Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रखासदार छत्रपती शाहू महाराज यांचा - आजरा पुर पाहणी दौरा.🟥कोल्हापूरात पावसाची विश्रांती.-...

खासदार छत्रपती शाहू महाराज यांचा – आजरा पुर पाहणी दौरा.🟥कोल्हापूरात पावसाची विश्रांती.- महापूर ओसरतोय.( परिस्थिती पूर्ववत होण्यास काही दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता.)🟥राज्यात पावसाचा जोर ओसरला.- कोकण आणि मध्य महाराष्ट्रात हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता.

🛑खासदार छत्रपती शाहू महाराज यांचा – आजरा पुर पाहणी दौरा.
🟥कोल्हापूरात पावसाची विश्रांती.- महापूर ओसरतोय.
( परिस्थिती पूर्ववत होण्यास काही दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता.)
🟥राज्यात पावसाचा जोर ओसरला.- कोकण आणि मध्य महाराष्ट्रात हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता.

आजरा.- प्रतिनिधी

कोल्हापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे उद्भवलेल्या पूरपरिस्थितीची पाहणी करण्यासाठी आजरा येथील दौऱ्यादरम्यान या मार्गावरील खचलेल्या रस्त्याची आदरणीय खासदार श्रीमंत शाहू छत्रपती महाराजांनी आमदार सतेज पाटील यांच्यासोबत पाहणी केली
व रस्ते विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता मुदाळे यांना फोन वरून सुचना दिल्या यावेळी संकेश्वर-बांदा महामार्ग टोल मुक्ती संघर्ष समितीच्या वतीने टोलच्या विषया संदर्भात निवेदन देण्यात आले. तसेच समिती सदस्यांशी चर्चा करून त्यांची म्हणणे ऐकून घेतले. तसेच चितळे जेऊर भावेवाडी ग्रामपंचायत वतीने आजरा चंदगड रोड धरणाच्या पाण्याचा तुंब आल्याने रोड बंद आहे पर्याय पूलाचे काम लवकर करण्यासाठी सुचना समंधीत विमागाला देण्यात याव्यात हे निवेदन द्वारे सांगीतले. ‌आजरा पेरणोली गारगोटी – कडगाव रस्ता साळगाव धरणावर गेले आठ दिवस पाणी आल्याने रोड बंद आहे पर्यायी पुलाची मागणी कॉम्रेड संपत देसाई, आदेश गूरुव, संकेत सावत, व वाय बी चव्हाण यांनी केली. यावेळी गोकुळच्या संचालिका श्रीमती अंजनाताई रेडेकर, शिवसेना उबाठा गटाचे सुनील जिल्हाप्रमुख शिंत्रे, मुकुंदराव देसाई, परशुराम बामणे प्रभाकर कोरवी, बंडा चव्हाण वाय बी चव्हाण, संजयभाऊ सावंत, रविंद्र भाटले, रणजीत देसाई, विक्रम देसाई, ‌गौरव देशपांडे, रवि तळेवाडीकर, प्रकाश मोरुसकर, सागर कसलकर, उबाठा शिवसेना ता. प्रमुख युवराज पोवार, उमेश आपटे, विद्याधर गुरबे, अनिल प्रधान जितेंद्र नांदवडेकर सुर्यकांत कांबळे संकेत सावंत आदेश गुरुव यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

🟥कोल्हापूरात पावसाची विश्रांती.- महापूर ओसरतोय.
( परिस्थिती पूर्ववत होण्यास काही दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता.)

कोल्हापूर :- प्रतिनिधी.

मुसळधार पावसामुळे महापुराचा जबरदस्त फटका बसलेल्या कोल्हापूरकरांना आता दिलासा मिळायला सुरुवात झाली आहे. पंचगंगा नदी धोका पातळीच्या वर 47 फुटांवर वाहत आहे. पावसाने आता उसंत घेतल्याने शहर आणि ग्रामीण परिसरात पुराची परिस्थिती सुधारण्यास सुरुवात झाली आहे. सखल भागात साचलेले पाणी आता ओसरू लागले आहे. परंतु, परिस्थिती पूर्ववत होण्यास अजून काही दिवसांचा कालावधी लागू शकतो.
🟥कोल्हापूरमध्ये पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे धरणं ओव्हर फ्लो झाली आहेत. या धरणांमधून नद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग केला जात आहे. अशामध्ये जिल्ह्यातील ८५ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. पूरस्थितीमुळे ११ राज्य, ३७ प्रमुख जिल्हा मार्ग पूरामुळे बंद झाले होते. त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला होता. पण आता अनेक ठिकाणी पूराचे पाणी ओसरले आहे. पण काही ठिकाणी पूरस्थिती कायम आहे. कोल्हापूर जिल्ह्यात पावसाने सध्या विश्रांती घेतली आहे. शहर परिसरात घुसलेलं पावसाचं पाणी आता ओसरले आहे. पंचगंगेवरील राजाराम बंधारा पाणी पातळी ४६.०५ फुटांवर आले आहे. तर जिल्ह्यातील ८५ बंधारे पाण्याखाली गेली आहेत. सतत कोसळणाऱ्या पावसामुळे पन्हाळा गडावरील रेडे घाट परिसरातील रस्त्यावर काल दरड कोसळली होती. त्यामुळे पन्हाळ्याहून पावनगडला जाणारा रस्ता बंद झाला होता.
🔴31 जुलै पर्यंत कोल्हापूर जिल्ह्याला ग्रीन अलर्ट असल्यामुळे पावसाने थोडीशी उघडीप घेतल्याचे पाहायला मिळत आहेत. धरण क्षेत्रातही पावसाचा जोर ओसरला असून राधानगरी धरणाचे फक्त 2 स्वयंचलित दरवाजे सध्या उघडलेले आहेत. पण सध्या पावसाचा जोर ओसरल्यामुळे हे दोन्ही दरवाजे देखील येत्या काळात बंद होतील अशी शक्यता आहे. दरम्यान. 28 जुलै रोजी संध्याकाळी सहा वाजता पंचगंगा नदीचे पाणी पातळी हे राजाराम बंधारा या ठिकाणी 47 फूट 02 इंच इतकी नोंदवण्यात आली आहे. त्यामुळे धोका पातळीच्याही पाच फूट वर नदीची पाणी पातळी असून अगदी संथ गतीने पाणी पातळीत घट होत आहे. दरम्यान, येत्या काळात पावसाचा जोर अगदी कमीच राहिला तर पूर परिस्थिती लवकर संपुष्टात येऊ शकते.

🟥राज्यात पावसाचा जोर ओसरला.- कोकण आणि मध्य महाराष्ट्रात हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता

पुणे :- प्रतिनिधी.

राज्यात पावसाचा जोर ओसरला आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या ठिकाणी हवामान विभागाने पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. हवामान विभागाने जारी केलेल्या अंदाजानुसार आज ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, सातारा, विदर्भातील अमरावती जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. या ठिकाणी आज हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
🟥पुणे वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार, समुद्र सपाटीवरील कमी दाबाचा पट्टा दक्षिण गुजरात ते उत्तर केरळ किनारपट्टी पर्यंत आहे. आज २९ जुलै रोजी कोकणात बहुतांश ठिकाणी तर विदर्भात बऱ्याच, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. आज रायगड जिल्हा तसेच पुणे व सातारा जिल्ह्याच्या घाट विभागात तुरळक ठिकाणी खूप जोरदार पावसाची शक्यता असल्याने तसेच अमरावती वर्धा व नागपूर जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह खूप जोरदार पाऊस पडण्याची दाट शक्यता असल्याने वरील सर्व जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
🔴ठाणे. मुंबई, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, अकोला, भंडारा, चंद्रपूर जिल्ह्यांना उद्यापासून पुढील तीन ते चार दिवस तर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, तसेच पुणे सातारा व कोल्हापूर जिल्ह्याच्या घाट क्षेत्रामध्ये तुरळक ठिकाणी जोरदार ते खूप जोरदार पावसाची शक्यता असल्याने या ठिकाणी यलो अलर्ट देण्यात आला आहे. विदर्भात ३० व ३१ जुलैला बहुतांश जिल्ह्यात तर एक ऑगस्टला पूर्वेकडील काही जिल्ह्यात तर ठिकाणी वादळी वाऱ्यासह मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता असल्याने या ठिकाणी सुद्धा यल्लो अलर्ट देण्यात आला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.