🛑अज्ञात चोरट्याने आजऱ्यात २ लाख १०० रुपयांचे साहित्य लंपास केले.
🛑कोल्हापूर ते चंदगड रेल्वे साठी गडहिंग्लज येथे निर्धार मेळावा संपन्न.
🛑आजरा महाविद्यालय आजरा ज्युनिअर विभागात कला व वाणिज्य विभागाचा पालक मेळावा संपन्न .
आजरा.- प्रतिनिधी.

आजरा शहरातील हैदरनगर येथील मुदस्सर मजीद मुल्ला यांच्या घरी दोन लाखांची चोरी झाली आहे. आजऱ्यात बंद घरामध्ये चोऱ्या करण्याचे प्रमाण वाढत आहे. हैदरनगर येथील मुल्ला कुटुंब गुरुवारी घरगुती कार्यक्रमासाठी बाहेर गावी गेले होते याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी बाहेरील कुलुप तोडून आत प्रवेश करत बेडरूम असलेल्या तिजोरीतील रोख रक्कम २० हजार, व सोन्याचे दागिने १ लाख ७५ हजार रुपयांचे ५ हजार किंमतीचे चांदीचे दागिने असा २ लाख १०० रुपयांचे साहित्य लंपास केले आहे. काल आजरा पोलिसांनी श्वानपथकाला पाचारण केले होते मात्र त्याचा फारसा उपयोग झाला नाही.ठसे तज्ज्ञांनी ठसेही घेतले आहेत. आजरा शहरासह तालुक्याच्या ठिकाणी चोऱ्या होण्याचे प्रमाण वाढत आहे.
🛑आजरा महाविद्यालय आजरा ज्युनिअर विभागात कला व वाणिज्य विभागाचा पालक मेळावा संपन्न .
आजरा दि. २ प्रतिनिधी.

आजरा महाविद्यालय आजरा येथे ज्युनिअर कला व वाणिज्य विभागाचा पालक मेळावा संपन्न झाला. पालक मेळाव्यासाठी पालकांनी मोठ्या संख्येने आपल्या सहभाग नोंदवला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ ए. एन सादळे होते. स्वागत व प्रास्ताविक प्रा. विनायक चव्हाण सर यांनी केले .
या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थितीत माननीय उपप्राचार्य डी.पी. संकपाळ सर व अधीक्षक योगेश पाटील होते. शिक्षकांच्या मनोगतातून प्रा. विठ्ठल हाके, प्रा. रत्नदीप पवार, प्रा. रूपाली फोंडेकर यांनी पालकांशी संवाद साधला. पालकांच्या मनोगतामध्ये सौ पाटील, सौ चोडणकर, श्री खरुडे यांनी आपली मते सांगितली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए एन सादळे उपस्थित होते त्यांनी आपल्या मनोगतात ‘समाजातील दरी कमी करण्यासाठी शिक्षण महत्त्वाचे आहे. शिक्षणाने सुसंस्कृत समाज घडतो. उत्कृष्ट विद्यार्थी घडवण्याची महाविद्यालयाची उज्वल परंपरा आहे आपण विद्यार्थी घडवण्यासाठी, उद्याचा जबाबदार नागरिक बनवण्यासाठी प्रयत्न करूया.’ असे सांगितले
. या मेळाव्या त प्रा. सुवर्णा धामणेकर, स्वाती माने, प्रा. वैशाली देसाई, प्रा .संजीवनी कांबळे, प्रा.अनिल निर्मळे , प्रा. मलिकार्जुन शिंत्रे, उपस्थित होते
कार्यक्रमाचे आभार प्रा पूनम लीचम यांनी मानले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. वैशाली देसाई यांनी केले.
🛑कोल्हापूर ते चंदगड रेल्वे साठी गडहिंग्लज येथे निर्धार मेळावा संपन्न.

राजर्षी शाहू महाराजांनी कोल्हापूर मध्ये रेल्वे सुरू केल्यानंतर कोल्हापूरच्या विकासासाठी जिल्ह्याच्या दक्षिण विभागात रेल्वे सुरू करणेसाठी राजकीय इच्छाशक्ती नसल्यामुळे या भागाचा विकास झाला नाही, कोणतीही इंडस्ट्री या भागात आली नाही. त्यामुळे येथील युवक अधीक बेरोजगार झाला. असून येथील युवक मुंबई पुण्याकडे जाऊन मिळेल ती नोकरी करू लागला,त्यामुळे येणाऱ्या काळात कोल्हापूर ते चंदगड रेल्वे सुरू झाल्यास येथील शेतकरी वर्गाला योग्य मार्केट मिळेल. बेरोजगारी कमी होईल,भागाचा विकास होईल यासाठी जनतेत जनजागृती करण्यासाठी कोल्हापूर जिल्हा रहिवाशी सामाजिक प्रवाशी संघातर्फे गडहिंग्लज येथे निर्धार मेळाव्याचे आयोजन दि २ रोजी करण्यात आले होते.प्रवाशी संघाचे अध्यक्ष ऍड चंद्रकांत निकम यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा घेण्यात आली. यावेळी पोलीस पाटील संघटना गडहिंग्लज व चंदगडचे पदाधिकारी, सरपंच संघटना गडहिंग्लज चे पदाधिकारी, शेतकरी वर्ग उपस्थित होते. यावेळी ऍड चंद्रकांत निकम यांनी संघाची रूपरेषा विशद केली आणि कोल्हापूर ते चंदगड रेल्वे सुरू करणे,बेळगाव ते सावंतवाडी रेल्वे सुरू करणे ,कोल्हापूर ला वंदे भारत रेल्वे सुरू करणे,सणानिमित्त जादा बोगी लावणे आदी विषयावर आपली भूमिका मांडली व ही चळवळ गावागावात पोहोचली पाहिजे तसेच गडहिंग्लज, आजरा व चंदगड या तालुक्यातून जवळपास ५ लाख पोस्ट कार्ड रेल्वे च्या मागणीसाठी रेल्वे मंत्र्यांकडे पाठवण्याचा संकल्प जाहीर केला.उपस्थित जनतेने त्यास उस्फुर्त पाठिंबा जाहीर केला व येणाऱ्या काळात ही चळवळ गावागावात घेऊन जाण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करण्याचे जाहीर केले.
यावेळी बोलताना संघाचे प्रमुख मार्गदर्शक सुरेश दळवी यांनी कोल्हापूर ते चंदगड रेल्वे हे सर्वांचे स्वप्न असून ते पूर्ण करण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे असे सांगितले.शिवराज शिक्षण संकुलाचे उपाध्यक्ष दिग्विजय कुराडे यांनी या स्तुत्य उपक्रमास जाहीर पाठिंबा दिला आणि आम्ही या आंदोलनात नेहमी आपल्या सोबत राहू असे जाहीर केले. माजी अधिकारी बाबासाहेब आजरी, ऍड एम ये पाटील,गडहिंग्लज पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष उदय पुजारी,चंदगड चे अध्यक्ष अमृत देसाई व पदाधिकारी उपस्थित होते.