कोलकाता येथील आर जी कार
मेडिकल पदवीधर महिला डॉक्टर वर क्रूरपणे बलात्कार व हत्या. – निषेधार्थ.- आजरा तालुक्यातील सर्व वैद्यकीय व्यावसायिकांनी पुकारला बंद ( आजरा तहसीलदार यांना निवेदन.)
आजरा.- प्रतिनिधी.
कोलकाता येथील आर जी कार
मेडिकल पदवीधर महिला डॉक्टर वर क्रूरपणे बलात्कार व हत्या. – निषेधार्थ.- आजरा तालुक्यातील सर्व वैद्यकीय व्यावसायिकांनी पुकारलेल्या बंद बाबत आजरा तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. दि. ९ ऑगस्ट २०२४ च्या पहाटे कोलकाता येथील आर जी कार मेडिकल कॉलेजमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या पदवीधर महिला डॉक्टर
वर क्रूरपणे बलात्कार करून तिची अमानुषपणे हत्या करण्यात आली. यामुळे फक्त वैद्यकीय क्षेत्रालाच नव्हे तर संपूर्ण देशाला मोठा धक्का बसला आहे. यामुळे डॉक्टर्स च्या कामाच्या ठिकाणच्या सुरक्षेचा अतिमहत्वाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. तेव्हापासून फार पूर्वीपासून प्रलंबित सुरक्षे संदर्भातील न्याय्य मागण्यांसाठी निवासी डॉक्टर्स देशव्यापी संपावर गेले आहेत. देशभरातील डॉक्टर्सच्या अनेक संघटनां वतीने ही देशभरात निदर्शने आणि कँडल मार्च काढण्यात आले आहेत. आर जी कार महाविद्यालतील अधिकाऱ्यांनी गुन्ह्याची परिस्थिती अतिशय हलगर्जीपणे, निष्काळजीपणे हाताळली आणि पहिल्या दिवसानंतर तर पोलिस तपासही जाणिवपूर्वक रखडवला गेला जेणेकरून या प्रकरणातील हाय प्रोफाईल गुन्हेगार सुटतील. मात्र अखेर १३ ऑगस्ट २०२४ रोजी, कोलकाता उच्च न्यायालयाने राज्य पोलिसांना आतापर्यंतच्या तपासावर असमाधान व्यक्त करून हे प्रकरण केंद्रीय अन्वेषण ब्युरो (CBI) कडे सोपविण्यास सांगितले आहे. राज्य पोलिसांनी त्यांचा तपास सुरू ठेवल्यास पुरावे नष्ट होण्याची शक्यताही त्यांनी वर्तवली. १५ ऑगस्टला आपल्या स्वातंत्र्यदिनी जेव्हा आपण सर्व देशवासी आनंद साजरा करीत होतो त्याच दिवशी मोठ्या जमावाने या रुग्णालयाच्या विविध विभागांची फक्त तोडफोडच नाही केली तर ज्या सेमिनार रुममध्ये पिडीत निवासी डॉक्टर चा निघृण बलात्कार व हत्या केली गेली तेथले पुरावेही नष्ट करण्याचा प्रयत्न ह्या जमावाने केला. एवढ्यावरच ते थांबले नाहीत तर त्यांनी आंदोलन करणाऱ्या वैद्यकीय विद्यार्थ्यांवरही हल्ला केला. एवढे अपुरे होते की काय भरती असलेल्या रुग्णांना तसेच भरती रुग्णांसाठी लागणाऱ्या साधनसामग्री ला सुध्दा प्रचंड मोठी क्षती पोहोचविली. डॉक्टर्स विशेषतः स्त्री डॉक्टर्स हिंसाचाराला वारंवार बळी पडतात. रुग्णालये आणि कॅम्पसमध्ये डॉक्टरांच्या सुरक्षेची तरतूद करणे हे अधिकाऱ्यांचे काम आहे. मात्र डॉक्टर्स च्या सुरक्षेबाबत संबंधित ह्या अधिकाऱ्यांच्या उदासीनता आणि असंवेदनशीलतेमुळेच डॉक्टर्स, परिचारिका आणि इतर आरोग्यसेवा कर्मचाऱ्यांवर वारंवार शारीरिक हल्ले होतात, रुग्णालयामध्ये राडे होत राहतात.
कोलकाता येथील आर जी कार मेडिकल कॉलेजमधील स्री निवासी डॉक्टर वर झालेल्या क्रूर गुन्हेगारी आणि स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला आंदोलक विद्यार्थ्यांवर उधळलेल्या गुंडगिरीच्या पार्श्वभूमीवर, मेडिकल असोसिएशन ऑफ आजरा या आजरा तालुक्यातील सर्व डॉक्टर्सच्या संघटनेने शनिवार दि. १७ ऑगस्ट २०२४ निषेधदिन पाळून सकाळी ६ वाजेपासून ते उद्या रविवार दि. १८ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ६ वाजेपर्यंत २४ तासांसाठी सर्व क्लिनिक्स आणि हॉस्पिटल्स मधील सेवा बंद ठेवण्याची घोषणा केली आहे. सर्व अत्यावश्यक सेवा मात्र सुरू ठेवल्या जातील. अपघातग्रस्तांना आकस्मिक सेवा दिली जाईल. परंतु नियमित ओपीडी कार्य करणार नाहीत आणि वैकल्पिक, तातडीच्या नसलेल्या शस्त्रक्रियाही केल्या जाणार नाहीत. भारत देशातील सर्व डॉक्टर्सना आपल्या डॉक्टरांच्या न्याय्य मागण्यांसाठी देशाची सहानुभूती हवी आहे. असे दिलेल्या निवेदनात म्हटले या निवेदनावर. डॉक्टर्स
IMA ब्रँच आजरा अध्यक्ष – डॉ दीपक सातोसकर, सेक्रेटरी – डॉ अनिल देशपांडे, मेडिकल असोसिएशन ऑफ आजरा चे अध्यक्ष – डॉ प्रविण निंबाळकर, उपाध्यक्ष – डॉ स्वप्नील कातकर
निमा अध्यक्षा – डॉ अंजनी देशपांडे, AHA अध्यक्ष – डॉ दीपक हरमळकर, डॉ संदीप देशपांडे , डॉ हेमंत भोसले , डॉ युवराज सुतार, डॉ सुरजित पांडव, डॉ रश्मी राऊत – गाडगीळ, डॉ गौरी भोसले, डॉ स्मिता कुंभार, डॉ पल्लवी निंबाळकर , डॉ आरती बेळगुंदकर , डॉ श्रीकांत सावंत , डॉ अमित बेळगुंदकर सह सदस्यांच्या सह्या आहेत.