🛑सरपंच ग्रामसेवक ग्राम पंचायत कर्मचारी यांचा राज्यव्यापी काम बंद आंदोलन.
🛑बेमुदत रस्ता रोको.-
संकेश्वर बांदा महामार्ग टोल मुक्ती संघर्ष समितीचे आजरा – तहसीलदार यांना निवेदन.
आजरा.- प्रतिनिधी.

सरपंच ग्रामसेवक ग्राम पंचायत कर्मचारी यांचा राज्यव्यापी काम बंद आंदोलन आजरा तालुका अखिल भारतीच सरपंच परिषदेच्या .वतिने साहाय्यक गट विकास अधिकारी श्री शेटे यांना निवेदन देण्यात आले.आजरा तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचारी दि १६/०८/२०२४ रोजी होणाऱ्या राज्य व्यापी काम बंद आंदोलन करणेत येणार आहे. आजरा तालुका ग्रामपंचायत कर्मचारी संघटना वतीने चे वतीने खालील मागण्याचे निवेदन देण्यात आले दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
१) किमान वेतन मिळणेसाठी अडथळा निर्माण करणारा वसुलीची, उत्पन्नाची अट घालणारा
दि २८/०४/२०२० चा शासन निर्णय रद्द करणेबाबत.
२) शासन मान्य नवीन किमान वेतन व राहणीमान भत्ता पूर्णपणे मिळालाच पाहिजे.
३) कालबाह्य ठरणारा जाचक लोकसंख्येचा आकृतिबंध रद्द करा. ४) कपात केलेल्या भविष्यनिर्वाह निधीची रक्कम कार्मच्यार्याच्या खात्यावर त्वरित जमा करा.
५) वेतन निचित समितीच्या (यावलकर समिती) च्या शिफारसी मान्य करा. ६) निवृत्ती वेतन अर्थात पेन्शन योजना ताबडतोब लागू करा.
तरी आजरा तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचारी दि १६/०८/२०२४ रोजी होणाऱ्या राज्य व्यापी कामबंद आंदोलनात सक्रीयपणे सामील होणार आहे. यादरम्यान गावात व कार्यालयात होणाऱ्या असुविधा बाला आम्ही कर्मचारी जबाबदार राहणार नाही. कृपया याची नोंद घ्यावी. असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. यावेळी आजरा तालुक्यातील विविध गावचे काही सरपंच व ग्राम कर्मचारी युनिअन चे प्रतिनिधी ग्रामसेवक युनिअन प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या आंदोलनात तालुक्यातील काही सरपंच यांचा पाठिंबा आहे तर काही सरपंच यांनी अद्याप आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. असे आंदोलनाचे चित्र विचित्र आहे.
🛑बेमुदत रस्ता रोको.-
संकेश्वर बांदा महामार्ग टोल मुक्ती संघर्ष समितीचे तहसीलदार यांना निवेदन.
आजरा.- प्रतिनिधी.

आजरा शहरानजीक उभा राहत असलेल्या दोन पदरी संकेश्वर बांदा राष्ट्रीय महामार्ग या महामार्गावरील टोल नाक्याला तालुक्यातील जनतेचा तीव्र विरोध असून टोल कायमचा हद्दपार करण्यासाठी बुधवार दि २८ ऑगस्ट २०२४ रोजी टोल नाका उभा करण्यात येत असलेल्या जागेवर मोर्चाने जाऊन बेमुदत रस्ता रोको करीत असले बाबत. आज दि. १६ आजरा तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
संदर्भ- १- दि २४ जून २०२४ प्रस्तावित टोल नाक्यावर टोल मुक्ती संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली आजरा तालुक्यतील जनतेचा निघालेला प्रचंड मोर्चा दि २० जून २०२४ रोजी आमदार प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली कार्यकारी
अभियंता राष्ट्रीय महामार्ग, कोल्हापूर (pwd), प्रकल्प संचालक-भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण, कोल्हापूर
(NHAI) व उपविभागीय अधिकारी भुदरगड यांचे उपस्थितीत प्रतिनिधींसोबत झालेली बैठक ३- दि २२ जुलै २०२४ रोजी आपल्या कार्यालयासमोर टोल मुक्ती संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली झालेले धरणे आंदोलन खास. छत्रपती शाहू महाराज आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते सतेज उर्फ बंटी पाटील यांना २८ जुलै २०२४ रोजी दिलेले निवेदनात
संकेश्वर बांदा महामार्गवर आजरा शहरालगत प्रस्तावित असलेल्या टोल नाक्याला आमचा तीव्र विरोध असून दि २४ जून रोजी प्रस्तावित टोला नाक्यावर आजरा तालुक्यातील जनतेने मोर्चाने येत आपल्या तीव्र भावना दाखवून दिल्या आहेत. या मोर्चावेळी या विभागाचे विध्यमान आमदार प्रकाश आबिटकर या टोल नाक्याला असलेला जनतेचा विरोध लक्षात घेऊन स्वतः मोर्चात सहभागी झाले होते. त्याचवेळी या जिल्ह्याचे पालकमंत्री
१) हसनसो मुश्रीफ यांनी मोबाईलवरून आंदोलनकर्त्यांशी संपर्क साधून केंद्रीय दळणवळण मंत्री ना. नितीन गडकरी यांचे सोबत बैठक घेऊन टोलचा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले होते. याला जवळजवळ दोन महिन्याहून अधिक काळ उलटून गेला, पण याबाबत आजअखेर कांहीही सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही.
२२ जुलै २०२४ आपल्या कार्यालयासमोर टोल मुक्ती संघर्ष समितीच्या वतीने आपल्या कार्यालयासमोर एक दिवसाचे धरणे आंदोलन झाले. आपल्या कार्यालयाकडूनही म्हणावा तसा प्रतिसाद आम्हाला मिळताना दिसत नाही. मोर्चा, धरणे, निवेदने देऊनही जर शासन प्रशासनाला जाग येत नसल्याने तालुक्यातील जनतेच्या मनात तीव्र असंतोष तयार झाला आहे. त्यामुळे जनतेने आर या पारची लढाई करण्याचा निर्णय केला आहे. या टोल नाक्याला आमचा विरोध का हे आम्ही यापूर्वी आपल्याला व संबंधित यंत्रणेला, या विभागाचे लोकप्रतिनिधी यांना सर्व मुद्यांसह कळविले आहे. जोपर्यंत हा रस्ता टोल मुक्त होत नाही तोपर्यंत आमचा लढा चालूच राहणार आहे. या लढ्याचा एक भाग म्हणून आम्ही बुधवार दि २८ ऑगस्ट २०२४ रोजी टोल नाका ज्या ठिकाणी उभा केला जात त्या ठिकाणी बे मुदत रस्ता रोको करण्यात येईल असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
या निवेदनावर कॉम्रेड संपत देसाई, परशुराम बामणे, प्रभाकर कोरवी, सी. डी. सरदेसाई, रविंद्र भाटले, दयानंद भोपळे, रशीद पठाण, गौरव देशपांडे, सह संघर्ष समितीच्या सर्व सदस्यांच्या सह्या आहेत.