चंदगड विधानसभा रणधुमाळी.
भाग. १- चंदगड विधानसभेत राजकीय समीकरणे.- बदलणार बंडखोरीचे प्रमाण वाढणार का.?
कोणाला मिळणार पक्षाची उमेदवारी.- नेत्यांनी दिलेला शब्द पाळणार का.?
चंदगड विधानसभा.- संभाजी जाधव.
राज्यात मागील दोन वर्षापासून एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्या बंडानंतर राज्यातील राजकीय समीकरणे बदलली व महाराष्ट्रातील दोन्ही नेत्यांच्यावर गद्दारीचा शिक्का पडला यामध्ये सोयीस्कर रित्या योग्य असा गट त्या त्या आमदाराने निवडला यावेळी स्थानिक मतदारांचा विचार न घेता ज्या मतदारांनी ज्या पक्षातून निवडून दिल आहे. त्यांचं मत घेऊन विधानसभेत विजय मिळवला पण पक्ष गट बदलताना त्यांचं अर्थात मतदारांचं मत घ्यावं असं महाराष्ट्रातील कोणत्याही आमदाराला वाटलं नाही. जे आमदार दोन्हीही गटात गेले. यामुळे सत्ताधारी भाजपने आपली सत्ता पुन्हा महाराष्ट्रात करण्यास यश आले. काही काळ महाराष्ट्रात गद्दारीचा गदारोळ उडाला व कालांतराने लोकसभा निवडणुकीत याचा फटका महायुतीला बसला. यानंतर मागील दोन-तीन वर्षापासून राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका प्रभात पद्धतीत बदल ओबीसी आरक्षण अशा विविध मुद्द्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबीवर पडल्याने केंद्राच्या पंधराव्या वित्त आयोगाकडून मिळणारा दोन वर्षाचा सुमारे ८ हजार कोटी इतका निधी मिळू शकलेला नाही. यामध्ये राज्याच्या वेगवेगळ्या घोषणा व शासकीय अधिकाऱ्यांना कामाला लावून वेगवेगळे उपक्रम राबवून जनतेच्या मनात घर करण्याचा केविलवाना प्रयत्न झाला. यामध्ये वेगवेगळ्या मतदारसंघात विधानसभेत उमेदवारी देण्याची शब्द देऊन सत्ताधारी महायुतीने नेत्यांना गटातटाच्या व पक्षांच्या दावणीला बांधून ठेवल आहे. तसंच महाविकास आघाडी यांनी लोकसभा निवडणुकीत काही काळ राजकारणात विश्रांती घेतलेले व योग्य वेळी योग्य निर्णय घेऊन महायुती व महाविकास आघाडी अशा आघाड्या निवडत लोकसभा निवडणुकीत आपले स्थान निर्माण केले. व लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार छत्रपती शाहू महाराज हे विजयी झाले. यामध्ये आजरा गडहिंग्लज चंदगड या विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या विजयात सिंहाचा वाटा असणारे इच्छुक उमेदवार आहेत.
आता होणाऱ्या २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत. पक्ष आपल्यालाच उमेदवार देणार अशा भ्रमात काही उमेदवार गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत. मुळात चंदगड विधानसभा मतदारसंघात तशी इच्छुक उमेदवारांची यादी मोठीच आहे. यामध्ये सद्याचे महायुतीचे विद्यमान आमदार राजेश पाटील, इच्छुक उमेदवार शिवाजी पाटील, संग्रामसिंह कुपेकर, माजी आमदार भरमू पाटील, असे उमेदवार महायुतीतून इच्छुक आहेत. तर महाविकास आघाडीची यादी मोठीच आहे. यामध्ये कै. बाबासाहेब कुपेकर यांची कन्या डॉ. नंदाताई ( कुपेकर ) बाभुळकर, विनायक उर्फे अप्पी पाटील, सुनील शिंत्रे, प्रभाकर खांडेकर, रियाज समनजी असे उमेदवार आहेत. तसा हा मतदारसंघ शिवसेनेला जातो. परंतु वरिष्ठ पातळीवर या मतदारसंघातून उमेदवार कोण द्यायचा हे महाविकास आघाडीच्या नेत्यांच्यावर अवलंबून राहणार आहे. त्यामुळे उमेदवारी कोणाला मिळेल व कोणत्या पक्षाला हे आत्ताच सांगता येणार नाही. मग उर्वरित उमेदवार हे बंडखोरी करणार का? की पक्षाचा आदेश पाळणार. परंतु महायुती व महाविकास आघाडी या युत्या राहतीलच की नाही. की सर्व पक्षांचा स्वयंमबळाचा नारा बाहेर येतो. याची शंका निर्माण होत आहे. यामध्येच चंदगड विधानसभा मतदारसंघात शेतकऱ्यांची दौलत अर्थात दौलत सहकारी साखर कारखाना हा मागील अनेक वर्षांपासून बंद होता. हा कारखाना अथर्वचे उद्योजक मानसिंग खोराटे यांनी हा कारखाना चालवायला घेतला व चांगल्या पद्धतीने चालवून शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले शेतकऱ्यांना थकबाकीत न ठेवता स्वच्छ व पारदर्शक कारभार करत चंदगडच्या शेतकऱ्यांच्या मनात चांगली भावना निर्माण केली असे उद्योजक श्री खोराटे विधानसभा लढवणार असल्याचे नुकतेच जाहीर केले पण पक्ष जाहीर केला नाही. चंदगडच्या मातब्बर इच्छुक उमेदवारांच्या यादी असल्यामुळे कदाचित वेगळा पर्याय म्हणून महायुती किंवा महाविकास आघाडी मधून श्री खोराटे यांना उमेदवारी मिळू शकते. असे तर्क वितर्क लढवले जात आहेत. परंतु या सर्व गोष्टींचा उलघडा येणाऱ्या काही दिवसातच होणार आहे. तर यामध्ये अन्य पक्ष मनसे, वंचित आघाडी व अपक्ष उमेदवार देखील असणार आहेत.
दुसरीकडे कोल्हापूर जिल्ह्यसह राज्यात ३४ जिल्हा परिषदांपैकी २६ आणि ३५१ पंचायत समितींपैकी २८९ समित्यांचा कारभार दोन वर्षे प्रशासक पाहात आहेत. सर्व २९ महानगरपालिका आणि ३८५ नगर पंचायती व नगर परिषदांपैकी २७९ संस्थांवर प्रशासकराज आहे. वर्ष २०२५-२६ पासून १६ व्या वित्त आयोगाचा निधी मिळणार आहे. तत्पूर्वी प्रलंबित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका न झाल्यास महाराष्ट्राला निधीवर पाणी सोडावे लागणार आहे. विधानसभेची निवडणूक ऑक्टोबर अखेर होण्याची चिन्हे आहेत. बहुधा पुढील वर्षीच महानगरपालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुका पार पडू शकतात, असा अंदाज आहे. पण या निवडणुकींना उशिरा होत असल्याने व होणार की नाही. यामुळे महाराष्ट्रातील जनता, स्थानिक स्वराज्य संस्थेतील नेते विविध पक्षाचे पदाधिकारी नाराज आहेत. यामुळे या निवडणुका विधानसभेपूर्वी होणार की विधानसभेनंतर होणार. याबाबत अद्याप स्पष्टता दिसत नाही. पण या चंदगड विधानसभा मतदारसंघात महायुती व महाविकास आघाडी राहिल्यास बंडखोरीचे ग्रहण लागणार हे मात्र निश्चित….
क्रंमशा…..