Homeकोंकण - ठाणेवालावल ग्रामपंचायतीची ग्रामसभा ठरली वादळी. ग्रामसभेच्या प्रोसिडिंगमध्ये अनेक त्रुटी.. तर वालावल ग्रामपंचायतचा...

वालावल ग्रामपंचायतीची ग्रामसभा ठरली वादळी. ग्रामसभेच्या प्रोसिडिंगमध्ये अनेक त्रुटी.. तर वालावल ग्रामपंचायतचा मनमानी कारभार आला चव्हाट्यावर..( अखेर ग्रामसभेत सरपंच पडले एकाकी.- तर वालावल ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या ग्रामसभेत ग्रामस्थ झाले आक्रमक.- पहा कारभाराची लक्तरे. 👇)

🛑वालावल ग्रामपंचायतीची ग्रामसभा ठरली वादळी. ग्रामसभेच्या प्रोसिडिंगमध्ये अनेक त्रुटी.. तर वालावल ग्रामपंचायतचा मनमानी कारभार आला चव्हाट्यावर..
( अखेर ग्रामसभेत सरपंच पडले एकाकी.- तर वालावल ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या ग्रामसभेत ग्रामस्थ झाले आक्रमक.- पहा कारभाराची लक्तरे. 👇)

कुडाळ :- प्रतिनिधी.

वालावल ग्रामपंचायतची बहुचर्चित तहकूब ग्रामसभा १६ ऑगस्ट रोजी सकाळी ११:०० वाजता ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच राजेश प्रभू यांच्या अध्यक्षतेखाली झाली.सभेला नेहमीप्रमाणे आपलीच १० ते १२ माणसं असणार व त्यांना थातूरमातूर उत्तरे देऊन, पंचायतीच्या पैशात चहा पाण्याची सोय करून,आम्ही घरी जाणार असा नियमित कार्यक्रम करणाऱे सरपंचसाहेब, व त्यांच्या एकछत्री तंबूची पूरती पंचाईत झाली. मुळात या ग्रामपंचायतीला गेली १० ते १५ वर्षे विरोधक नावाचा कोणी ग्रामस्थ उरला नव्हता, अशा गोड स्वप्नात असलेले सरपंच गेली अनेक वर्षे ग्रामसभा चालवित असत..
🔴 दरम्यान वालावल ग्रामपंचायतीत खोटी कागदपत्र दाखवून प्रत्यक्षात बोगस व्यवहार झाल्याचेच आजच्या ग्रामसभेत स्पष्ट झाले.आणि याचा खुलासा करताना सदस्यांसह सरपंचाची भंबेरी उडाली, काही ग्रामस्थांनी तर, मागील जेव्हा केव्हा ग्रामसभा घेतल्या, त्या ग्रामसभेचे प्रोसिडिटी (इतिवृत्त) सरपंच व सचिवांकडे मागितले असता, सरपंच महोदयांनी चक्क प्रोसिडिंग सांभाळणे हे माझे काम नसून ग्रामसभेस आलेल्या चर्चांमध्ये भाग घेऊन ठराव संमत करणे, हे माझे काम आहे असे सांगितले. तर प्रोसिडिंग ७ दिवसात लिहून पूर्ण करणे सभेचा अजेंडा ठिकठिकाणी पाठवणे व दवंडी देणे ही कामे सचिवाची आहेत असे सचिवांचे पितळ उघडे केले. सचिवांनी मात्र, मी येथे नवीन असून माझ्याकडे अतिरिक्त कार्यभार आहे, मला काही विचारू शकत नाही.आम्ही तुम्हाला बांधील नाही अशा पद्धतीचे वक्तव्य सुमधुर आवाजात करून जबाबदारी झटकली.मात्र काही ग्रामस्थांनी यापूर्वी झालेल्या ग्रामसभेचे प्रोसिडिंग मागितले असताना सदरचे प्रोसिडिंग ग्रामस्थांना दिले, मात्र त्या प्रोसेसिंगमध्ये अनेक त्रुटी दिसून आल्या.

🔺१) ३०मे २०२४ ची सभा झाली नसून ती सभा १३ जून ला झाली असे कागदोपत्री दाखवण्यात आली. प्रोसिडिंग रजिस्टर कोरे ठेवण्यात आले.
🔺२) प्रत्येक सभेच्या प्रोसिडिंगमध्ये दहा ते पंधरा पाने कोरी.
🔺
३ ग्रामसभेच्या सूचना ग्रामस्थांपर्यंत न पोचवणे गेली दहा वर्ष सभा असल्याची दवंडी न देणे.
🔺४) ग्रामसभेवेळी विद्यमान सदस्यांबरोबर आपल्या मर्जीतील व्यक्तींना व माजी सदस्यांना बसवणे.
🔺५) विद्यमान सदस्य सभेला हजर नसल्यास त्यांच्या सही साठी जागा कोरी ठेवणे.
🔺६) ग्रामस्थांनी विचारलेल्या प्रश्नांना बगल देत पुढील सभेला सांगतो असे सांगून दिशाभूल करणे.
🔺७) ग्रामसभेच्या वेळी आपल्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना सभा ठिकाणी बाहेर ठेवणे.
🔺८) १०० गणसंख्या अपेक्षित असतानाही सभेच्या ठिकाणी २०ते २५ व्यक्तींचीच बैठक व्यवस्था करणे.
🔺९) दरवेळी सभेच्या उपस्थिती वरून कोरम अभावी सभा तहकूब करण्यात येत आहे असे सांगून मर्जीतील व्यक्तींना एकत्र चर्चेत बसून निर्णय घेणे.

Oplus_0


🅾️अशी परिस्थिती दिसून आली. अशी प्रशासकीय स्थिती असताना सरपंच, सचिव हे गावचा विकास की सत्यानाश करणार असा प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित केला. ग्रामस्थांच्या मते, गेली १० वर्षे सरपंच-सचिवांनी गावाची काय विल्हेवाट लावली असेल,हे यावरून स्पष्ट होते. या ग्रामपंचायतीचे गेल्या १० वर्षाचे ऑडिट होणे गरजेचे आहे.१६ ऑगस्ट २०२४ ग्रामसभेची नोटीस १०० ग्रामस्थ धरले तर, जेमतेम ३० ग्रामस्थ दाटीवाटीने बसण्याची व्यवस्था असणाऱ्या सभागृहात सभा घेऊन सरपंच व सचिवांना काय साध्य करायचे होते, की नेहमीप्रमाणे प्रोसिडिंग कोरे ठेवून सभा चालवायची होती.याबाबत खुलासा होणे गरजेचे आहे याबाबत ग्रामस्थांनी सचिवांना विचारले असता सचिव यांनी काहीही माहिती मी देऊ शकत नाही असे बेजबाबदार वक्तव्य केले अशा बेजबाबदार व्यक्तींना विस्तार अधिकारी व गटविकास अधिकारी पाठीशी घालतात की काय ? हा प्रश्न उद्भवतो. अशी दिशाभूल करणारी उत्तरे मिळताच एका स्त्री कडे पाहून ग्रामस्थांनी याकडे दुर्लक्ष केले.तुम्हाला हे जमत नसेल तर तुम्ही राजीनामा द्या. किंवा कार्यभाग दुसऱ्या व्यक्तीकडे सुपूर्द करा असे सांगितले ग्रामस्थांच्या मते शासकीय कर्मचारी सचिव हा प्रत्येक सभेचा साक्षीदार असतो त्याने सभेचे प्रोसिडिंग सभेत कच्चे लिहून नियमित वेळ नसेल तर पुढच्या सभेच्या अगोदर पक्के लिहून ग्रामसभेला सादर करावयाचे आहे. मात्र दिनांक ३० मे २०२४ च्या ग्रामसभेचे इतिवृत्त तीन महिने रिक्त ठेवून शासनाची व ग्रामस्थांची दिशाभूल केली असून ही गंभीर बाब आहे. हे मागून पूर्ण करण्याचे गौडबंगाल असल्याचे ग्रामस्थांच्या लक्षात आले आणि म्हणता म्हणता सरपंच सचिवांचे पितळ उघडे पडले. हे चाळीस ग्रामस्थांनी दाखवून दिले. याच्यावर कायदेशीर कारवाई व्हायला पाहिजे मात्र पुढील ग्रामसभेत कोरम पूर्ण करून गेली कित्येक वर्षाची माहिती ग्रामस्थ सरपंचांकडून घेतल्याशिवाय राहणार नाही, असे ग्रामस्थांनी बोलवून दाखवले हो गेली वीस वर्ष ही मनमानी आम्ही सहन केली आता गप्प बसणार नाही असे सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.