🛑मृत्युंजयकार शिवाजीराव सावंत आजरा ग्रामीण रूग्णालयात आरोग्य योजनाचे उदघाटन.
🛑ग्राहकांची फसवणूक थांबली पाहिजे- प्रांताधिकारी मल्लिकार्जुन माने.
🛑”माझी शाळा माझा अभिमान” या उपक्रमांतर्गत व्यंकटराव प्रशाला ही नवरत्नांची जणू खाणच..
आजरा .- प्रतिनिधी.

आजरा तालुक्यातील मृत्युंजयकार शिवाजीराव सावंत आजरा ग्रामीण रूग्णालय येथे १५ ऑगस्ट २०२४ पासून महात्मा जोतीबा फुले जनआरोग्य योजना व आयुष्यमान भारत ह्या योजना एकत्रित पणे सुरू केल्याने एकून बाराशे शहान्न्व आजारावर उपचार केले जाणारं असल्याचे वैद्यकिय अधिकारी डाॅ. अमोल पाटील यांनी सांगितले तसेच ही योजना सर्व रेशन धारकांना उपयुक्त असल्याने तालुक्यातील सर्व ग्रामस्थांनी याचा लाभ घेण्याचा आवाहन केले. यावेळी सीएएच प्रक्रिया संवाद चे तालूका समन्वयक काशिनाथ मोरे यांनी शासनाच्या निर्णयाचे स्वागत करून , स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या, यावेळी त्यांनी महात्मा जोतीबा फुले जनआरोग्य योजनांची माहिती दिली. आरोग्य मित्र तुकाराम कामत यांनी या योजनेच्या उपचारादरम्यान लागणारी कागदपत्रे व नियमांची माहिती दिली.
🛑ग्राहकांची फसवणूक थांबली पाहिजे- प्रांताधिकारी मल्लिकार्जुन माने.
गडहिंग्लज . – प्रतिनिधी.

ग्राहक पंचायत महाराष्ट्र गडहिंग्लज, चंदगड व आजरा विभागाच्या वतीने ‘ग्राहक तक्रार निवारण केंद्र’ स्थापन करण्यात आले. प्रांताधिकारी गडहिंग्लज यांच्या हस्ते नाम फलकाचे उद्घाटन करण्यात आले.यावेळी प्रांताधिकारी म्हणाले, ग्राहकांना सेवा देताना बऱ्याच ठिकाणी फसवणूक होत असते. पण कोणाकडे दाद मागावी हे कळत नाही. त्यामुळे ग्राहकांना नेमके कोणाकडे जावे असा प्रश्न पडतो, अशावेळी या ग्राहक तक्रार निवारण केंद्राचा चांगला उपयोग ग्राहकांना होणार आहे. शासकीय पातळीवर लागणारे सहकार्य केंद्राला केली जाईल असे त्यांनी यावेळी सांगितले. शिवराज शिक्षण संकुलचे अध्यक्ष प्रा. किसनराव कुराडे म्हणाले, ग्राहकांची सेवा करण्याची संधी ग्राहक तक्रार कार्यकर्त्यांना मिळणार आहे. या कार्यासाठी सक्रिय सहभाग घेऊन याभागात ग्राहक चळवळ चांगली वाढीस लावण्यासाठी प्रयत्न करूया.
तहसीलदार ऋषिकेत शेळके म्हणाले, ‘शासकीय पातळीवर 24 डिसेंबर व 15 मार्च रोजी ग्राहक दिनाचे कार्यक्रम घेतले जातात. शासकीय पातळीवर पण या केंद्रामुळे ग्राहकांना चांगला न्याय मिळणार आहे व जास्तीत जास्त ग्राहकांच्या पर्यंत सेवा देण्याचे काम होणार आहे.’
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्राहक पंचायत महाराष्ट्रचे जिल्हा अध्यक्ष बी. जे. पाटील होते. प्रमुख उपस्थिती गडहिंग्लजचे तहसीलदार तसेच पुरवठा विभागाचे प्रमुख, पशुवैद्यकीय विभागाचे अधिकारी, सरकारी बँकांचे प्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते बाळेश नाईक, सुरेश पवार , ग्राहक पंचायतीचे विभाग प्रमुख शिवाजी गुरव, आजरा तालुका अध्यक्ष महादेव सुतार, चंदगड तालुक्याचे अध्यक्ष अर्जुन गावडे गडहिंग्लजचे अध्यक्ष ईश्वर देसाई, उपाध्यक्ष तानाजी कुराडे, डॉ. महादेव ढोकरे – पाटील, महादेव शिंगे, अनिल शिंदे सचिन लोहार, रोहिणी चौगुले, आशा ढोकरे, विशाल गुरव यांच्यासह ग्राहक चळवळीचे तीन तालुक्याचे पदाधिकारी व ग्राहक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
स्वागत सचिव अनिल कलगुटगी यांनी केले. प्रास्ताविक ऍड. विवेक पाटील यांनी केले. आभार महादेव शिंगे यांनी मानले.
🛑”माझी शाळा माझा अभिमान” या उपक्रमांतर्गत व्यंकटराव प्रशाला ही नवरत्नांची जणू खाणच..
आजरा.- प्रतिनिधी.

१५ ऑगस्ट. ७८ व्या भारतीय स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून “माझी शाळा माझा अभिमान” या उपक्रमांतर्गत व्यंकटराव प्रशाला ही नवरत्नांची जणू खाणच आहे.. ‘मृत्युंजय’ कार शिवाजीराव सावंत याच्यासारखी महान रत्ने याच प्रशालेमध्ये घडली.आजरा महाल शिक्षण मंडळ आजराचे अध्यक्ष जयवंत शिंपी यांचे प्रोत्साहनातून व संचालक अभिषेक शिंपी यांच्या मार्गदर्शनातून प्रशालेसमोर हा डिजिटल फलक लावण्यात आला. यावेळी सचिव एस पी कांबळे, संचालक सचिन शिंपी, पांडुरंग जाधव, सुनील देसाई, प्राचार्य आर जी कुंभार, ए. ए. पाटील, श्री नाईक, श्री कासार सर उपस्थित होते.