Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रसरपंच परिषदेचे प्रदेशाध्यक्ष दत्ताभाऊ काकडे यांना दिला शरद पवार यांनी शब्द …(...

सरपंच परिषदेचे प्रदेशाध्यक्ष दत्ताभाऊ काकडे यांना दिला शरद पवार यांनी शब्द …( गावगाड्यांच्या मागण्या रास्त.- मुख्यमंत्र्यांसमवेत सरपंच परिषदेच्या पदाधिका-यांची बैठक घेऊ .- नेते शरद पवार.)🛑अर्जाची दखल घेतली नाही.‌ तर कुटुंब समवेत १५ ऑगस्ट रोजी आमरण उपोषण.- उचंगी येथील उचंगी ल.पा. प्रकल्प, स्वेच्छा पुनर्वस दखल न घेतल्याने..

🛑सरपंच परिषदेचे प्रदेशाध्यक्ष दत्ताभाऊ काकडे यांना दिला शरद पवार यांनी शब्द …
( गावगाड्यांच्या मागण्या रास्त.- मुख्यमंत्र्यांसमवेत सरपंच परिषदेच्या पदाधिका-यांची बैठक घेऊ .- नेते शरद पवार.)
🛑अर्जाची दखल घेतली नाही.‌ तर कुटुंब समवेत १५ ऑगस्ट रोजी आमरण उपोषण.- उचंगी येथील उचंगी ल.पा. प्रकल्प, स्वेच्छा पुनर्वस दखल न घेतल्याने..

पुणे. (प्रतिनिधी)

सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्रने सरकारला गावगाड्यांच्या अनेक मागण्यांचे निवेदने दिले मात्र सरकार ग्रामीण भागातील प्रश्नांकडे सातत्याने दुर्लक्ष करीत आहे.त्यामुळे मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांच्या सातारा जिल्ह्यातील सरपंचानी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन निवेदन देत आंदोलन केले. मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातुन आंदोलनाची सुरुवात करत सरपंच परिषदेच्या राज्य कार्यकारिणीने राज्यातील सर्व पक्षप्रमुखांच्या भेटी घेण्याचा निर्णय घेत त्यांच्याकडे परिषदेच्या मागण्या मांडून त्या बाबत सरकारकडे आपण आग्रह धरावा अशी मागणी केली.त्याचाच भाग म्हणून पुणे येथील मोदीबाग येथे प्रदेशाध्यक्ष दत्ताभाऊ काकडे यांच्या नेतृत्वाखाली ३५ पदाधिका-यांनी शरद पवार यांच्यासमोर गावगाड्याच्या समस्याचे गा-हाणे मांडले. यानंतर पवारांनी आपण केलेल्या मागण्या रास्त आहेत. लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत सरपंच परिषदेची बैठक लावु आणि तेथे ग्रामविकास विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि मी या मागण्यासाठी स्वतः तिथे उपस्थित राहील असा शब्द शरद पवार परिषदेच्या शिष्टमंडळाला दिला या प्रसंगी खालील मागण्या करण्यात आल्या त्यात प्रामुख्याने यावेळी सरपंच,उपसरपंच,सदस्य यांचे रुपये १० हजारा पर्यंत मानधन वाढ, पेन्शन, मोफत एसटी सेवा, मंत्रालय कायम प्रवेश पास ,मुंबईत सरपंच भवन, जि. प./ पं.स. मध्ये सुसज्य सरपंच कक्ष ,१५ लाखाच्या आतील विकास कामांचा मक्ता ग्रामपंचायतना द्यावा. ग्रामपंचायत साठीआपत्कालीन व राखीव निधीसाठी १० लाख तरतूद , ग्रामीण आवास योजनेस घर बांधणीस २.५० लाख मिळावे आदी मागण्याचा समावेश होता या प्रसंगी प्रदेश सरचिटणीस राजाराम पोतनीस, राज्यविश्वस्त तथा कोषाध्यक्ष आनंद जाधव , कोअर कमिटी प्रमुख आबासाहेब सोनवणे, राज्य प्रसिद्धी प्रमुख संजय बापू जगदाळे राज्य कोअर कमिटी सदस्य जे. डी. टेमगिरे, अरुणभाऊ कापसे, संजय शेलार, शत्रुघन धनवडे, अंबादास गुजर,गोविंद गायकवाड, ऍड दयानंद पाटील,अभिजीत पाटील , युवराज पाटील , लखन पाटील, संदीप कांबळे, पंढरीनाथ भोपळे, जी.डी.गुरव, जोशना पाटील,शिवाजी कांबळे (करवीर ) , बी.एम. पाटील (भडगावकर) शिवाजी पाटील (कासारी) जयसिंग पाटील ( सोनगे ) इत्यादींचा समावेश होता.

🛑अर्जाची दखल घेतली नाही.‌ तर कुटुंब समवेत १५ ऑगस्ट रोजी आमरण उपोषण.- उचंगी येथील उचंगी ल.पा. प्रकल्प, स्वेच्छा पुनर्वस दखल न घेतल्याने..

आजरा.- प्रतिनिधी.

उचंगी ता. आजरा येथील उचंगी ल.पा. प्रकल्प, ता.आजरा स्वेच्छा पुनर्वसनाबाबत दखल न घेतलेमुळे आमरण उपोषणाला बसणार असल्याचे निवेदन १) दत्ताजीराव बळवंतराव देसाई, व.व. ९५ रा. उचंगी
२) कै. श्रीपतराव बळवंतराव देसाई, मयत वारस. बाळासाहेब संभाजी निंबाळकर, व.व. ४६ रा. उचंगी. यांनी आजरा असल्यास व जिल्हाअधिकारी कोल्हापूर व आजरा तहसीलदार यांना दि. ५ रोजी. निवेदन देण्यात आले आहे.‌ दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
मौजे उचंगी, ता. आजरा येथे आमचे मालकीच्या गट नं. १५२ क्षेत्र १ हे. ४० आर. व गट नं. १५६ क्षेत्र ०.१३.५ आर. च्या जमिनी उचंगी ल.पा. प्रकल्प, ता. आजरा मध्ये संपादीत झालेल्या आहेत. वेळोवेळी आम्ही अर्ज करूनसुध्दा आमची दखल घेतली नाही. अर्जदार नं. १) दत्ताजीराव बळवंतराव देसाई, व.व. ९५ हे वयोवृध्द असून त्यानी सदर बाबीचा धसका घेऊन त्यांचे जीवीतास काही बरे वाईट झाल्यास त्यास शासन जबाबदार राहील. यापूर्वी मा. उपविभागीय अधिकारी, यांचे नोटीसीनुसार आम्ही दि. ८ जुन २०२२ रोजी अर्ज केला आहे. सदर अर्जाची गेली दोन वर्षे झाली पाठपूरावा करुन देखील त्या अर्जाची दखल घेतली गेली नाही. त्यासाठी आम्ही सदरचा निर्णय घेतला आहे. तरी आम्ही कुटूंबासह दि. १५ ऑगस्ट २०२४ रोजी आपले कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसणार आहोत. याची दखल घ्यावी. म्हणून दिला अर्ज. असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. या निवेदनावर अर्जदारांच्या सह्या आहेत
.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.