Homeकोंकण - ठाणेनगराध्यक्षांचा कालावधी अडीच वर्षांवरून पाच वर्षांवर.{ शिंदेंच्या कॅबिनेटने घेतले ८ महत्वाचे निर्णय..}(...

नगराध्यक्षांचा कालावधी अडीच वर्षांवरून पाच वर्षांवर.{ शिंदेंच्या कॅबिनेटने घेतले ८ महत्वाचे निर्णय..}( नगराध्यक्षांचा कालावधी अडीचऐवजी ५ वर्षे.-तर दुध उत्पादकांसाठी अत्यंत घेतला महत्त्वाचा निर्णय.)🟥मुलींना मोफत उच्च शिक्षणाबाबत अडचण आल्यास हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क करा.- उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांचे आवाहनउच्च शिक्षण विभागाकडून मदतीसाठी पोर्टलचीही सुविधा.🛑महाराष्ट्र टॅलेंट सर्च एक्झामिनेशनमध्ये ‘व्यंकटराव हायस्कूल,आजराचे’ नेत्रदीपक यश.( गुणवत्ता यादीमध्ये तब्बल ७४ विद्यार्थी…)

🟥नगराध्यक्षांचा कालावधी अडीच वर्षांवरून पाच वर्षांवर.
{ शिंदेंच्या कॅबिनेटने घेतले ८ महत्वाचे निर्णय..}
( नगराध्यक्षांचा कालावधी अडीचऐवजी ५ वर्षे.-
तर दुध उत्पादकांसाठी अत्यंत घेतला महत्त्वाचा निर्णय.)
🟥मुलींना मोफत उच्च शिक्षणाबाबत अडचण आल्यास हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क करा.- उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांचे आवाहन
उच्च शिक्षण विभागाकडून मदतीसाठी पोर्टलचीही सुविधा.
🛑महाराष्ट्र टॅलेंट सर्च एक्झामिनेशनमध्ये ‘व्यंकटराव हायस्कूल,आजराचे’ नेत्रदीपक यश.( गुणवत्ता यादीमध्ये तब्बल ७४ विद्यार्थी…)

मुंबई :- प्रतिनिधी.

विधानसभा निवडणूक जवळ येऊ लागताच शिंदे सरकार विरोधकांना अडचणीत आणण्यासाठी एका मागोमाग एक असे धडाधड निर्णय जाहीर करत सुटले आहे.तर येत्या काही महिन्यांत विधानसभा निवडणूक असल्याने आता होणारी मंत्रिमंडळाची प्रत्येक बैठक ही महत्त्वपूर्ण मानली जात आहे.त्यामुळे आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्य सरकार काय निर्णय घेणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या कॅबिनेटच्या बैठकीत एकूण ८ महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.
🟥राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेतल्या जात नाहीत. यामुळे विरोधक पराभवाच्या भीतीने सरकार टाळत असल्याची टीका करत आहेत.अशातच शिंदे सरकारने नगराध्यक्षांचा कालावधी अडीच ऐवजी पाच वर्ष करण्यास मंजुरी दिली आहे. तसेच विदर्भ मराठवाड्यासाठी दोन निर्णय घेण्यात आले आहेत.त्यानुसार विदर्भ आणि मराठवाड्यात दुग्ध विकासाला गती देण्यासाठी राज्य सरकारने 149 कोटी रुपयांच्या निधी मंजूर केला आहे.तर मराठवाड्यातील खालसा झालेल्या वर्ग दोनच्या इनाम व देवस्थानच्या जमिनी वर्ग एक करण्याचा निर्णय घेण्यात आला असून याचा लाखो नागरिकांना लाभ होणार आहे.या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित होते.

🛑शिंदेंच्या मंत्रिमंडळाने घेतलेले ८ निर्णय…

(पशूसंवर्धन व दुग्धविकास)

१)विदर्भ व मराठवाड्यात दुग्ध विकासाला गती देणार आहे. यासाठी १४९ कोटींची मान्यता देण्यात आली आहे.

( महसूल विभाग)

२)मराठवाड्यातील खालसा झालेल्या वर्ग दोनच्या इनाम व देवस्थानच्या जमिनी वर्ग एक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे लाखो नागरिकांना लाभ होणार आहे.

(उच्च व तंत्र शिक्षण विभाग)

३)डेक्कन कॉलेज, गोखले अर्थशास्त्र व राज्यशास्त्र संस्था, टिळक महाराष्ट्र विद्यापीठातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना वैद्यकीय प्रतिपूर्ती योजना लागू केली जाणार आहे.

( सहकार विभाग)

४)यंत्रमागांना अतिरिक्त वीजदर सवलतीसाठी नोंदणीची अट मार्च २०२५ पर्यंत शिथील करण्यात आली आहे.

(वैद्यकीय शिक्षण विभाग)

५)शासकीय, खासगी वैद्यकीय महाविद्यालयाच्या निवृत्त अध्यापाकाना ठोक मानधन देण्यात येणार आहे.

( सार्वजनिक बांधकाम विभाग)

६)सहा हजार किमी रस्त्यांचे डांबरीकरणाऐवजी सिमेंट काँक्रीटीकरण. सुधारित ३७ हजार कोटी खर्चास मान्यता देण्यात आली.

( नगरविकास विभाग)

७)नगराध्यक्षांचा कालावधी अडीच ऐवजी पाच वर्षांचा करण्यात आला आहे.

( ऊर्जा विभाग)

८)सौर ऊर्जा प्रकल्पांच्या कर्जासाठी केएफ डब्ल्यू कंपनीशी स्थिर व्याजदराने करार करण्यात आला आहे.

🟥मुलींना मोफत उच्च शिक्षणाबाबत अडचण आल्यास हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क करा.- उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांचे आवाहन
उच्च शिक्षण विभागाकडून मदतीसाठी पोर्टलचीही सुविधा.

मुंबई :- प्रतिनिधी.

नवीन शैक्षणिक धोरणानुसार व्यावसायिक शिक्षणातील मुलींचे प्रमाण वाढावे आणि मुलींना समप्रमाणात शिक्षणाच्या व्यापक संधी उपलब्ध होण्यासाठी राज्य शासनाने मुलींना व्यावसायिक उच्च शिक्षण मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. कौटुंबिक आर्थिक परिस्थितीमुळे उच्च शिक्षणापासून वंचित राहण्याची शक्यता असलेल्या मुलींना या निर्णयामुळे निश्चितच मोठी संधी उपलब्ध होणार आहे.
🟪वार्षिक उत्पन्न 8 लाख किंवा त्यापेक्षा कमी असलेल्या पालकांच्या मुलींचे पदवी, पदविका व पदव्युत्तर पदवीचे शिक्षण मोफत देण्यात येत आहे. या योजनेचा लाभ घेताना विद्यार्थिनींना काही अडचणी आल्यास त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी उच्च शिक्षण विभागाने हेल्पलाईन क्रमांक व हेल्प डेस्क सुरू केला आहे. ही हेल्पलाईन 0796134440, 07969134441 या क्रमांकावर आणि helpdesk.maharashtracet.org यावर संपर्क करावा, ही हेल्पलाईन कार्यालयीन दिवशी सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यत कार्यरत आहे. या हेल्पलाईनचा उपयोग करावा, असे आवाहन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.
🔴यासंदर्भात मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, या योजनेसाठी https://mahadbt.maharashtra.gov. in पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करू शकतात. राज्यातील शासकीय महाविद्यालये, शासन अनुदानित अशासकीय महाविद्यालये, अंशत: अनुदानित (टप्पा अनुदान) व कायम विनाअनुदानित महाविद्यालये / तंत्रनिकेतने/सार्वजनिक विद्यापिठे, शासकीय अभिमत विद्यापीठे (खाजगी अभिमत विद्यापीठे/स्वयं अर्थ सहाय्यित विद्यापीठे वगळून) व सार्वजनिक विद्यापीठांतर्गत येणाऱ्या उपकेंद्रामधील मान्यताप्राप्त व्यावसायिक अभ्याक्रमांना प्रवेश घेणाऱ्या मुलींना वार्षिक शैक्षणिक व परीक्षा शुल्क या योजनेद्वारे 100 टक्के मोफत करण्यात आले आहे.
🟥शैक्षणिक वर्ष सन 2024-25 व त्यापूर्वी ज्या मुलींनी प्रवेश घेतलेला आहे, सध्या विविध शैक्षणिक अभ्यासक्रम शिकत असलेल्या मुलींना अशा सर्व पात्र मुलींना या योजनेचा लाभ मिळणार आहे. ज्या विद्यार्थीनींनी प्रवेशासाठी पैसे भरले असतील त्यांना भरण्यात आलेले पैसे परत करण्यात येणार आहेत. त्यासाठी पात्र मुलींना रक्कम प्राप्त करुन घेण्यासाठी त्यांचे बॅंक खाते आधार क्रमांकाशी संलग्न असणे गरजेचे आहे.
🔴या योजनेचा अर्ज भरताना काही अडचण आल्यास संबधित महाविद्यालयाचे प्राचार्य/नोडल अधिकारी, विभागीय सहसंचालक कार्यालयातील नोडल अधिकारी किंवा महाआयटीच्या पोर्टलवरील Grieviance Section मध्ये नोंद करावी. या योजनेची माहिती महाडीबीटी पोर्टल https://mahadbt.maharashtra. gov.in , उच्च शिक्षण संचालनालयाचे संकेतस्थळ https://dhepune.gov.in , तंत्र शिक्षण संचालनालयाचे संकेतस्थळ https://www.dtemaharashtra.gov.in, कला संचालनालयाचे https://doa.maharashtra. gov.in या सर्व अधिकृत संकेतस्थळांवर उपलब्ध आहे.
🟥मंजूर शिष्यवृत्ती सत्र निहाय दोन टप्प्यात बँक खात्यात जमा केली जाणार आहे. शासनाच्या विविध शिष्यवृत्ती योजनांपैकी केवळ कोणत्याही एकाच योजनेंतर्गत लाभ मिळण्यास संबंधित विद्यार्थीनी पात्र असणार आहे, असेही मंत्री श्री.पाटील यांनी सांगितले.

🛑महाराष्ट्र टॅलेंट सर्च एक्झामिनेशनमध्ये ‘व्यंकटराव हायस्कूल,आजराचे’ नेत्रदीपक यश.( गुणवत्ता यादीमध्ये तब्बल ७४ विद्यार्थी…)

आजरा.- प्रतिनिधी.

मॉडर्न एज्युकेशन सोसायटी संचलित सेंटर फॉर टॅलेंट सर्च अँड एक्सलन्सद्वारे महाराष्ट्र टॅलेंट सर्च एक्झामिनेशन संपूर्ण राज्यामध्ये शासन मान्यताप्राप्त स्पर्धापरीक्षा आयोजित केली जाते. व्यंकटराव हायस्कूलच्या आठवी ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी राज्य, जिल्हा, तालुका व स्पेशल प्राईस व कन्सोलेशन प्राईस गुणवत्ता यादीमध्ये एकूण ७४ विद्यार्थ्यांनी स्थान पटकाविले. या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला.
सर्व विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र व गुणपत्रक देऊन गौरविण्यात आले. यशवंत व किर्तीवंत विद्यार्थी …. यामध्ये
इयत्ता आठवी मधील विद्यार्थी
आजगेकर माधवी जीवन, भोसले अंशुमन हिम्मत, देसाई ऋषा मनोज, देशमुख रिया अरविंद, गिरी शलाका ओंकार, हुबळे कार्तिक सुरेश, केंबळे आर्यन अमर, मोटे ईशान सुरजीत, नाईक सृष्टी संजीव, पाटील प्रणव भगवान,सावंत अवधूत अमित, शेख जुवेरिया समीर, येसने प्रेम रमेश. तसेच
इयत्ता नववी मधील विद्यार्थी.
बागडी जानवी सुशांत, चिमणे अक्षता रघुनाथ,चौगुले विठ्ठल संदीप,देसाई संयोगिता मदन, देसाई उत्कर्षा दिगंबर, देसाई यशिता नंदकुमार, दळवी ओमकार प्रभाकर, डोणकर अमोल महेश, दोरुगडे सुजल सूर्यकांत, गिलबिले असावरी अशोक, गोरे शर्वरी विजय, गुरव गुरुदास पंढरीनाथ, गुरव कौस्तुभ राजेंद्र, गुरव सोनाक्षी संजय, गुरव वेदिका शांताराम, होरटे दिव्या परशराम, इलगे स्नेहल सागर, जाधव अर्णव दत्तात्रय, जाधव राजलक्ष्मी ज्ञानदेव, कांबळे ऋषिकेश भगवान, कानडे आर्यन नारायण, कविटकर शार्दुल लक्ष्मण, केसरकर समीक्षा संदीप, कोलते हर्षवर्धन किरण, कोलते वैष्णवी प्रकाश, कुंभार ईश्वरी महादेव, कुंभार श्रेयस सचिन,मस्करे तनवी अनिल, मुळीक श्रेया तानाजी, नरके तेजस्विनी विकास, निकम रिया बाबुराव, पंडित तनवी रवींद्र, पाटील आदिती अंकुश, पाटील गंधर्वराज दत्तात्रय, पाटील गौरव भारत, पाटील प्रथमेश विजय, पाटील प्रीती प्रभाकर, पाटील श्रेया संजय, पेडणेकर प्रणव बाळकृष्ण, पोतनीस श्रावणी शंकर, पवार वैष्णवी सदानंद, प्रभु गौरव तुकाराम, राणे श्रीकृष्ण चंद्रकांत, सासुलकर प्राची धनाजी, सावरकर शुभम राजेंद्र, सय्यद असद महंमद युनूस, सोनार समर्थ संदीप,वेंगुळकर सिद्धी संदीप. तर
इयत्ता दहावी मधील विद्यार्थी
हेबाळकर अनुष्का उदय, जोशीलकर मैथिली रविराज, खवरे कादंबरी जयदीप, खोराटे निवेदिता नितीन, लांडे संचिता संजय,नवार राखी राजू, पंडित सिद्धी सुभाष, पाटील आदित्यराज दीपक, पाटील गायत्री बाबासो, राठोड मेघा राजू, सावंत अपूर्वा अमित, शिवणे समृद्धी सुरेश, येरुडकर मेघा श्रीधर. या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन श्री. देसाई, प्रशांत गुरव, अस्मिता पाटील, महेश यलगार या मार्गदर्शन शिक्षकांचे लाभले. प्राचार्य आर.जी. कुंभार, पर्यवेक्षिका व्ही.जे.शेलार यांचे प्रोत्साहन लाभले. आजरा महाल शिक्षण मंडळ आजराचे अध्यक्ष जयवंतराव शिंपी व सर्व संचालक यांची प्रेरणा मिळाली याबाबतचे प्रसिद्धीपत्रक प्राप्त झाले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.