🟥महसूल पंधरवडा कार्यक्रमातच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या १३ कोटीच्या फाईलवर पालकमंत्री उदय सामंत यांची स्वाक्षरी.
रत्नागिरी :- प्रतिनिधी.
महसूल यंत्रणेचे फार मोठी ताकद आहे. ही ताकद हा विभाग सर्वसामान्य समाजासाठी सक्षमतेने आणि संवदेनशीलपणे काम करण्यासाठी वापरत आहे, याचा मला अभिमान आहे, अशा शब्दात महसूल यंत्रणेचे पालकमंत्री उदय सामंत यांनी आज कौतुक केले. महसूल पंधरवडा कार्यक्रमातच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या जिल्ह्यातील 2 लाख 73 हजार 290 उद्दिष्टांपैकी 42 हजार 968 लाभार्थ्यांच्या 13 कोटींच्या फाईलवर स्वाक्षरी केली.
🟥जिल्हा महसूल प्रशासनाच्यावतीने महसूल पंधरवडा अंतर्गत विविध योजनेच्या लाभार्थ्यांना लाभ वाटपाचा कार्यक्रम येथील स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर नाट्यगृहात झाला. पालकमंत्री श्री. सामंत यांनी प्रशासनाच्या उल्लेखनीय कार्याचा आपल्या भाषणात गौरव केला. हे सांगत असतानाच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या 13 कोटी निधीच्या फाईलवर भाषण करतानाच सर्वांसमक्ष स्वाक्षरी करुन,उर्वरित सर्व पात्र लाभार्थ्यांनाही या योजनेचा असाच लाभ दिला जाईल, असे ठामपणे सांगितले. यावेळी सभागृहातील उपस्थितांकडून टाळ्यांच्या कडकडात त्यांना प्रतिसाद दिला गेला.