“छत्रपती शाहू महाराज यांच्या जिल्ह्यात रेल्वे मंत्रालयाचा दुर्लक्षपणा.” का? .- अॅड. चंद्रकांत निकम. ( अध्यक्ष कोल्हापूर जिल्हा रहिवाशी सामाजिक प्रवासी महासंघ.)
( छत्रपती राजश्री शाहू महाराज यांनी स्वतः च्या पैशांनी कोल्हापूर ते मिरज रेल्वे सुरु केली.)
कोल्हापूर.- प्रतिनिधी.

“छत्रपती शाहू महाराज यांच्या जिल्ह्यात रेल्वे मंत्रालयाचा दुर्लक्षपणा.” का? .- अॅड. चंद्रकांत निकम अध्यक्ष कोल्हापूर जिल्हा रहिवाशी सामाजिक प्रवासी महासंघ वतीने प्रसिद्धी पत्रक दिली आहे. दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
संपूर्ण भारतातील लाखो भाविक श्री महालक्ष्मी देवीचे दर्शन, छत्रपती शिवाजी महाराज यांनी प्रशासन चालविलेले अनेक गडकिल्ले, निसर्गरम्य आंबोलीघाट, पवित्र रामतीर्थ व पुरानकालीन ऐतिहासिक पर्यटनस्थळे पाहण्यासाठी, त्याचसोबत गारगोटी, उत्तूर, कागल, गडहिंग्लज, आजरा, चंदगड सारख्या भागातील अनेक इंडस्ट्रीज मोठ-मोठे साखर कारखाने व दुग्ध संकलन प्रक्रियामधून तयार होणारा महागडा मालवाहतूक यामूळे अनेक उद्योग – धंदे बंद पडले असून काही बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. त्यासोबत नवीन मोठे प्रकल्प येत नाहीत त्यामुळे गाव-खेड्यातील अनेक होतकरू तरुण रोजगार व शेतीतून मुबलक उत्पन्न मिळत नसल्याने पुणे – मुंबई सारख्या शहरात लाखोच्या संख्येने आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह चालविण्यासाठी गेलेला असून हे मुंबईकर गावामध्ये सण, नोकरी, व्यापार व उद्योगधंदे यामुळे सतत ये-जा करत असतात पण रेल्वे विभागाकडून तसेच राजकीय नेते मंडळींच्या उदासीनतेमुळे तसेच शासकीय अधिकारी यांच्या दुर्लक्ष केल्यामुळे संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याची प्रगती ७५ वर्षानंतर रेल्वेच्या बेसिक सुविधा नसल्यामुळे हवी तितकी होऊ शकली नाही ही खंत आहे.
संपूर्ण भारतामध्ये ब्रिटीश शासन असताना देखील सन १८९० साली छत्रपती शाहू महाराज यांनी स्वतः च्या पैशांनी कोल्हापूर ते मिरज रेल्वे सुरु करून देखील आजही संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यामधील गार-गोटी, उत्तूर, गढहिंग्लज, हलकर्णी, महागाव, आजरा, नेसरी, चंदगड, सारख्या अनेक शहर व त्याच्या जवळपास असणारे ५०० पेक्षा अधिक लहान-मोठी गावे यांच्या पर्यंत गोर-गरिबांना स्वस्त व सुरक्षित सेवा देणारी भारतीय रेल्वे राजकीय इच्छा शक्ती नसल्या कारणाने पोहचू शकत नाही तरीही कोल्हापूर जिल्ह्यातील परिस्थितीशी लढत राहून शासनास मदत करत आहेत याचाच गैरफायदा महाराष्ट्रातील व केंद्रातील राजकीय नेत्यांनी घेतला असून आज रोजी जम्मू – काश्मीर, कोकण सारख्या दुर्गम भागात व गुजरात सारख्या राज्यात बुलेट ट्रेन सारखे करोडो रुपयंचे प्रकल्पसाठी शासनाकडे वेळ व पैसा आहे .
कोकण तसेच UP, बिहारसारख्या ठिकाणी केंद्र व राज्य सरकार गरजेनुसार गणपती, दिवाळी, दसरा, शिमगा, छटपूजा, एप्रिल व मे महिन्यामध्ये परिवारासह मुंबई मधून गावाकडे ट्रेनच्या माध्यमातून अतिरिक्त रेल्वे तात्काळ उपलब्ध केली जाते पण आजही कोल्हापूर जिल्ह्यातील अंदाजित २५ लाख शेतकरी,व्यवसाय, नोकरदार वर्गासाठी एकही अतिरिक्त रेल्वे उपलब्ध केली जात नाही तरीही कोल्हापूरकर खाजगी कार, बसेस व महागड्या टोल प्रवासामुळे हजारो प्रवासी वर्षानुवर्षे भरडला जात असून तो शांत असतो हा समज व दुर्लक्ष इथून पुढे स्वीकारणार नाही असा कडक इशारा कोल्हापूर जिल्हा रहिवाशी – प्रवाशी संघ याचे अध्यक्ष अॅड. चंद्रकांत निकम यांनी व त्यांच्या संपूर्ण समितीने जवळपास ५० पेक्षा अधिक पत्र व्यवहारातून पाठ-पुरावा सुरु ठेवण्यात आला आहे.
कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची सर्व पदाधिकारी यांनी कोल्हापूर जिल्ह्याच्या रेल्वे सुविधेबाबत वरिष्ठ रेल्वे अधिकारी, रेल्वे मंत्री व मुख्यमंत्री महोदय यांच्याशी कोल्हापूर जिल्ह्याच्या खालील प्रश्नाबाबत पत्रव्यवहार व सामुहिक बैठक बोलविण्यात यावी अशी नम्र विनंती केली आहे.
१) गणपती, दिवाळी, दसरा,एप्रिल, मे महिन्यामध्ये अतिरिक्त ट्रेनसेवा सुरु करणे.
२) महालक्ष्मी,सह्याद्री एक्सप्रेसच्या प्रवास वेळ कमी करून बोगीची संख्या वाढविणे.
३) बंद असलेली मुंबईपर्यंत सह्याद्री एक्सप्रेस गणपती पूर्वी सुरु करणे.
४) “वंदे भारत” रेल्वे सेवा निवडणूक पूर्वी हिरवा झेंडा दाखवणे.
५) कोल्हापूर-गडहिंग्लज-चंदगड ह्या नवीन रेल्वे मार्गाबाबत सर्वे करणे.
६) बेळगाव-चंदगड-सावंतवाडी चा सर्वे पूर्ण झाला असून रेल्वे सुरु करणे.
७) मंजूर कोल्हापूर-वैभावाडी ह्या नवीन रेल्वे मार्गाबाबत सर्वे करणे.
महाराष्ट्रातील पुणे, मुंबई, नागपूर नाशिक सारख्या जिल्ह्याचा विकास व भारताची आर्थिक राजधानी मुंबई सोबत स्वस्त व सुरक्षित असे रेल्वेचे जाळे केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून होत असताना सर्व-संपन्न तसेच साडे तीन पीठांपैकी एक असलेल्या महालक्ष्मीच्या कोल्हापूर जिल्ह्याकडे रेल्वे विभागाने वरील समस्या बाबत तत्काळ लक्ष देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली.
कोल्हापूर जिल्ह्यातील प्रत्येक गावातील राजकीय व शासनाच्या दुर्लक्षामुळे तात्काळ उपाय – योजना व लेखी आदेश न केल्यास केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या कडे प्रत्येक नागरिक लाखोच्या संख्येने पत्र पाठविण्याचा निर्धार करण्यात आला असून तशाप्रकारचे जन-जागृती व लोक चळवळ लवकरच केली जाणार आहे अशा प्रकारची माहिती कोल्हापूर जिल्हा रहिवाशी सामाजिक प्रवाशी संघाचे अध्यक्ष यांनी केली आहे. अॅड. चंद्रकांत निकम
अध्यक्ष कोल्हापूर जिल्हा रहिवाशी सामाजिक प्रवासी महासंघ त्यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
चौकट.
कोल्हापूर जिल्हा रहिवाशी सामाजिक प्रवासी महासंघ ही मुंबई, नवी मुंबई, ठाणे जिल्ह्यातील कोल्हापूर वासीयांनी सुरू केलेली संस्था आहे. या संस्थेच्या माध्यमातून कोल्हापूर ते चंदगड रेल्वे सुरू करणे, एस टी बस सुरू करणे,गणेशोत्सव करीत जादा बसेस सोडणे,रेल्वे ला जादा बोगी लावणे, तसेच सह्याद्री एक्सप्रेस मुंबई पर्यंत पूर्वीप्रमाणे सोडने आदी मागण्या घेऊन काम करत आहे,मी सुरेश दळवी सदर संस्थेचा प्रमुख मार्गदर्शक आहे,ही चळवळ गावागावात पोचण्यासाठी आपल्या सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.
