🛑रवळनाथ पतसंस्थेचे ध्वजारोहण ज्येष्ठ सभासदांच्या हस्ते.-
अध्यक्ष शिंपी यांचा स्तुत्य निर्णय तालुक्यातून कौतुक.
🛑🇮🇳आजरा मडिलगेत ज्येष्ठ नागरिक दत्तू पाटील वय. ९८ यांच्या हस्ते ध्वजारोहण उत्साहात संपन्न.
आजरा.- प्रतिनिधी.

मडिलगे ता. आजरा येथील ग्रामपंचायत वतीने १५ ऑगष्ट २०२४ रोजी झेंडावंदन ज्येष्ठ नागरिक दत्तू बाबू पाटील – जन्म ५/११/१९२७ वय ९८ वर्षे माजी तलाठी – शिरसंगी, मास्तर – आजरा, देश स्वातंत्र्य काळातील साक्षीदार असा त्यांचा परिचय आहे. १५ ऑगस्ट रोजी ग्रामपंचायत पटांगणात मोठ्या उत्साहात ध्वजारोहण करण्यात येते. प्राथमिक व माध्यमिक शाळेच्या वतीने समूहगीत राष्ट्रगीता नंतर सादर केले जाते.
१५ ऑगस्ट २०२४ या ध्वजारोहण करण्यासाठी प्रथमच ज्येष्ठ नागरिकाची सरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांच्यावतीने एक चांगला निर्णय घेतला. या निर्णयाचे कौतुक होत आहे. या ध्वजारोहण कार्यक्रमासाठी. सरपंच बापू निऊगरे, उपसरपंच पांडुरंग जाधव, सर्व ग्रामपंचायत सदस्य व आजी-माजी सरपंच उपसरपंच सदस्य, गावातील विविध संस्थेचे पदाधिकारी विविध पक्षाचे पदाधिकारी, प्राथमिक माध्यमिक सर्व मुख्याध्यापक व स्टाफ अंगणवाडी सेविका मदतनीस आरोग्य विभाग, अशा सेविका, आजी माजी सैनिक गावातील ज्येष्ठ नागरिक युवक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सरपंच श्री. निऊगरे यांनी मनोगत व्यक्त केले व गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन सन्मान करण्यात आला. सूत्रसंचालन माजी सरपंच शिवाजी गुरव यांनी केले. आभार उपसरपंच श्री जाधव यांनी मानले.
🛑रवळनाथ पतसंस्थेचे ध्वजारोहण ज्येष्ठ सभासदांच्या हस्ते.-
अध्यक्ष शिंपी यांचा स्तुत्य निर्णय तालुक्यातून कौतुक.
आजरा : प्रतिनिधी.

आजऱ्यातील रवळनाथ पतसंस्थेत स्वातंत्र्यदिनी होणारे ध्वजारोहण ज्येष्ठ सभासद व संस्थापक संचालक देगा शाहू डिसोझा, रा आजरा यांच्या हस्ते करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष अभिषेक शिंपी यांनी आपण स्वतः ध्वजारोहण न करता ज्येष्ठ सभासदांच्या हस्ते ध्वजारोहण करण्याचा घेतलेला निर्णय कौतुकास्पद आहे. अध्यक्ष श्री. शिंपी यांनी संस्थेच्यावतीने आगळा-वेगळा उपक्रम राबवून तालुकावासियांसमोर एक नवा आदर्श घालून दिला असून त्यांच्या या मोठ्या मनाने घेतलेल्या निर्णयाने त्यांच्यासह संस्थेचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.
श्री रवळनाथ पतसंस्थेच्यावतीने स्वातंत्रदिनानिमित्त होणारा ध्वजारोहणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात झाला. संस्थेच्यावतीने दरवर्षी प्रजासत्ताकदिनी व स्वातंत्रदिनी होणारा ध्वजारोहणाचा कार्यक्रम विद्यमान अध्यक्षांच्या हस्ते केला जातो. यंदा संस्थेचे नुतन अध्यक्ष अभिषेक शिंपी यांनी आपण स्वतः ध्वजारोहण न करता ज्येष्ठ सभासदांच्या हस्ते ध्वजारोहण करण्याचा निर्णय घेतला व त्यांनी हा पहिला मान देगा शाहू डिसोझा यांना दिला. यावेळी बोलताना अध्यक्ष. श्री. शिंपी म्हणाले, समाजात आपण जे ताठ मानेने आणि अभिमानाने जगतो त्यासाठी अनेक मोठ्या लोकांचे योगदान आहे आणि ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करणे हे आपले नैतिक मुल्य आहे याची जाणीव आताच्या पिढीला कळावी या हेतूने हा निर्णय घेतला असल्याचे स्पष्ट करून यापुढील काळातही असेच विविध उपक्रम राबविण्याचा आपला संकल्प असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी ज्येष्ठ नागरिक डिसोझा यांचा सत्कार करण्यात आला. आपल्याला हा ध्वजारोहणाचा बहुमान दिल्याबद्दल ज्येष्ठ सभासद डिसोझा यांनी आभार मानले. अध्यक्ष श्री. शिंपी यांनी घेतलेल्या या कौतुकास्पद निर्णयाचे तालुकावासियांकडून समाधान व्यक्त केले जात असून या परिवर्तनवादी उपक्रमाची तालुक्याभर सकारात्मक चर्चा सुरु झाली आहे. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष समीर गुंजाटी, सर्व संचालक, शहरातील प्रतिष्ठित व्यापारी मंडळी, जेष्ठ मान्यवर व संस्था कर्मचारी उपस्थित होते.