🛑आजरा तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघ वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न.
🛑आजरा बस स्थानकावरील कचरा उठाव आंदोलनाला.- बहुजन मुक्ती पार्टीच्या यश.
आजरा.- प्रतिनिधी.

आजरा येथील आजरा तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघ वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न झाली. अध्यक्षस्थानी चेअरमन विठ्ठलराव देसाई होते. स्वागत व प्रस्ताविक व अहवाल वाचन मॅनेजर जनार्दन बामणे यांनी केले. यावेळी बोलताना चेअरमन श्री देसाई म्हणाले. संस्थेच्या दि. ३१/०३/२०२४ रोजी संपलेल्या आर्थिक राहिल्या बहवासी लेखापरिक्षण अहवाल, ताळेबंद नफा तोटा पत्रक व इतर विषय मा. संचालक मंडळर्थिक बाबा अहवालाना व आपल्याशी संवाद साधताना अतिशय आनंद होत आहे. मी संचालक मंडळाच्या वतीने आपणा सर्व सभासदांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो व आपण आज अखेर केलेल्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त करतो.
संस्थेची स्थापना २३ डिसेंबर १९५९ साली कै. अमृतराव (काका) देसाई यांनी केली व कै. राजारामबापू देसाई यांच्या विचाराने व अत्यंत काटकसरीने व निष्ठेने संघाचा कारभार मा. संचालक मंडळ अत्यंत पारदर्शकपणे संस्थेचा कारभार करत आहेत. शेतकरी सभासद व ग्राहकांच्या सोईसाठी व आर्थिक उन्नतीसाठी हातभार लावणे या उदात्त हेतूने संस्थेचे कामकाज चालले आहे. शेतकरी व ग्राहकांच्या हीतासाठी संघाने स्वःत १८:१८:१० या ‘शेतकरी छाप’ मिश्रखताचे गुणवतापूर्वक उत्पादन करत आहे व त्यास तालुक्यातील शेतकऱ्यांची चांगली मागणी आहे.
सभासद व भागभांडवल
३१ मार्च २०२४ रोजी संस्थेचे वसूल भागभांडवल ३५,७०,९२०/- इतके आहे.
राखीव व इतर निधी
अहवाल सालाच्या सुरवातीला राखीव व इतर निधी २,५२,७७,५५९-६७ चे होते. त्यामध्ये २१,०१,८०२.०० ने वाढ होवून दि. ३१/०३/२०२४ रोजी एकून निधी २,७३,५९,३६१.६७ चे झाले आहेत.
‘शेतकरी’ छाप हात मिश्रखत
आपल्या संघाने शेतकरी छाप हात मिश्र १८:१८१० या ग्रेडचे उत्पादन करणेस महाराष्ट्र शासनाकडून परवाना क्रमांक LCFM 2022040137 मिळाला आहे. आपल्या संस्थेने सन २०२३-२०२४ या अहवाल सालामध्ये १०५० मे.टन मिश्रखत उत्पादन केले असून ते गतवर्षापेक्षा ३५० मे. टन कमी आहे त्याचे कारण महाराष्ट्रातील सर्व मिश्रखत युनिट तपासणी गतवर्षी केंद्र शासना मार्फत सुरू होती त्यामुळे मिश्रखत पोर्टल वरून माल खरेदीची अडचण झाल्याने उत्पादन कमी झाले आहे.
केंद्र शासनाकडून आपल्या युनिट तपासणी मध्ये कोणताही दोष आढला नाही. यावर्षी मिश्रखताच उत्पादन सुरळीत सुरू आहे. कृषी विभागाच्या अधिकाऱ्यामार्फत मिश्रखताचा नमुना तपासणीसाठी काढू शासकीय प्रयोगशाळेतून तपासणी अहवाल प्राप्त झाल्यानंतर व नमुना प्रमाणीत आल्यानंतर खताची विक्री केली आहे.
आपला संघ अधिक प्रगती कडे वाटचाल करत असल्याचे श्री देसाई यांनी बोलताना सांगितले.
यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार संचालक मंडळ यांच्या हस्ते करण्यात आला तसेच यामध्ये थोर नेते संशोधक शास्त्रज्ञ साहित्यिक देशाच्या सीमेवर रक्षण करताना हुतात्मा झालेले जवान यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
सभासदांच्या प्रश्नाची उत्तरे संचालक सुधीर देसाई, उदयराज पवार यांनी दिली. सभासदांच्या हिताचे प्रश्न शेतकरी संघटनेचे तानाजी देसाई संजय देसाई यांनी उपस्थित केले.
अभिनंदन ठराव.
सर्पनाला प्रकल्पाला ३२५ कोटी. मंजूर करून आणल्याबाबत आमदार प्रकाश आंबिटकर यांचा अभिनंदन शेतकरी संघटनेचे का नाही देसाई यांनी मांडला. याबाबत प्रकल्पाला सुरुवात झाल्यापासून आजपर्यंत माजी मुख्यमंत्री कै. मनोहर जोशी, माजी मंत्री भरमु पाटील, मंत्री हसन मुश्रीफ, सह सर्पनाला व अन्य प्रकल्पात योगदान असलेल्या सर्व नेत्यांचा अभिनंदन करण्यात आला. या वार्षिक सर्वसाधारण सभेला संचालक गणपती सांगले, एम. के. देसाई, महादेव हेब्बाळकर, अल्बर्ट डिसोझा, महादेव पाटील, दयराज पवार, संभाजी तांबेकर,सौ. राजलक्ष्मी देसाई, मायादेवी पाटील, मधुकर येलगार, दौलती पाटील, ज्ञानदेव पोवार, सुनिल देसाई, रविंद्र होडगे, गणपती कांबळे, महेश पाटील, जयराम संकपाळ, भाऊसो किल्लेदार सह सभासद कर्मचारी हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार राजाराम पाटील यांनी मानले.
🛑आजरा बस स्थानकावरील कचरा उठाव आंदोलनाला.- बहुजन मुक्ती पार्टीला यश.
आजरा.- प्रतिनिधी.

आजरा बस स्थानकावरील कचऱ्यासंदर्भात प्रवाशांच्या अनेकदा तक्रारी येत होत्या. याविषयी अनेक संघटनांनी निवेदने दिलेली होती. काही वेळा जाणीवपूर्वक दखल घेतली जात नव्हती. बहुजन मुक्ती पार्टीने देखील २९ जुलै रोजी या विषयाच्या अनुषंगाने एसटी व्यवस्थापनाला निवेदन दिले होते. त्यानंतर आजरा नगर पंचायतीला पुन्हा ३१ जुलै रोजी याविषयी निवेदन देण्यात आले होते. परंतु यावर कोणत्याही प्रकारच्या हालचाली केल्या जात नव्हत्या. म्हणून आरोग्य विभागाला सुद्धा अस्वच्छतेमुळे नागरिकांचे व प्रवाशांचे आरोग्य धोक्यात असल्याचे निवेदन देण्यात आले. एस. टी व्यवस्थापन व नगरपंचायत दोघेही प्रतिसाद देत नव्हते. त्यामुळे शेवटी बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने एक दिवसीय धरणा प्रदर्शन घेण्याचे निर्धारित केले… धरणे आंदोलन घोषित करताच एसटी महामंडळाने दोन दिवसातच अस्ताव्यस्त पसरलेला कचरा एका ठिकाणी गोळा करून ठेवला. परंतु तरीही आजरा नगरपंचायतीच्या वतीने सदर कचरा भरून नेण्यात आला नाही.. त्यामुळे दि. १२ ऑगस्ट रोजी एस टी स्थानकामध्येच धरणा आंदोलन घेण्यात आले.. आजच्या आंदोलनाला चांगल्या संख्येने आंदोलनकर्ते उपस्थित होते. लागलीच प्रशासनाला याची दखल घ्यावी लागली… आणि संध्याकाळी नगरपंचायतीने कचरा उचलण्यासाठी घंटागाडी पाठवून दिली.
पुन्हा कचरा उचलताना आमच्या लक्षात आले की नगरपंचायतीचे जे सफाई कर्मचारी कचरा उचलण्यासाठी आले होते, त्यांच्याजवळ हात मोजे नव्हते, पायात गमबूट नव्हते. ते पाहून बहुजन की पार्टीच्या कार्यकर्त्यांनी त्यांना कचरा उचलण्यापासून थांबवले व “हॅन्ड ग्लोज का नाहीत? आणि यामुळे सफाई कामगार आजारी पडले तर काय परिस्थिती होईल?” यासंबंधी मुकादम याला जाब विचारला मुकादमाने तातडीने जाऊन नवीन हॅन्ड ग्लोज आणून कामगारांना दिले.. त्यानंतर कचरा उचलायला सुरुवात झाली बहुजन मुक्ती पार्टीच्या कार्यकर्त्यांनी समोर थांबून सर्व कचरा काढेपर्यंत प्रशासनाची पाठ सोडली नाही..
बहुजन मुक्ती पार्टीचे आंदोलन सुरू असेपर्यंत पोलीस उपनिरीक्षक श्री.काळकुटे यांनी धरणा आंदोलन स्थळी उपलब्ध उपस्थित होते. तसेच एसटी आगाराचे नवनियुक्त व्यवस्थापक प्रवीण पाटील आणि मा. मातले साहेब दोघेही पूर्ण वेळ आंदोलकां सोबत उपस्थित होते. आजरा नगरपंचायतचे मुख्याधिकारी यांच्यावतीने राकेश चौगुले, आरोग्य विभागाच्या वतीने युनुस सय्यद आंदोलन स्थळी उपस्थित होते. आंदोलनाला यशस्वी करण्यासाठी बहुजन मुक्ती पार्टीचे कार्यकर्ते केवळ निवेदन देऊन थांबले नाहीत तर त्याचा दररोज पाठपुरावा देखील केला. त्यामुळे सदर काम पूर्ण झाले. बहुजन मुक्ती पार्टीच्या कार्यकर्त्यांचे विशेष अभिनंदन आणि आभार.. यावेळी बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने बहुजन मुक्ती पार्टीचे जिल्हा अध्यक्ष, युवा आघाडी मा. किरण के के, बहुजन मुक्ती पार्टी जिल्हा प्रभारी डॉ. उल्हास त्रिरत्ने, अमित सुळेकर, राहुल मोरे, द्वारका कांबळे, नितीन राऊत, बहुजन मुक्ती पार्टी तालुका अध्यक्ष, संदीप दाभिलकर, दशरथ सोनुले, जुबेर माणगांवकर, शेखर देशमुख आदि कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच या आंदोलनाला यशस्वी करण्यासाठी अनेक संघटनांच्या लोकांनी साथ सहयोग दिला. यामध्ये रिपब्लिकन सेना, मानव अधिकार संघटना, सेक्युलर मोमेंट, वंचित बहुजन आघाडी, राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ, भारत मुक्ती मोर्चा, भारतीय विद्यार्थी मोर्चा आदि संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.