वसंतराव देसाई आजरा साखर कारखान्यात मिल रोलरचे पुजन संपन्न.
आजरा.- प्रतिनिधी.

वसंतराव देसाई आजरा सहकारी साखर कारखान्यात सन २०२४/२५ गळीत हंगामाकरीता ओव्हर होलींगचे काम गतीने सुरू असून कारखान्याचे व्हा.चेअरमन मधुकर कृष्णा देसाई यांचे शुभहस्ते आज मील रोलर पुजनाचा कार्यकम मोठया उत्साहात संपन्न झाला.
या प्रसंगी बोलतांना चेअरमन वसंतराव बापुसो धुरे यांनी आगामी सन २०२४/२५ चा गळीत हंगाम माहे ऑक्टोंबर, २०२४ मध्ये सुरू करणेच्या दृष्टीने मशिनरी ओव्हर होलींगची कामे गतीने सुरू आहेत. कारखान्याकडे गळीत हंगाम २०२४/२५ करीता ८००० हेक्टर ऊस क्षेत्राची नोंद झालेली आहे. येत्या गळीत हंगामात ४ लाख मे.टन ऊस गाळपाचे कारखान्याने नियोजन केले आहे. त्यादृष्टीने मशिनरी देखभाल दुरूस्तीची कामे सुरू असुन आजरोजी मिल रोलर पुजन केले आहे. ३० सप्टेंबर २०२४ पुर्वी कारखाना ओव्हरहोलिंगची कामे पुर्ण करून कारखाना गळीतासाठी सज्ज ठेवणार आहे. येणा-या गळीत हंगामासाठी ३५० बीड व लोकल तोडणी वाहतुक यंत्रणा कारखान्याने भरलेली आहे. त्याच प्रमाणे गळीत हंगामासाठी आवश्यक कामकाजाचे नियोजन व्यवस्थापना मार्फत केले जात आहे अशी माहिती दिली.
यावेळी जिल्हा बँकेचे संचालक तथा बैंक प्रतिनिधी सुधीर देसाई, कारखान्याचे संचालक विष्णू केसरकर, मुकुंदराव देसाई, मारूती घोरपडे, सुभाष देसाई, अनिल फडके, दिपक देसाई, रणजित देसाई, संभाजी रामचंद्र पाटील, शिवाजी नांदवडेकर, राजेंद्र मुरूकटे, राजेश जोशीलकर, संभाजी दत्तात्रय पाटील, गोविंद पाटील, काशिनाथ तेली, हरी कांबळे, संचालिका सौ. रचना होलम, सौ. मनिषा देसाई, तसेच कारखान्याचे तज्ञ संचालक, रशिद पठाण आणि प्र.कार्यकारी संचालक व्ही. के. ज्योती, जनरल मॅनेंजर (टेक्नि.) संभाजी सावंत, चिफ इंजिनिअर सुरेश शिंगटे व अन्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.