Homeकोंकण - ठाणे'सुप्रिया विरुद्ध सुनेत्राला उभं करणं ही माझी चूक.🅾️अजित पवार यांचं जन सन्मान...

‘सुप्रिया विरुद्ध सुनेत्राला उभं करणं ही माझी चूक.🅾️अजित पवार यांचं जन सन्मान यात्रेदरम्यान मोठं वक्तव्य.🟥माणगाव येथील तरुण वसंत उर्फ सागर भगे यांना विद्युत तारांच्या जाळ्याचा शाॅक देऊन ठार केल्याप्रकरणी मयतच्या पत्नीसह सासू सासऱ्यांवर वेंगुर्ले पोलीसांनी गुन्हे दाखल करून केली अटक…

🟥’सुप्रिया विरुद्ध सुनेत्राला उभं करणं ही माझी चूक.
🅾️अजित पवार यांचं जन सन्मान यात्रेदरम्यान मोठं वक्तव्य.
🟥माणगाव येथील तरुण वसंत उर्फ सागर भगे यांना विद्युत तारांच्या जाळ्याचा शाॅक देऊन ठार केल्याप्रकरणी मयतच्या पत्नीसह सासू सासऱ्यांवर वेंगुर्ले पोलीसांनी गुन्हे दाखल करून केली अटक…

मुंबई.- प्रतिनिधी.

🟣सध्या राज्यभरात विधानसभा निवडणूकीचे वारे वाहत आहेत. सर्वच पक्ष आणि त्यांचे नेते महाराष्ट्र पिंजून काढत आहेत. अजित पवारही त्यांच्या नियोजित ‘जन सन्मान यात्रे’वर निघाले आहेत.त्यादम्यान, अजित पवारांनी जनतेला भावनिक साद दिली. लोकसभा निवडणूक 2024 मध्ये बहिण ‘सुप्रिया सुळे विरोधात पत्नि सुनेत्रा पवार यांना उभे करून चूक झाली, राजकारण घरात येऊ देऊ नये’, असे अजित पवार यांनी म्हटले आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये बारामती मतदारसंघात सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्यात चुरशीची लढत झाली होती. ही लढत संपूर्ण राज्यामध्येच चर्चेचा विषय ठरली होती.
🅾️निवडणूकीवेळी दोन्ही बाजूंनी अनेक आरोपप्रत्यारोप करण्यात आले होते. पत्नी सुनेत्रा पवार यांच्यासाठी अजित पवार यांच्यासह महायुतूने मोठी तागद लावली होती. मात्र, दोन टर्म खासदार राहिलेल्या सुप्रिया सुशळे यांनी त्यांचा मतदारसंघ सुनेत्रा पवार यांच्या ताब्यात जावू दिला नाही. मोठ्या मताधिक्याने त्या विजयी झाल्या होत्या.
🔴गेल्या वर्षी जुलैमध्ये, अजित पवार इतर आमदारांसह शिवसेना-भाजप सरकारमध्ये सामील झाले होते. त्यामुळे शरद पवार यांनी स्थापन केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली. निवडणूक आयोगाने नंतर अजित यांच्या नेतृत्वाखालील गटालाच खरी राष्ट्रवादी म्हणून घोषित केले. ‘माझ्या सर्व बहिणींवर माझे प्रेम आहे.घरात राजकारण येऊ देऊ नये. माझ्या बहिणीविरुद्ध सुनेत्रा यांना निवडणूकाच्या मैदानात उतरवण्याची चूक मी केली आहे. असे व्हायला नको होते. पण राष्ट्रवादीच्या संसदीय मंडळाने निर्णय घेतला.
🟥मला वाटते. ते चुकीचे होते,’ असे अजित पवार म्हणाले. काही दिवसांवर रक्षाबंधन येऊन ठेपला आहे. त्यावेळी सुप्रिया सुळे यांच्याकडून राखी बांधून घेणार का असे विचारले आसता. ‘सध्या दौऱ्यावर आहेत आणि त्या दिवशी जर सगळे एकाच ठिकाणी असतील तर तो त्यांना नक्कीच भेटेल’, असे ते म्हणाले. ‘जन सन्मान यात्रेत केवळ शेतकरी, महिला आणि तरुणांसाठीच्या विकास आणि कल्याणकारी योजनांवर बोलण्याचा निर्णय घेतला आहे’, माझ्यावर झालेल्या टीकेला उत्तर देण्यासाठी ही यात्रा नाही. असे अजित पवार म्हणाले

🟥माणगाव येथील तरुण वसंत उर्फ सागर भगे यांना विद्युत तारांच्या जाळ्याचा शाॅक देऊन ठार केल्याप्रकरणी मयतच्या पत्नीसह सासू सासऱ्यांवर वेंगुर्ले पोलीसांनी गुन्हे दाखल करून केली अटक…

वेंगुर्ले :- प्रतिनिधी

Oplus_0

वेंगुर्ले तालुक्यातील आडेली सातेरी गाळू येथे सासरवाडीच्या मालकीच्या जागेत राहत्या घराच्या कंपाउंड मधील नर्सरीत कुडाळ तालुक्यातील माणगाव तळीवाडी येथील तरुण वसंत उर्फ सागर प्रभाकर भगे वय ३२ यांना त्यांच्या पत्नीने तसेच सासू सासऱ्याने आडेली येथे बोलावून घेऊन घराच्या कंपाउंड भोवती विद्युत तारेचे जाळे तयार करून त्या विद्युत तारांच्या जाळ्यांचा शाॅक देऊन ठार मारले असून त्यांचा खुन केला आहे.वेंगुर्ले पोलीसांनी मयत वसंत उर्फ सागर भगे यांची पत्नी नुतन शंकर गावडे (सुप्रिया सागर भगे) वय २८, सासरा शंकर सखाराम गावडे वय ६० व सासू पार्वती शंकर गावडे वय ५५ सर्व राहणार आडेली सातेरी गाळू या तिघांविरुद्ध गुन्हे दाखल करून अटक केली आहे.उद्या बुधवारी या तिघांना वेंगुर्ले न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
🔴दरम्यान मयत सागर भगे यांचा भाऊ संगम प्रभाकर भगे यांनी वेंगुर्ले पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीमध्ये असे म्हटले आहे की, आडेली सातेरीगाळू येथे रहाणारी नूतन शंकर गावडे, वय २८ वर्षे हिच्याशी २४ डिसेंबर २०२३ रोजी सागर याचे लग्न झाले. लग्नानंतर नूतन हिचे नाव सुप्रिया असे ठेवण्यात आले. नुतन गावडे ही आमच्या घरी माणगाव तळीवाडी येथे तिच्या सासरी रहाण्यास आली, परंतु लग्नानंतर सुमारे ४ ते ५ दिवसानंतर तीने भाऊ सागर याच्याशी तु इथे रहायचे नाही, तु माझ्या सोबत माहेरी रहायचे असे सांगून भांडण केले व ती आपल्या माहेरी आडेली येथे निघून गेली. त्यानंतर भाऊ वसंत याने तिला समजविण्याचा खूप प्रयत्न केला. परंतु ती सासरी यायला तयार होत नसल्याने, भाऊ सागर याने तिच्या हटटापोटी तिच्या सोबत आडेली येथे रहाण्याचा निर्णय घेवून, तो तिच्या सोबत राहू लागला.काही दिवसांनी नूतन ही तिच्या वडीलांसोबत सासरी आमच्या घरी आली आणि तिने लग्नात दिलेल्या चिजवस्तु दागिने वगैरे घेवून टी परत आपल्या माहेरी निघून गेली. याबत कामावरून आल्यावर सागर याने या प्रकाराबाबत पत्नीला विचारले असता पत्नी नूतन व तिच्या आई वडीलांनी त्याला मारहाण केली. त्यानंतर सदरचे प्रकरण वेंगुर्ला पोलीस ठाणे येथे आले. तेथे सदर प्रकरण सागर याने सामोपचाराने मिटविले. त्या नंतर नूतन सोबत नांदावयाचे असल्याने, त्याने वेळोवेळी मध्यस्ती घालून, नुतन हिला आपल्या सोबत रहा असे सांगण्याचे प्रयत्न केले. परंतु नुतन त्याच्या सोबत रहाण्यास तयार झाली नाही. परंतु भाऊ सागर याला नुतन ही अधून मधून फोन करुन त्याच्या सोबत बोलत होती असे म्हटले आहे.
🟥दरम्यान काल १२ ऑगस्ट रोजी रात्री पत्नी नूतन गावडे हिने आडेली येथे घरी बोलावले म्हणून सागर हा दोन मित्रांसमवेत कार मधून रात्री १२.३० वा. च्या सुमारास आडेली सातेरी गाळु येथे गेले. त्यानंतर भाऊ सागर याने त्यांना लांब उभे रहाण्यास सांगितले व तो आडवाटेने नुतन हिच्या घराकडे गेला. त्याला जावून बराच कालावधी होवून देखील तो परत न आल्याने बरोबर गेलेल्या दोघांनी त्याला बऱ्याच हाका मारल्या, परंतु सागर हा सकाळी ४.०० वाजले तरी बाहेर येत नसल्याचे त्यांनी ही बाब गावात कळविली. सकाळी ६.३० वा. च्या दरम्याने आडेली सातेरी गाळू येथे आपण व काही ग्रामस्थ गेलो. आणि तेथून या घटनेबाबत वेंगुर्ले पोलीस ठाण्यात कळविले. पोलीस आल्यावर त्यांच्या सोबत आम्ही नुतन गावडे हिच्या घरी गेलो. तेथे नुतन शंकर गावडे, तिचे वडील शंकर सखाराम गावडे व तिची आई पार्वती शंकर गावडे होते. त्यांना भाऊ सागर कोठे आहे? याबाबत विचारले मात्र त्यांनी आपणास माहित नाही असे सांगितले. त्यामुळे आम्ही सर्वांनी त्यांच्या कंम्पाउंडमध्ये शोध घेतला असता, सागर याचा मृतदेह कंपाउंड मध्ये विद्युत तारा लागलेल्या स्थितीत आढळून आला. त्यामुळे विदयुत तारांचा शॉक देवून त्यांनी सागर याला ठार मारले आहे, असे त्यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे. या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून त्या तिघांनाही ताब्यात घेतले आहे. अशी माहिती वेंगुर्ल्याचे पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांनी दिली.
🟣घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधीक्षक घनश्याम आडाव यांनी भेट देऊन माहिती घेतली. यावेळी वेंगुर्ला पोलीस निरीक्षक संदीप भोसले, उपनिरीक्षक ज्ञानदेव गवारे, हेड कॉन्स्टेबल योगेश सराफदार, सुरेश पाटील, भगवान चव्हाण, कॉन्स्टेबल अमर कांडर, राहुल बर्गे, काशी पाटकर, चालक रमेश तावडे यांनी दाखल होत अधिक तपास केला. या घटनेनंतर ओरोस येथील रासायनिक विश्लेषक टीमला पाचारण करण्यात आले. या टीम मधील सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत मागाडे, हवालदार संतोष सावंत, पोलीस नाईक कमलेश सोनवणे यांनी मृतदेहाचा अधिक तपास करत घटनास्थळी मिळालेले विविध पुरावे वेंगुर्ला पोलिसांकडे सुपूर्द केले. तसेच घटनास्थळी वेंगुर्ला वीज वितरण चे उपकार्यकारी अभियंता ए. व्ही. कौरवार, ज्युनियर इंजिनिअर अक्षय पावसकर, इलेक्ट्रिक इन्स्पेक्टर श्री. कुंभार यांनी दाखल होत विद्युत वाहिन्याबाबत तपास केला.

Previous article
Next article
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.