Homeकोंकण - ठाणेमहाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजणार.- आज निवडणूक आयोग करणार घोषणा.. अधिक पहा..👇🟥राज्यातील...

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजणार.- आज निवडणूक आयोग करणार घोषणा.. अधिक पहा..👇🟥राज्यातील हवामानात मोठा बदल होणार.- राज्यात २० ऑगस्टनंतर १२ ते १३ दिवस मुसळधार पावसाची शक्यता

🟥महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजणार.- आज निवडणूक आयोग करणार घोषणा.. अधिक पहा..👇
🟥राज्यातील हवामानात मोठा बदल होणार.- राज्यात २० ऑगस्टनंतर १२ ते १३ दिवस मुसळधार पावसाची शक्यता

पुणे :- प्रतिनिधी.

महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर आता बऱ्यापैकी कमी झाला आहे. पुढील काही दिवस राज्यातील हवामान कोरडे राहणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पण येत्या १९ ऑगस्टनंतर राज्यातील हवामानात मोठा बदल होण्याची शक्यता आहे. राज्यात २० ऑगस्टनंतर पुढील १२ ते १३ दिवस मुसळधार पावसाची शक्यता आहे, अशी माहिती हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी दिली.
डख यांच्या अंदाजानुसार, एकंदरीत राज्यातील बहुतांशी भागात १९ ऑगस्टपर्यंत पावसाची उघडीप राहणार आहे. मात्र, त्यानंतर हवामान विभागात मोठे बदल होण्याची शक्यता आहे. दरम्यान, २० ऑगस्ट पासून पुढील बारा ते तेरा दिवस राज्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली. म्हणजेच सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीलाही मुसळधार पाऊस पडेल. ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, जळगाव, अमरावती, अकोला, बुलढाणा, परतवाडा, अकोट, अचलपूर, वर्धा, नागपूर या भागात १७ ऑगस्टपर्यंत तुरळक ठिकाणी पाऊस सुरू राहील. यामुळे या कालावधीत शेतकऱ्यांनी शेतीची सर्व प्रलंबित कामे पूर्ण करून घ्यावीत. महत्त्वाचे म्हणजे, जुलै महिन्याच्या सुरुवातील पावसाचा जोर कायम होता. परंतु, ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातील राज्यातील अनेक जिल्ह्यात पावसाने धुमाकूळ घातला.

🟥महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजणार.- आज निवडणूक आयोग करणार घोषणा.. अधिक पहा..

मुंबई :- प्रतिनिधी.

Oplus_0

महाराष्ट्रासह चार राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या तारखा आज निवडणूक आयोग जाहीर करणार आहे. यामुळे खऱ्या आर्थाने आज विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजणार आहे. आज दुपारी ३ वाजता निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होणार आहे.त्यात विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर करण्यात येणार आहेत. जम्मू-काश्मीर, महाराष्ट्र, झारखंड आणि हरियाणामध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत.

🛑महाराष्ट्र विधानसभेची मुदत कधीपर्यंत?

महाराष्ट्रातील विधानसभेची मुदत 26 नोव्हेंबर रोजी संपणार आहे. हरियाणा विधानसभेची मुदतही 3 नोव्हेंबरपर्यंत आहे. त्यामुळे या दोन राज्यात विधानसभा निवडणूक होणार आहे. तसेच 4 जानेवारी 2025 पर्यंत झारखंड विधानसभेची मुदत आहे. यंदा दिवाळी 29 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर या कालावधीत आहे. सणासुदीच्या काळात निवडणुका घेतल्या जात नाहीत. त्यामुळे दिवाळीच्या आधी किंवा दिवाळीच्या नंतर नोव्हेंबर महिन्यात निवडणुका होऊ शकतात. 2019 मध्ये महाराष्ट्र आणि हरियाणामध्ये 21 ऑक्टोबर रोजी एकाच टप्प्यात मतदान झाले होते. यंदा कधी मतदान होणार? हे निवडणूक आयोग आज जाहीर करणार आहे.

🟥कोणत्या राज्यात किती जागा

महाराष्ट्र विधानसभेत 288 सदस्य आहेत. महाराष्ट्रात सध्या महायुतीचे सरकार आहे. झारखंड विधानसभेत 81 सदस्य आहेत. या राज्यात 2019 मध्ये निवडणुका झाल्या होत्या. हरियाणामध्ये 90 जागा आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये 5 ऑगस्ट 2019 रोजी कलम 370 रद्द करण्यात आले. जम्मू-काश्मीर आणि लडाख या दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये हे राज्य विभागले गेले आहे. याआधी 2014 मध्ये येथे शेवटची निवडणूक झाली होती.

🔴काश्मीरमध्ये 90 जागांवर होणार मतदान.‌

जम्मू-काश्मीरमध्ये बराच काळापासून विधानसभा निवडणुका होऊ शकल्या नाहीत. मे 2022 च्या परिसीमनानंतर जम्मू-काश्मीर विधानसभेच्या जागांची संख्या आता 90 झाली आहे. त्यात जम्मूमध्ये 43 विधानसभा जागा तर काश्मीरमधील 47 विधानसभा जागा आहेत. 2014 मध्ये, लडाखमधील 6 जागांसह जम्मूमधील 37 जागा आणि काश्मीर खोऱ्यातील 46 जागांसह 87 विधानसभा जागांवर निवडणुका झाल्या होत्या.
🅾️9 ऑगस्ट रोजी मुख्य चुनाव आयुक्त राजीव कुमार यांनी अपल्या टीमसह जम्मू-कश्मीरचा दौरा केला होता. त्यावेळेस त्यांनी लवकरच निवडणुका होणार असल्याचे म्हटले होते. सर्वोच्च न्यायालयानेही जम्मू-कश्मीरमध्ये 30 सप्टेंबर 2024 पर्यंत विधानसभा निवडणुका घेण्याचे आदेश दिले होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.