मंगळवारी धनगरमोळा बस स्थानाकावर मनसेचा बस रोको आंदोलन.
आजरा.- प्रतिनिधी.
आजरा येथील मनसेच्या वतीने मंगळवारी धनगरमोळा बस स्थानाकावर मनसेचा बस. एस. टी रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदन आजरा आगारात देण्यात आले आहे. आजरा तालुक्यातील पश्चिम भागातील विद्यार्थी आणि सामान्य नागरिकांचा जिव्हाळ्याचा प्रश्न बनलेला आहे. महामंडळाच्या वाहन व चालक अजिबात एस. टी थांबवत नाहीत….तर
सावंतवाडी बस डेपोच्या गाड्या थांबवण्यात बाबत सकारात्मक चर्चा करा अन्यथा आजारा तालुक्यातून एस. टी रस्त्यावर फिरु देणार नाही… आणि बस डेपो मध्ये आयोजित केलेला प्रवाशी राजा कार्यक्रमक भंपक असून प्रवाशी राजा स्टॅन्ड वर कोलमडलेल्या वेळापत्रकावर टाहो फोडत आहे. तिथं का कार्यक्रम घेत नाही. असा सवाल मनसेने केला आहे. याबाबतचे निवेदन आजरा मनसेच्या वतीने पदाधिकारी यांनी दिले आहे
यावेळी ता. अध्यक्ष, महिला आघाडी अध्यक्षा सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.