Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रगव्याला चुकविता.- झाला अपघात. - देवकांडगाव ता. आजरा नजीक दुर्घटना एक मयत...

गव्याला चुकविता.- झाला अपघात. – देवकांडगाव ता. आजरा नजीक दुर्घटना एक मयत एक जखमी.

गव्याला चुकविता.- झाला अपघात. – देवकांडगाव ता. आजरा नजीक दुर्घटना एक मयत एक जखमी.

आजरा.- प्रतिनिधी.

गव्या रेड्याला चुकविता देवकांडगाव ता. आजरा नजीक अपघातात दुर्घटना एक मयत एक जखमी असा अपघात झाला आहे.‌
गोव्याच्या दिशेने सिमेंटचे पाईप वाहून नेणारी गाडी रस्त्यावर आलेल्या गव्याला चुकवताना पलटी झाल्याने महादेव पोपट मोरे (वय ३६, रा. निरंकार कॉलनी, संजय नगर, सांगली) यांचा जागीच मृत्यू झाला. तर यश नामदेव सावंत (वय २१, रा. संजय नगर, सांगली) हा गंभीर जखमी झाले असून त्याला उपचारासाठी गडहिंग्लज येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मंगळवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास सांगली येथून सिमेंट पाईप भरून सदर वाहन गोव्याच्या दिशेने निघाले असता देवकांडगाव नजिक समोर गवा आल्याने वाहनचालक गव्याला चुकवण्याच्या प्रयत्नात असताना वाहन पलटी झाले असल्याचे सांगण्यात येते.
आजरा पोलीस घटनास्थळी दाखल होऊन अधिक तपास करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.