🛑 नारायण राणेंनी मला फुकट धमक्या देऊ नयेत.- अन्यथा कोकणात सुद्धा फिरून देणार नाही,”मनोज जरांगे – पाटलांचा नारायण राणेंना इशारा..
मुंबई.- प्रतिनिधी.
नारायण राणे यांनी मनोज जरांगे पाटील यांना अंगावर घेत मी गणेशोत्सव झाल्यानंतर मराठवाड्यात जाणार आहे. बघू तर हा जरांगे-पाटील काय करतो, असा एकेरी उल्लेख करत खासदार नारायण राणे यांनी इशारा दिला होता. यानंतर जरांगे-पाटील यांनी नारायण राणे यांना प्रत्युत्तर दिलं आहे.मी नारायण राणेंना मानतो.निलेश राणेंनी त्यांना समजावून सांगावं, मी नारायण राणेंना काही बोलत नाही, शांत आहे. बोलायला लागलो तर मी थांबणार नाही. नारायण राणेंनी मला फुकट धमक्या नाही द्यायच्या. धमक्यांना मी घाबरत नाही,मी जर म्हणालो मराठवाड्यात येऊ देऊ नका, तर कोकणात सुद्धा तुम्हाला फिरून देणार नाहीत. मी लक्ष घातले, तर खूप फजिती होईल.असं जरांगे-पाटलांनी ठणकावून सांगितलं आहे.ते अंतरवाली सराटी येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.
🛑नारायण राणे काय म्हणाले?
“मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगितलं की, गणेशोत्सव संपताच मी मराठवाड्यात चाललो आहे. सलोखा निर्माण व्हावा आणि भाजपची भूमिका घेऊन मी मराठवाड्यात जाणार आहे. तुम्ही कुणी यावं नाही यावं, मी जाणार आहे. बघू तर जरांगे-पाटील काय करतो,” असं म्हणत नारायण राणे यांनी ललकारलं आहे.”तसेच, देवेंद्र फडणवीस एकटे नाहीत, आम्ही सोबत आहोत. उद्या देवेंद्र फडणवीस आणि रस्त्यावर आलं पाहिजे. कुणी आपल्या नेत्याच्या वाटेला आलं नाही पाहिजे,” असं आवाहन नारायण राणे यांनी कार्यकर्त्यांना उद्देशून म्हटलं.
🛑जरांगे-पाटलांनी काय म्हटलं?
नारायण राणेंच्या इशाऱ्यावर मनोज जरांगे-पाटील म्हणाले, “मी नारायण राणे यांना मराठवाड्यात येऊ नका, असं बोललोच नाही. ते मला बघून घेणार म्हणजे ही कोणती धमकी आहे. मी नारायण राणे यांचा आदर करतो. मी जर म्हणालो मराठवाड्यात येऊ देऊ नका, तर कोकणात सुद्धा तुम्हाला फिरून देणार नाहीत. मी लक्ष घातले, तर खूप फजिती होईल.”
🟥”निलेश राणे यांनी वडिलांना समजून सांगावं. मी त्यांच्यावर कधीच बोलत नाही. बोलायला लागलो, तर थांबणार नाही. फुकट धमक्या द्यायच्या नाहीत. मी कुठल्याही धमक्यांना घाबरत नाही,” असं जरांगे-पाटलांनी म्हटलं आहे.
🛑सध्या सत्ताधारी पक्षातल्या आमदारांना काय झालंय माहीत नाही.
४० वर्षे, ७० वर्षे कुणी काय दिलं नाही ते सगळ्यांना माहीत आहे. सध्या काय झालं आहे की सत्ताधारी पक्षातल्या आमदारांना काहीही सुचत नाही, त्यामुळे ते काहीही बोलत आहेत. आपलं सरकार जातं की राहतं याची त्यांना चिंता वाटते आहे. रात्रंदिवस हे भाकरी खातच नाहीत बहुदा ताकच पितात. मला उचकवण्याचा प्रयत्न केला जातो आहे. मी त्यांना उत्तर देणार नाही. मी त्यांचासारखा स्वाभिमान गहाण ठेवणारा नाही. याचे पाय चाट, त्याचे पाय चाट हे मी करणार नाही. मला मराठा समाजाला मोठं करायचं आहे असं मनोज जरांगेंनी म्हटलं आहे.
🟥मनोज जरांगेंनी शनिवारी काय म्हटलं होतं?
“नांदेड, लातूर, बीड, जालना, नगर, पुणे एकही मुलगा आंदोलनातून मागे सरकला नाही. माझ्यापर्यंत आला नाही. आरक्षण देण्यासंदर्भात त्यांनी तारीख वाढवली किंवा नाही वाढवली तरी आम्ही आता आशा सोडली. आरक्षण देत नाहीत, सगेसोयऱ्याची अंमलबजावणी करत नाहीत, धनगर बांधवांना सांगितलं होतं की १० टक्के आरक्षण देऊ. त्यांनाही घेऊ देत नाहीत. ओबीसीला धोका दाखवायला लागले आहेत. त्यांचे अभियान सुरू आहेत. फडणवीसांनी दरेकरांच्या मदतीने सुरु केलेले हे अभियान आहेत”, अशी टीकाही मनोज जरांगे यांनी केली होती.