संकेश्वर-बांदा महामार्ग टोल मुक्ती संघर्ष समितीचे खास. छत्रपती शाहू महाराज यांना निवेदन.
आजरा.- प्रतिनिधी.

संकेश्वर – बांदा महामार्ग टोल मुक्ती संघर्ष समितीच्या वतीने खास. छत्रपती शाहू महाराज यांना आज दि. २८ रोजी निवेदन देण्यात आले. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
संकेश्वर बांदा महामार्गावर आजरा शहरालगत उभा राहत असलेला टोल नाक्याचा प्रश्न, या रस्त्यासाठी शेतकऱ्यांच्या संपादित जमिनीचा मोबदला, रस्त्याचा दर्जा, ज्या गावातून रस्ता जाती त्या गावातील पाण्याचा निचरा यासह इतर सुविधाबवावत आपल्या उपस्थितीत आणि जिल्हाधिकारी कोल्हापूर व संबंधित विभागाचे सर्व अधिकारी यांच्यासह संयुक्त बैठक आयोजित करणे बावत तसेच या बैठकीनंतर त्याचा अहवाल केंद्रीय दळणवळण मंत्रालयाला पाठवून नितीन गडकरी यांचे सोबत आजरा येथील संकेश्वर – बांदा महामार्गावरील टोल नाक्याबाबत चर्चा करून बैठक
लावणे बाबत. यामध्ये
आ. प्रकाश आबिटकर यांचे अध्यक्षतेखाली कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग विभाग, कोल्हापूर (NH PWD), प्रकल्प संचालक, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण, कोल्हापूर (NHAI), उपविभागीय अधिकारी भुदरगड, टोल मुक्ती संघर्ष समितीचे प्रतिनधी आणि तालुकावासीय यांची दिनांक २०/०६/२०२४ आजरा तहसील कार्यलयात झालेली बैठक २- संकेश्वर बांदा महामार्ग टोल मक्ती संघर्ष समिती आजरा यांनी आजरा तहसीलदार यांना दिनांक
०५/०६/२०२४५ १९/०६/२०२४ रोजी दिलेले निवेदन ३. दि २४ जून २०२४ रोजी आजरा येथे टोल नाक्याची उभारणी जिथे केली जात आहे त्याठिकाणी
चौकट
आजरेकर जनतेचा निघालेला मोर्चा.
दि २२ जुलै २०२४ रोजी आजरा तहसील कार्यालयावर तालुक्यातील सर्व पक्षीय जनतेच्या वतीने टोल विरोधात झालेले धरणे आंदोलन
दिनांक २०/०६/२०२४ रोजी आजरा शहरालगत उभा राहत असलेल्या टोल नाक्या संदर्भात आ. प्रकाश आबिटकर यांचे उपस्थितीत बैठक झाली, या बैठकीला कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग, प्रकल्प संचालक भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण आणि उपविभागीय अधिकारी भुदरगड यांच्यासह संकेश्वर बांदा महामार्ग टोल मुक्ती संघर्ष समितीचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या बैठकीत टोल देण्याबाबत आजरा तालुकावासियांनी आपला विरोध तीव्रपणे आपल्यासमोर मांडला आहे. या विरोधात २४ जून २०२४ रोजी तालुक्यातील जनतेने प्रचंड संख्येने मोर्चा नेऊन आपला असंतोष दाखवून दिला आहे. हा विरोध करतांना कांही महत्वाचे प्रश्नः मुद्दे या रस्त्याबाबत उभे केले आहेत. ते मुद्दे लक्षात घेऊन मंत्रालय स्तरावर धोरण म्हणून या रत्यावर आकारल्या जाणाऱ्या टोलचा निर्णय झाला पाहिजे अशी आजरेकर जनतेची भूमिका आहे. त्यामुळे खालील मुद्यांच्या विचार होणे आम्हाला महत्वाचे वाटते.
चौकट.

मुळात संकेश्वर बांदा हा रस्ता राज्यमार्ग होता, तो राष्ट्रीय महामार्गाकडे का वर्ग करण्यात आला. हे स्पष्ट नाही. हा रस्ता बांधा, वापरा व हस्तांतरित करा या तत्वावर होत नाही. या रस्त्यासाठी लागणारा सर्व निधी.हा केंद्राने दिलेला आहे. आणि हा निधी जनतेच्या महसुलातून जमा झालेल्या असल्याने या रस्त्याच्या बांधकामासाठी झालेला खर्च टोलच्या माध्यमातून जनतेकडून वसूल करण्याचा प्रश्नच येत नाही. टोल आकारणी करणे म्हणजे जनतेवर जुलमी कर लादल्यासारखे आहे.
, केवळ केंद्राने महसुलातून दिलेला निधी वसूल करण्यासाठी याला राष्ट्रीय महामार्ग म्हंटले असेल तर राज्य सरकारने केंद्राचा निधी त्यांना परत करून हा रस्ता आपल्याकडे वर्ग करून घ्यावा. पूर्वी जसा होता तसा राज्यमार्ग ठेऊन त्याच्या संपूर्ण देखभाल दुरुस्तीची जबाबदारी राज्यसरकारने घ्यावी आणि हा रस्ता टोलमुक्त करावा,, राष्ट्रीय महामार्गाचे जे निकष आहेत आणि ज्या सुविधा राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून दिल्या जातात त्या पैकी कांहीही या तथाकथित महामार्गावर दिसत नाहीत, या रस्त्याचे केवळ रुंदीकरण आणि मजबुतीकरण केले आहे. रस्त्याला विभाजक नसून हा चारपदरी, सहापदरी असा नाही. या रस्त्यावर कोठेही भराव पूल, उड्डाणपूल नाहीत. बाजूने कोठेही सर्व्हिस रोड बांधलेले नाहीत, ट्रामा केअर सेंटरची उभारणी नाही, असे असतांना केवळ राष्ट्रीय महामार्गकडे वर्ग झाल्यामुळे या रस्त्यावर टोल आकारणी केली जाणार आहे., राष्ट्रीय महामार्ग क्रमांक (४) या रस्त्यापासून कराड येथून ढेबेवाडीच्या दिशेने चारपदरी रस्ता दुभाजकासह बनवला आहे. त्यावर कोणत्याही प्रकारची टोल आकारणी केलेली नाही. पण संकेश्वर जवळून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ गडहिंग्लज, आजरा ते बांदा निघणाऱ्या रस्ता केवळ रुंदीकरण आणि मजबुतीकरण केले
आहे. त्याला दुभाजक नाही. असे असतांना टोल आकारणी केली जाणे हे अन्याय करणारे आहे., या रस्त्यावर आजरा शहरापासून ११ किमी अंतरावर शेतकऱ्यांनी उभ्रलेला सहकारी साखर कारखाना आहे. गळीत हंगामात या कारखान्याकडे येणारा ऊस या मार्गानेच येत असतो, टोल नाक्यावर आकारणी केली जाणार असल्याने त्याचा नाहक भुर्दंड शेतकऱ्यांच्यावर बसणार आहे.
, हा रस्ता तालुक्यतील ज्या गावातून जातो त्या गावातील शेतकऱ्यांच्या संपादित झालेल्या जमिनीला मोबदला मिळालेला नाही, याबरोबर पाण्याचा निचरा करण्यासाठी गटर नाहीत, योग्य सुविधा आणि रस्त्याचा दर्जा म्हणावा तसा झालेला नाही, या सर्व मुद्यांचा विचार करून करून निर्णय घेण्यासाठी मा. जिल्हाधिकारी कोल्हापूर, कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग विभाग, कोल्हापूर (NH PWD), प्रकल्प संचालक, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण, कोल्हापूर (NHAI), उपविभागीय अधिकारी भुदरगड यांचेसह संबधित सर्व जबाबदार अधिकऱ्यांची निर्णायक बैठक आयोजित करावी, या बैठकीनंतर या बैठकीचा अहवाल केंद्रीय दळणवळण मंत्रालायला पाठवून नितीन गडकरी यांचेसोबत बैठक लावण्यास आपण पुढकार घ्यावा
याबाबतच्या मागण्या सदर निवेदनात करण्यात आले आहेत यावेळी संकेश्वर बांदा टोलविरोधी संघर्ष समितीचे संपत देसाई, आम. सतेज पाटील, मुकुंददादा देसाई, प्रभाकर कोरवी, परशुराम बामणे , प्रकाश मोरस्कर, अंजनाताई रेडेकर, रवींद्र भाटले, तसेच टोलविरोधी संघर्ष समितीचे सर्व पदाधिकारी व महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
