कमते मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल गडहिंग्लज – शिवसेना युवासेना/उबाठा, मडिलगे यांच्या संयुक्त विद्यमाने
( मोफत आरोग्य शिबीर संपन्न.)
आजरा.- प्रतिनिधी.
मडिलगे ता. आजरा येथील युवासेना शिवसेना व कमते मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल गडहिंग्लज यांच्या संयुक्त विद्यमानाने महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना अंतर्गत विनामुल्य आरोग्य शिबीर रविवार दि. ०४ रोजी ग्रामपंचायत हॉल, मडीलगे येथे संपन्न झाले. श्री गुरव यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून शिबिराचा शुभारंभ करण्यात आला. या शिबिरातील उपलब्ध सुविधा जनरल मेडिसीन, अस्थिरोग, मुत्ररोग, जनरल सर्जरी, वंध्यत्व/प्रसुती/स्त्री रोग, डायलिसिस
तज्ञ डॉक्टरांकडून तपासणी व मार्गदर्शन शिबीरामध्ये तपासणी ब्लड प्रेशर, ईसीजी व पोटाचे विकार, हाडाचे विकार, मुत्र रोगाचे विकार तसेच लहान मुलांचे मोफत तपासणी करण्यात आली. या शिबिरासाठी कमते हॉस्पिटल कडून कर्मचारी डॉ. श्वेता कुंभार सह सहकारी यांचे सहकार्य लाभले. याप्रसंगी. जेष्ट शिवसैनिक भिवा गुरव, शाखाप्रमुख सुरेश शिवणे, तसेच शिवसेना युवा सेनेचे पदाधिकारी नितीन कातकर, आनंदा येसणे, सचिन कातकर, अमोल देवेकर, शुभम शिवणे, सुशांत बाणेकर ओमकार निऊगरे सह शिवसैनिक यांनी योगदान घेतले. या शिबिरात शंभर हुन अधिक रुग्णांनी लाभ घेतला.