चंदगड.- विश्वकर्मा सुतार – लोहार समाजाचा उद्योजक मानसिंग खोराटे यांना जाहीर पाठिंबा.
( चंदगड विधानसभा मतदारसंघातील विविध संस्था, तरुण मंडळे, समाजाचा श्री. खोराटे यांना वाढता पाठींबा.)
चंदगड.- प्रतिनिधी.

२०२४ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणूक लढवणार मागील आठ दिवसापूर्वी अथर्व – दौलतचे चेअरमन उद्योजक मानसिंग खोराटे यांनी जाहीर केले होते. यानंतर चंदगड मध्ये नागरिकांचा सोशल मीडियावर चांगला प्रतिसाद मिळत आहे. यामध्ये काही समाजातून वाढता पाठिंबा मिळताना दिसतो आहे. आज (बुधवार दि. ७ ऑगस्ट रोजी. ) चंदगड तालुका विश्वकर्मा सुतार-लोहार समाजाने उद्योजक श्री.खोराटे यांची कारखाना स्थळावर भेट घेऊन त्यांना आपला पाठिंबा जाहीर केला.
यामध्ये विश्वकर्मा सुतार-लोहार समाजाने श्री खोराटे यांना बिनशर्त पाठींबा दिला.
यावेळी सुतार-लोहार समाजाच्या अनेक समस्या आणि मागण्यांवर चर्चा करण्यात आली. समाजासाठी आवश्यक सुविधा, रोजगाराच्या संधी यावर सविस्तर विचार विनिमय करण्यात आला. समाजाच्या भविष्यासाठी आणि एक चांगला लोकप्रतिनिधी निवडून देण्यासाठी आपण मानसिंग खोराटे यांना पाठिंबा देत असल्याचे यावेळी अध्यक्ष सुरेश सुतार यांनी सांगितले.
सर्वसमावेशक विकास तरुणांना व्यवसाय – नोकरी. शेतकऱ्यांचा विकास हेच ध्येय : खोराटे

चंदगड तालुक्यातील सर्वच समाजांना न्याय देण्याची आपली भूमिका असून सर्वसामान्यांचं हित। हेच आपलं उदिष्ट आहे. त्यामुळे विश्वकर्मा समाजाच्या ज्या काही न्याय मागण्या आहेत त्यासाठी मी कायमच पाठीशी राहीन अशी ग्वाही यावेळी मानसिंग खोराटे यांनी दिली. तसेच सुतार-लोहार समाजातील तरुणांना उद्योग, रोजगार निर्माण करून समजाचा उत्कर्ष व्हावा यासाठी आपण कायमच प्रयत्नशील असल्याचे खोराटे यावेळी म्हणाले. चंदगड तालुक्यातील शेतकरी, कामगार हे तर आपल्या पाठीशी आहेतच, त्यासोबत विविध समाजाचे लोक आपल्याला पाठिंबा देत असून त्याजोरावर आपण चंदगड तालुक्याचा सर्वांगीण विकास करून प्रत्येक समाजाला न्याय देण्याची आपली भूमिका असल्याचे खोराटे यांनी स्पष्ट केले.
यावेळी विश्वकर्मा सुतार-लोहार समाज चंदगड तालुका अध्यक्ष सुरेश सुतार, सचिव अनंत विठ्ठल सुतार, आंबेवाडी सरपंच माणगांव येथील भावकाना लोहार, चंदगड येथील अनंत लोहार यांच्यासह समाजाचे प्रतिनिधी तसेच नगरसेवक बाळासाहेब हळदणकर, अथर्वचे पदाधिकारी आदी उपस्थित होते. कार्यक्रमो प्रास्ताविक पी.डी. सरवदे यांनी केले. आभार अथर्वचे एच. आर यांनी मांनले.