स्त्रियांमध्ये संविधानाच्या मूल्यांची जाणीव व्हावी. यासाठी ग्रामीण भागात संविधान परिषदेची . – ही आजच्या काळाची गरज आहे.-डॉ.नंदाताई बाभुळकर
नेसरी.- प्रतिनिधी.
नेसरी येथे महिलांच्या न्याय्य अधिकार-हक्कांसाठी न्यायिकबाजूने महिलांच्या हक्कासाठी लढा संविधान परिषद ही संविधान सन्मान परिषद आस जगण्याची संविधान गट, आदिशक्ती संविधान गट, आणि मुक्ती संघर्ष समिती यांच्या वतीने संविधान परिषदेचे नेसरी येथे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी शाहीर सदानंद शिंदे या स्वागतपर गीत सादर केले.
या परिषदेचे उद्घाटन सामाजिक कार्यकर्त्या डॉ.नंदाताई कुपेकर-बाभुळकर, नेसरी गावच्या सरपंच सौ गिरीजादेवी शिंदे-नेसरीकर, डॉ.नवनाथ शिंदे ज्येष्ठ विचारवंत ,संग्राम सावंत व इतर मान्यवरांच्या हस्ते झाडाला पाणी घालून करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून प्रमोद पाटील, अंजुम नूलकर, रविंद्र भोसले, लक्ष्मी कांबळे, भारती पवार यांची उपस्थिती होती. मान्यवरांना भारतीय राज्यघटनेची प्रत देऊन व शिवाजी कोण होता हे कॉम्रेड गोविंद पानसरे यांचे पुस्तक देऊन स्वागत करण्यात आले. संविधान सन्मान परिषदेचे मुख्य संघटक संग्राम सावंत परिषदेची भूमिका मांडताना म्हणाले, स्त्रियांच्या न्याय्य- हक्कांसाठी संविधानाच्या मार्गाने चालत राहण्यासाठी, स्त्रियांच्या मध्ये संविधानाच्या मूल्यांची जाणीव जागृती होण्यासाठी, तसेच त्यांच्या न्याय्य बाजूने लढा उभा राहण्यासाठी. त्यांच्या वेगवेगळ्या प्रश्नांवर आवाज उठवण्यासाठी तसेच ठोस पावले शासनाने व प्रशासनाने गांभीर्यपूर्वक उचलली पाहिजेत.यासाठी संघटित होऊन.लढा नेटाने उभा भारतीय संविधानाला घेऊन करणार आहोत.यासाठी परिषद घेत आहोत. या परिषदेचे उदघाटकीय भाषणात,सामाजिक कार्यकर्त्या नंदाताई बाभुळकर म्हणाल्या,माणूस पण बनण्याच्या लढाई संविधानाचे योगदान खूप महत्त्वाचे आहे. आज कष्टकरी, कामगार शेतमजूर, विधवा-परिताक्त्या महिलांसाठी ही संविधान परिषद होत आहे ही एक खूप गरजेची आणि गोरगरीब लोकांसाठी महत्त्वाची परिषद आहे. या परिषदेतून समाजातील तळागाळा पर्यंत संविधान पोहोचवण्याची जबाबदारी तुम्हा आम्हा सगळ्यांची आहे. हे करण्यासाठी आपण सर्वजण प्रयत्नशील होऊया.यासाठी मी सदैव आपल्या पाठीशी खंभीरपणे राहणार आहे.संविधान हे जात धर्म पंथ असा भेद न मानता आपल्याला माणूसपण शिकवते. अध्यक्षीय मनोगत करताना सरपंच ग्रा.प.नेसरी गिरीजादेवी शिंदे-नेसरीकर म्हणाल्या, की आपण कष्टकरी वर्गासाठी घेतलेली संविधान परिषद ही ग्रामीण भागात होत असताना एक मोलाची गोष्ट आहे. इथून पुढे मी कष्टकरी स्रीयांसाठी, संघटित-असंघटित कामगार, अपंग,विधवा परितक्त्या महिलांच्यासाठी जे काही करता येईल ते करणार आहेच. संविधानाच्या चळवळीचे खूप महत्त्व आहे. गावागावातील माणसांना संविधान समजण्याची गरज आहे. ज्येष्ठ विचारवंत डॉ.नवनाथ शिंदे यांचा मी गाडगेबाबा बोलतोय हा एकपात्री प्रयोग झाला. अतिशय उत्कृष्ट पद्धतीने एकपात्री प्रयोगातून संत गाडगेबाबांचे विचार त्यांनी मांडले. यावेळी सौ कांबळे, श्री नूलकर व सौ कांबळे यांनी आपली मनोगते व्यक्त केली आहेत. परिषदेच्या शेवटी वेगवेगळे ठराव करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुभाष कांबळे यांनी केले तर आभार प्रदर्शन भारती पवार यांनी व्यक्त केले. परिषदेला कष्टकरी राबणाऱ्या स्त्री-पुरुष लोकांची उपस्थिती होती.