Homeकोंकण - ठाणेझारखंडमध्ये मुंबई-हावडा एक्स्प्रेसचा भीषण अपघात.- १४ डब्बे रूळावरून घसरले.- १० जण जखमी;...

झारखंडमध्ये मुंबई-हावडा एक्स्प्रेसचा भीषण अपघात.- १४ डब्बे रूळावरून घसरले.- १० जण जखमी; बचावकार्य सुरू🛑लाडकी बहीण योजनेच बॅनर भोवलं.- पुण्यातील आमदाराच्या विरोधात ‘लाडकी बहीण’ पोहचली थेट पोलीस ठाण्यात..तर महिलांनी गाठले थेट पोलिस आयुक्तांलय.

🟥झारखंडमध्ये मुंबई-हावडा एक्स्प्रेसचा भीषण अपघात.- १४ डब्बे रूळावरून घसरले.- १० जण जखमी; बचावकार्य सुरू
🛑लाडकी बहीण योजनेच बॅनर भोवलं.- पुण्यातील आमदाराच्या विरोधात ‘लाडकी बहीण’ पोहचली थेट पोलीस ठाण्यात..
तर महिलांनी गाठले थेट पोलिस आयुक्तांलय.

रांची :- वृत्तसंस्था.

झारखंडच्या टाटानगरजवळ आज मंगळवारी पहाटे भीषण रेल्वे अपघाताची घटना घडली आहे. हावडावरून मुंबईला जाणाऱ्या मुंबई-हावडा एक्स्प्रेसचे १४ डब्बे रुळावरुन घसरल्याची माहिती मिळत आहे. झारखंडमधील सरायकेला-खरसावा जिल्ह्यात आज मंगळवारी पहाटे ३.४५ वाजता ही दुर्घटना घडली आहे. या अपघातात १० जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. या रेल्वे अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी एनडीआरएफचं पथक पोहोचलं असून बचावकार्य सुरू झालं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राजखरस्वान वेस्ट आऊटर आणि बारांबूदरम्यान एक मालगाडी रुळावरून घसरली होती. या मालगाडीच्या वॅगनन्स अजूनही रुळावरच होत्या. याचदरम्यान दुसऱ्या रुळावरून हावडावरून मुंबईला जाणारी हावडा -मुंबई मेल येत होती. त्या वॅगन्सला धडकल्यानंतर हावडा -मुंबई मेलचा भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये अद्याप तरी कुठल्याही जीवितहानीचं वृत्त नाही. प्रत्यक्षदर्शीनी या अपघाताबाबत सांगितलं की, रात्री काही प्रवासी रेल्वेस्थानकावर झोपले होते. ३.४५ च्या सुमारास मोठा आवाज आला.
आम्ही आवाजाच्या दिशेने पाहिलं तर रेल्वे हलताना दिसली. रेल्वे एका बाजूला झुकली होती, काही प्रवासी पडतायत असं वाटत होतं. रेल्वेचे काही डबे रुळावरून घसरल्याचं निदर्शनास आलं. दरम्यान, रेल्वे प्रशासनाने म्हटलं आहे की सर्व जखमी प्रवाशांना घटनास्थळी प्रथमोपचार देण्यात आले आहेत. हा अपघात कशामुळे झाला? यामध्ये कोणाची चूक होती? या गोष्टींचा तपास केला जात आहे. ही बातमी प्रसिद्ध करत असताना बचाव पथक घटनास्थळी दाखल झालं होतं.

🛑लाडकी बहीण योजनेच बॅनर भोवलं.- पुण्यातील आमदाराच्या विरोधात ‘लाडकी बहीण’ पोहचली थेट पोलीस ठाण्यात..
तर महिलांनी गाठले थेट पोलिस आयुक्तांलय

पुणे :- प्रतिनिधी

राज्य सरकारची महत्वाकांक्षी योजना असलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सध्या राज्यभर चर्चा होत आहे. या योजनेसाठी आत्तापर्यंत तब्बल 1 कोटी महिलांना आपला अर्ज दाखल केला आहे.राज्य सरकारकडून 19 ऑगस्टपर्यंत महिलांना या योजनेचा थेट लाभ मिळणार असून महिलांच्या खात्यात 2 महिन्यांचे 3000 रुपये जमा होणार आहेत. त्यामुळे, या योजनेसाठी शासकीय स्तरावर अर्ज भरले जात असून लोकप्रतिनिधीही शिबीर भरवत आहेत. विविध माध्यमांतून या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिला भगिनींना आवाहन केलं जात आहे. मात्र, अशाप्रकारे महिलांना लाडकी बहीण योजनेचं आवाहन करणं भाजप आमदाराच्या अंगलट आलं आहे. पुण्यातील शिवाजी नगर परिसरात भाजप आमदाराने लावलेल्या बॅनरवरुन आता चांगलाच वाद निर्माण झाला आहे.मात्र, अशाप्रकारे महिलांना लाडकी बहीण योजनेचं आवाहन करणं भाजप आमदाराला चांगलच भोवल आहे. या बॅनरवरुन महिलांनी थेट आमदाराविरुद्ध पोलीस ठाण्यात धाव घेतली.

🅾️पुण्यातील शिवाजीनगर विधानसभा मतदारसघात मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेच्या बॅनरवर सहमती न घेता फोटो लावल्याचा आरोप बॅनरवर फोटो झळकलेल्या महिलांनी केला आहे. पुण्यात शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील भाजपचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी मतदारसंघात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजेनेचे बॅनर लावले आहेत. त्या बॅनरवर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह आमदार सिध्दार्थ शिरोळे यांचाही फोटो आहे. मात्र, या नेत्यांच्या फोटोसह या दोन महिलांचे फोटो देखील बॅनरवर लावले आहेत.या बॅनरवर झळकलेल्या महिलांपैकी एकीचं नाव नम्रता अंकुश कावळे तर दुसरीचं नाव भागीरथी माणिक कुरणे असं आहे. या दोन्ही महिलांच्या संमतीशिवाय त्यांचे फोटो बॅनरवर लावण्यात आल्याचा आरोप या महिलांनी केला आहे. त्यामुळे संमतीशिवाय योजनेच्या जाहिरातीवर आपले फोटो लावल्याने महिलांना थेट पुणे पोलिस आयुक्तांकडे तक्रार दिली आहे.

🛑आमदाराकडून दिलगिरी व्यक्त.

दरम्यान, कोणालाही दुखवण्याची आमची भावना नाही. ही योजना महिलांसाठी आहे, आमचा हेतू वाईट नाही, योगायोगाने हा फोटो त्या बॅनरवर आला आहे. जर कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करतो, अशी भावना आमदार शिरोळे यांनी या पोलीस तक्रारीनंतर माध्यमांशी बोलताना व्यक्त केली आहे.

🔴1 कोटी महिलांचे अर्ज दाखल

राज्य सरकारने महिला भगिंनींना खुश करत, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. त्यानुसार, 21 ते 65 वर्षे वयापर्यंतच्या महिलांना दरमहा 1500 रुपयांचा लाभ थेट बँक खात्यात मिळणार आहे. महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सरकारने हा निर्णय घेतला असून सध्या या योजनेची माहिती गावपातळीपासून सर्वच स्तरावर पोहोचवण्यात येत आहे. त्यामुळेच, योजनेला महिला भगिनींचा मोठा प्रतिसाद मिळत असून आत्तापर्यंत 1 कोटी अर्ज प्राप्त झाल्याची माहिती आहे. या योजनेचा पहिला हफ्ता रक्षाबंधन सणाच्या पाश्वभूमीवर बँक खात्यात जमा होणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.