आठ दिवस – दहा गावचा खंडित वीजपुरवठा .- ग्रामस्थांच्या मदतीने केला चालू.
( आजरा महावितरण कर्मचाऱ्यांचे कौतुक. )
आजरा.- प्रतिनिधी.
आजरा तालुक्यात अनेक विभागात मागील आठवड्याभरापासून चालू असलेल्या जोराचा वारा व पाऊस यामुळे विद्युत प्रवाह खंडित होण्याचे प्रकार चालू होते. अशाच मुसळधार पावसामुळे मौजे लाटगाव, पोळगाव, एरंडोल, रायवाडा, खानापूर कासारकांठगाव , आवडी, चित्री धरण तसेच जेऊर, चितळे भावेवाडी या सर्व परिसरात मोठमोठी झाडे उमलून महावितरण कंपनीच्या वाहिन्यावर पडत असल्याने लाईट येत जात होती. आजरा महावितरण कर्मचारी यांनी दिवस रात्रीची परवा न करता सुरळीत वीज पुरवठा करण्यासाठी कष्ट घेतले. तर दुसरीकडे मौजे लाटगाव येथे चित्री नदी वरून जाणारी गावठाण वाहिनी वर झाड पडल्याने पोल व त्यावरील विद्युत वाहिनीची तार नदीत पडल्या होत्या.त्यामुळे लाटगाव आणि देसाई वस्ती पूर्णपणे अंधारात होती .याठिकाणी जोराचा वारा व पाऊस असताना पुन्हा पोल उभा करणे व नदी वरून वायर ओढणे हे काम अत्यंत जोखमीचे व धोकादायक होते. अशा स्थितीत मौजे लाटगावचे सरपंच वामन सुतार, संदेश दळवी, अजित चौगुले , ग्रामपंचायत शिपाई शकर दारुटे परसु सुतार यांनी महावितरण कर्मचारी यांना उस्फुत्पणे आवश्यकता सहकार्य करून महावितरण शाखा दोनचे सहाय्यक अभियंता संदीप गायकवाड, तसेच प्रधान तंत्रज्ञ पवन पाटील यांचा मार्गदर्शनाखाली तंत्रज्ञ अमोल पोवार, अमित कोंदुस्कर, द्यांनदेव जाधव, सागर चव्हाण, सोनू कोकरे या सर्वांनी अत्यंत जोकमीचे पोल उभारणीचे काम खड्डे होत नसलेल्या जागेवर जनरेटर व ड्रिलर घेऊन अतिशय कठीण असे काम पावसात केले. अखेर या भागातील वीजपुरवठा रात्री चालू करण्यात यश आले. ग्रामस्थांमध्ये अतिशय समाधान व्यक्त होत आहे. महावितरण कर्मचारी यांची नोकरी म्हणून जबाबदारी असली तरी यामध्ये सामाजिक बांधिलकी जपणारे कार्य नागरिकासमोर निदर्शनास येते. या कर्मचाऱ्यांचे सर्व स्तरावर कौतुक होत आहे.
