सामाजिक व सांस्कृतिक ऐक्य, आरोग्य बिघडू नये.- यांची काळजी न घेता वादग्रस्त विधान.- केले प्रकरणी संविधान सन्मान परिषदेच्या वतीने निवेदन.
आजरा.- प्रतिनिधी.
संविधान सन्मान परिषदेच्या वतीने आज दि. १७ रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी, गडहिंग्लज व पोलीस निरीक्षक, आजरा यांना पोलीस स्टेशन आजरा येथे स्त्री-पुरुष मुस्लिम समाजाच्या वतीने निवेदन देण्यात आले त्यानंतर या निवेदनावर पोलीस स्टेशनमध्ये चर्चा करण्यात आली. दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे.
1) रामगिरी गुरू नारायण गिरी महाराज सरला बेट, सराला, ता. श्रीरामपूर, जि.अहमदनगर यांनी समतेचे पुरस्कर्ते, इस्लाम धर्माचे प्रेषित व आदर्श महमंद पैगंबर साहब, यांच्या बद्दल पुरावा नसताना वादग्रस्त व चरित्रहनन करणारे विधान करून, तेढ निर्माण करण्यासाठी तसेच मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखवाव्यात याच हेतूने केलेले आहे. त्यामुळे त्यांच्यावर भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल करणेबाबत…..
2)भारतीय संविधानानुसार प्रत्येक व्यक्तीला श्रद्धा व उपासनाचे स्वातंत्र्य दिले आहे. मात्र श्रद्धा व उपासना करताना सामाजिक व सांस्कृतिक ऐक्य आणि सामाजिक आरोग्य बिघडू नये.याची काळजी न घेता वादग्रस्त विधान व सामाजिक आरोग्य बिघडवणारे विधान केल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा नोंद ताबडतोब करावा….
3)अत्यंत काळजीपूर्वक व गांभीर्यपूर्वक आपण या प्रकरणाची दखल घेऊन ताबडतोब गुन्हा दाखल करून ताबडतोब त्यांना अटक करणेबाबत…..
भारतीय संविधानानुसार प्रत्येक व्यक्तीला श्रद्धा व उपासनाचे स्वातंत्र्य दिले आहे. मात्र श्रद्धा व उपासना करताना सामाजिक व सांस्कृतिक ऐक्य आणि सामाजिक आरोग्य बिघडू नये यासाठी प्रत्येक भारतीयाने यासाठी कटिबद्ध असले पाहिजे. मात्र संत व संत परंपरा; महानायक- महानायिका यांच्या बाबतीत बोलताना असंविधानिक व पुराव्याशिवाय बोलणे हे कायदेशीरदृष्ट्या गुन्हा आहे. कोणताही सबळ पुरावा न देता एखादं विधान करणे हे संवैधानिक दृष्ट्या योग्य नाही. अशी आमची भूमिका आहे. समाजाच्या सामाजिक सांस्कृतिक ऐक्याला धोका न लागता तसेच सामाजिक आरोग्य बिघडू नये याची काळजी घेणे गरजेचे आहे यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असतो आम्ही सर्व भारतीय म्हणून आमची ही भूमिका असली पाहिजे. मात्र असे होताना दिसत नाही भारतीय समाजामध्ये तेढ निर्माण व्हावी तसेच वेगवेगळ्या दृष्टिकोनातून समाजाचे सामाजिक- सांस्कृतिक ऐक्य व सामाजिक आरोग्य बिघडावे म्हणून काही लोक,संस्था व संघटना यासाठी काम करत आहेत. याचीही नोंद पोलीस खात्याकडे आहे मात्र त्यांनी याकडे गांभीर्यपूर्वक लक्ष दिले पाहिजे. गुरूवार दि.१५ ऑगस्ट २०२४ रोजी सायंकाळी मौजे पांचाळे, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताहाच्या धार्मिक कार्यक्रमांमध्ये रामगिरी गुरू नारायण गिरी महाराज, सरला बेट यांनी त्यांच्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या प्रवचनामध्ये उपस्थित हजारो लोकांच्या समोर समतेचे पुरस्कर्ते, इस्लाम धर्माचे प्रेषित व आदर्श महमंद पैगंबर साहब,यांच्या जीवन चरित्र विषयी कोणतेही संपूर्ण ज्ञान व माहिती नसताना, कोणताही सबळ पुरावा नसताना समतेचे पुरस्कर्ते, इस्लाम धर्माचे प्रेषित व आदर्श महमंद पैगंबर साहब यांच्या जीवन चरित्र्यावरती अत्यंत अश्लाघ्य अशा भाषेत चरित्रहनन करत, ज्या मुस्लिम समाजाचे आदर्शच असे असतील तो मुस्लिम धर्म कसा पवित्र व सुरक्षित आहे? असे वादग्रस्त विधान करून भारतीय समाजाची सामाजिक आरोग्य बिघडवण्याचे काम त्यांनी केलेले आहे. तसेच यामुळे मुस्लिम समाजाच्या भावना दुखवाव्यात याच हेतूने त्यांनी हे विधान केलेले आहे. असे आमचे प्रथमदर्शनी मत आहे. त्यांच्या विधानामुळे भारतामध्ये एक कोटीच्या वर मुस्लिमांनी धर्मांतर केले आहे असे अन्य धर्मीयांच्या मध्ये दिशाभूल करणारे चुकीचे वक्तव्य करत दोन धर्मामध्ये तणाव निर्माण होईल असे कृत्य केले आहे. वारंवार अशा घटना घडत आहेत. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये विशाळगड प्रश्नामुळे सुध्दा सामाजिक व सांस्कृतिक ऐक्य व सामाजिक आरोग्य बिघडवण्यासाठी काही मंडळींनी प्रयत्न केला होता. कोणताही प्रश्न संविधानाला प्रमाण मानून आणि संविधानानुसार तो सोडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे अशी आमची आग्रहाची भूमिका आहे.त्यामुळेच असे होऊ नये यासाठी खबरदारी प्रशासन आणि व शासनाने घेतली पाहिजे!! आम्ही भारतीय म्हणून आणि इस्लाम धर्माचे सच्चे पाईक असून आम्हास आमचे प्रेषित महंमद पैगंबर यांचे खरे जीवन चरित्र अवगत असून रामगिरी गुरुनारायण गिरी महाराज सरला बेट यांनी केलेल्या विधानामुळे आमच्या भावना प्रचंड दुखावल्या आहेत. सबब रामगिरी गुरू नारायण गिरी महाराज सरला बेट यांच्यावर भारतीय न्याय संहिता कलम-३०२ अन्वये तसेच सामाजिक आरोग्य बिघडवणारे विधान केल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा नोंद ताबडतोब करावा. ताबडतोब अटकेची कारवाई करावी. मौलाना संविधान गट, संविधान सन्मान परिषद, भारतीय मुस्लिम विकास परिषद, मुक्ती संघर्ष समिती आणि समस्त मुस्लिम समाजाच्या वतीने आज आम्ही आपणास वरील विषयांबाबत निवेदन देत आहोत. आपण याची गांभीर्यपूर्वक दखल घेऊन ताबडतोब गुन्हा व अटक करण्याची भूमिका घ्यावी. असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. यावेळी संग्राम सावंत मुख्य संघटक- संविधान सन्मान परिषद व राज्याध्यक्ष – मुक्ती संघर्ष समिती महाराष्ट्र सदस्य प्रमोद पाटील, समीर खेडेकर, अबुसईद माणगावकर, मौजद माणगावकर, मजीद मुल्ला, समीर अब्दुल चॉंद, अब्दुलकरीम कांडगावकर, बबलू शेख, ताहिर खा. माणगावकर, आमरीन माणगावकर, सिमरन शेख, कौसर कांडगावकर, हिना हेरेकर, शिरीन निशानदार, सईदा, वाडीकर, मिंझबा जंगी, जोया मुराद, समीर चॉंद, हाफीज तौफिक काकतीकर, मुफ्ती अब्दुलखालीद खलीफ,मौलाना अब्दुलरहेमान काकतीकर, सफवान काकतीकर, हाफिज अब्दुलगफार लमतुरे,जुबेर माणगावकर, अबु माणगावकर, युनुस जंगी, सल्लाउद्दीन शेख,तन्वीर मकानदार,सादिक नेसरीकर, वसीम मुल्ला, रियाज सोनेखान व इतर स्त्री पुरुष सामील झाले होते.