकोंकण - ठाणेउध्दव ठाकरेंचं 'मिशन मुंबई'. - ३६ विधानसभा मतदारसंघांसाठी जोरदार फिल्डिंग.- १८ नेत्यांवर...

उध्दव ठाकरेंचं ‘मिशन मुंबई’. – ३६ विधानसभा मतदारसंघांसाठी जोरदार फिल्डिंग.- १८ नेत्यांवर सोपवली मोठी जबाबदारी.

🟥उध्दव ठाकरेंचं ‘मिशन मुंबई’. – ३६ विधानसभा मतदारसंघांसाठी जोरदार फिल्डिंग.- १८ नेत्यांवर सोपवली मोठी जबाबदारी.

मुंबई :- प्रतिनिधी.

आगामी विधानसभा निवडणुकांचं अद्याप बिगुल वाजलेलं नाही. तरीदेखील सर्व पक्षांनी आपपल्या परीनं तयारी करण्यास सुरुवात केली आहे. शिवसेनेतील बंडाळीनंतर पहिलीच विधानसभा निवडणूक असल्यामुळे यंदा ठाकरे विरुद्ध शिंदे यांच्यात लढत दिसणार आहे. अशातच राज्याचं विधानसभा निवडणुकांचं मैदान कोण मारणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. उध्दव ठाकरेंनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी रणनिती आखली असून सर्व मतदारसंघांचा अभ्यास करण्यासाठी 13 आणि 14 ऑगस्ट रोजी शिव सर्वेक्षण अभियान शिवसेना ठाकरे गटाकडून महाराष्ट्रातील 42 लोकसभा मतदारसंघात राबवलं होतं. आता मुंबईतील ६ लोकसभा मतदारसंघ म्हणजे ३६ विधानसभा मतदारसंघात हे शिव सर्वेक्षण अभियान राबवलं जाणार आहे.

🔴महाराष्ट्रातील 42 लोकसभा मतदारसंघातील शिव सर्वेक्षण अभियानानंतर शिवसेना ठाकरे गटानं ‘मिशन मुंबई’ वर लक्ष केंद्रीत केलं आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील 36 विधानसभा मतदारसंघांची मोर्चेबांधणी करण्यासाठी नेत्यांवर जबाबदारी सोपवली आहे. मुंबईतील 36 मतदारसंघांची जबाबदारी 18 नेते आणि 18 सहाय्यकांवर सोपवण्यात आली आहे. त्यामुळे ठाकरे गटाकडून आता मुंबईत शिव सर्वेक्षण अभियान राबवलं जाणार आहे.

🛑मुंबईतील शिव सर्वेक्षण अभियानासाठी नेत्यांची नियुक्ती

🔺विनायक राऊत ➖ वरळी, माहिम

🔺सुनील शिंदे ➖ विक्रोळी, घाटकोपर (पु)

🔺दत्ता दळवी➖ कुर्ला, चांदिवली

🔺अनिल देसाई➖ जोगेश्वरी (पु), अंधेरी (पु)

🔺अनिल परब➖ मागाठाणे, दहिसर

🔺सुनील प्रभू➖मुलुंड, भांडूप (प)

🔺अरविंद सावंत➖ अंधेरी (प), वर्सोवा

🔺राजन विचारे➖ विलेपार्ले, कलिना

🔺सुनिल राऊत➖ वांद्रे (पु), वांद्रे (प)

🔺वरुण सरदेसाई➖ सायन कोळीवाडा, धारावी

🔺मिलींद नार्वेकर➖ दिंडोशी, गोरेगाव

🔺रमेश कोरगावकर➖ बोरीवली, कांदिवली

🔺मनोज जामसुतकर ➖ चारकोप, मालाड

🔺अजय चौधरी ➖चेंबूर, अणुशक्तीनगर

🔺विलास पोतनीस➖ शिवडी, मलबार हिल

🔺विनोद घोसाळकर➖ वडाळा, भायखळा

🔺सचिन अहिर➖ कुलाबा, मुंबादेवी.

🔺अमोल कीर्तिकर➖, घाटकोपर (प), मानखुर्द-शिवाजीनगर

🅾️मुंबईतील शिव सर्वेक्षण अभियानासाठी प्रत्येक नेत्यावर दोन विधानसभा मतदारसंघात सर्वेक्षण करण्याची जबाबदारी सोपवली आहे. मुंबईसह इतर महाराष्ट्रातील सर्वेक्षण अहवाल 25 ऑगस्टला उद्धव ठाकरेंना सादर केले जाणार आहेत. त्यानुसार, आगामी विधानसभा निवडणुकांसाठी रणनिती आखली जाणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.