मराठा लाईट एन्फ्ंट्री बेळगाव – घुल्लेवाडी ता.चंदगड येथील
हवालदार सुनील वसंत सलाम. यांचे दुखःद निधन.
आजरा.- प्रतिनिधी.
मराठा लाईट एन्फ्ंट्री बेळगाव चे
हवालदार सुनील वसंत सलाम. यांचे दुखःद निधन (वय ३७ ) ११ मराठा. यांचे आज सकाळी १० वा. सेवा बजावत असताना हृदयविकाराच्या झटक्याने दुखःद निधन झाले. यांचे जन्म गाव घुल्लेवाडी ता.चंदगड असून आतिशय प्रतिकुल परिस्थितीत शिक्षण घेऊन देशसेवेसाठी लष्करामध्ये भरती झाला होता.हा उमदा युवक देशसेवा बजावत असताना आज अचानक देवाघरी निघुन गेलेला आहे. या आकस्मिक ओढवलेल्या संकटामुळे घुल्लेवाडी व पंचक्रोशित दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. यांच्या पच्छात आई वडील पत्नी एक मुलगा एक मुलगी भाऊ भावजय असा परीवार आहे.
शासकिय इतमामात आज घुल्लेवाडी येथे दुपारी तिन वाजता अंत्यसंस्कार होणार आहेत..