🟥विना परवानगी झाड तोडल्यास ५० हजारांचा दंड होणार.-
🛑तर ९ ऑगस्टपासून राज्यात हर घर तिरंगा अभियान मोठ्या प्रमाणावर राबविणार.
अडीच कोटी घरांवर तिरंगा फडकविणार.
🛑राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत १३ मोठे निर्णय.
नेपाळमध्ये हेलिकाँप्टर कोसळले.
५ जणांचा मृत्यू
मुंबई :- प्रतिनिधी.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत विविध विभागातील महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.मंत्रालयातील मंत्रिमंडळ सभागृहात झालेल्या या बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेसह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते. या बैठकीत १३ विविध निर्णय घेण्यात आले असून जलसंपदा विभाग, शेतकरी, आदिवासी आणि वनविभागासाठी महत्त्वाचे निर्णय जाहीर करण्यात आले आहेत.
🟥आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णयानुसार परवानगी न घेता झाड तोडल्यास ५० हजार रुपयांचा दंड आकारला जाणार आहे. यापूर्वी दंडाची रक्कम १ हजार रुपये होती. याबाबचा जीआर वनविभागाकडून लवकरच जारी करण्यात येणार आहे. त्यामुळे यापुढे झाडांची कत्तल करताना किंवा झाडे तोडताना हजारवेळा विचार करावा लागणार आहे. त्याचबरोबर या बैठकीत लहान शहरांतील पायाभूत सुविधांना वेग देण्याविषयी चर्चा झाली.
🛑मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय (संक्षिप्त):-
१)✅शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर सिंचन महत्वाकांक्षी वैनगंगा. नळगंगा नदीजोड प्रकल्पास मान्यता.- ➡️पावणे चार लाख हेक्टर क्षेत्राचे सिंचन होणार.
२)✅आता प्रकल्पबाधितांना सदनिका मिळणार. धोरणास मान्यता.
३)✅लहान शहरांतील पायाभूत सुविधांना वेग येणार; कर्ज उभारण्यास मान्यता.
४)✅आदिवासी विभागातील प्राथमिक शिक्षकांना शिक्षण पात्रता परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी दोन वर्षे मुदतवाढ.
५)✅अनुसूचित जाती जमातीच्या जात, वैधता प्रमाणपत्र मिळण्यातल्या अडचणी दूर होणार. अधिनियमात सुधारणा करण्याचा निर्णय.
६)✅विना परवानगी झाड तोडल्यास आता ५० हजार रुपये दंड
७)✅महाराष्ट्र लॉजिस्टिक धोरण राबविणार. पाच वर्षात तीस हजार कोटींचे उत्पन्न मिळणार
८)✅कागल येथे आयुर्वेद महाविद्यालय ; आजरा तालुक्यात योग व निसर्गोपचार महाविद्यालय
९)✅न्यायमूर्ती, मुख्य न्यायमूर्तीना सेवा निवृत्तीनंतर घर कामगार, वाहनचालक सेवा
१०)✅सेना कल्याण शैक्षणिक संस्था आणि राधा कल्याणदास दर्यानानी चॅरिटेबल ट्रस्टला मुद्रांक शुल्कात १०० टक्के सूट
११)✅जुन्नरच्या श्री कुकडेश्वर आदिवासी हिरडा औद्योगिक सहकारी संस्थेस अर्थसहाय्य
१२)✅९ ऑगस्टपासून राज्यात हर घर तिरंगा अभियान मोठ्या प्रमाणावर राबविणार.
अडीच कोटी घरांवर तिरंगा फडकविणार.➡️विविध कार्यक्रमांचे आयोजन
१३)✅अल्पसंख्याक संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या स्थापनेस मंजुरी.
🛑नेपाळमध्ये हेलिकाँप्टर कोसळले.
५ जणांचा मृत्यू
काठमांडू :- वृत्तसंस्था

नेपाळमधील नुवाकोटमध्ये हेलिकॉप्टर कोसळले असून या दुर्घटनेत ५ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. रसुवाला येथे जात असताना या हेलिकॉप्टरचा अपघात झाला. यामध्ये चार चिनी नागरिकांचाही सहभाग होता. गेल्या महिन्यात नेपाळमधील त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमान कोसळून १८ जणांचा मृत्यू झाला होता.
त्यानंतर आता हेलिकॉप्टर कोसळल्याने पुन्हा अपघात झालाय. खराब व्यवस्थापनामुळे नेपाळमध्ये विमान अपघात होत असल्याचा आरोप होत आहे. घटनास्थळी बचावकार्य सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नेपाळमधील नुवाकोटमधील शिवपुरी भागात हे हेलिकॉप्टर कोसळले. एअर डायनेस्टीचे हे हेलिकॉप्टर होते. पण विमानातील सर्व ५ जणांचा या दुर्घटनेत मृत्यू झालाय. त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावरील एका सूत्राने हिमालयन टाईम्सला सांगितले की, हेलिकॉप्टर काठमांडूहून निघाले होते.
पण रस्त्यातच ते क्रॅश झाले. शिवपुरी राष्ट्रीय उद्यानात बुधवारी दुपारी हे हेलिकॉप्टर कोसळल्याची माहिती पुढे आली आहे. नेपाळ पोलिसांच्या प्रवक्ते डीआयजी दान बहादूर कार्की यांनी सांगितले की, हेलिकॉप्टरमधील पाचही जणांचा मृत्यू झाला आहे. त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळाचे प्रवक्ते सुभाष झा म्हणाले की, एअर डायनेस्टीच्या 9N-AZD हेलिकॉप्टरने काठमांडू येथून दुपारी 1:54 वाजता स्याप्रुबेसी, रसुवा येथे उड्डाण केले. कॅप्टन अरुण मल्ला हे या हेलिकॉप्टरचे पायलट होते.