Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रपुराच्या पाण्यात.- तारेवरची कसरत करत. - विद्युत प्रवाह केला चालू.- आजरा -...

पुराच्या पाण्यात.- तारेवरची कसरत करत. – विद्युत प्रवाह केला चालू.- आजरा – मडिलगेत पिण्याचा पाण्याचा प्रश्न मार्गी.. महावितरण कर्मचाऱ्यांचे कौतुक.🛑आजरा महाविद्यालय आजरा येथे शिक्षण सप्ताहातील चौथा दिवस संपन्न.

🛑पुराच्या पाण्यात.- तारेवरची कसरत करत. – विद्युत प्रवाह केला चालू.- आजरा – मडिलगेत पिण्याचा पाण्याचा प्रश्न मार्गी.. महावितरण कर्मचाऱ्यांचे कौतुक.
🛑आजरा महाविद्यालय आजरा येथे शिक्षण सप्ताहातील चौथा दिवस संपन्न./ मडिलगेत लाडकी बहिण योजना – आढावा बैठक ग्रामपंचायत येथे संपन्न.

आजरा.- प्रतिनिधी.

Oplus_0

मडिलगे ता. आजरा येथे मागील चार दिवसांपासून नदीकाठील पोल वरून विद्युत प्रवाह खंडित झाला होता. यामुळे ग्रामस्थांच्या पिण्याच्या प्रश्न निर्माण झाला होता. यामध्ये पुराच्या पाण्याने नद्या पात्राबाहेर असताना या पाण्यामधून आजरा महावितरण मडिलगेचे विभागाचे कार्मचारी दिलीप बोरघरे, तसेच सहकारी प्रदीप लाईनमन भरत व श्री. पाटील यांच्या आथक प्रयत्नातून विधुत पुरवठा सुरू करण्यास यश आले. मडिलगे येथे पिण्याच्या पाण्याची विद्युत प्रवाह खंडित झाल्याने चार दिवस पाणी बंद होते. याकामी ग्रामस्थ तानाजी येसणे, विनायक पाटील, शैलेश निऊंगरे, सुदाम सुतार, रमेश भाईगडे, दत्तात्रय जाधव यांच मोलाच सहकार्य लाभले या सर्व ग्रामस्थांचे ग्रामपंचायत मडिलगे यांच्या वतीने खुप खुप धन्यवाद व आभार सरपंच, उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य यांनी मानले.

🛑आजरा महाविद्यालय आजरा येथे शिक्षण सप्ताहातील चौथा दिवस संपन्न.

आजरा. – प्रतिनिधी.

राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्या २० व्या वर्धापन दिनानिमित्त महाराष्ट्रात शिक्षण सप्ताह साजरा करण्यात येत आहे. त्यानिमित्त आजरा महाविद्यालय आजरा येथे दि २३ जुलै ते २८ जुलै या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्या अंतर्गत कला आणि संस्कृतीच्या विविध उपक्रमाद्वारे शालेय वातावरण चैतन्यमय बनवण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व सर्जनशीलतेला वाव देण्यासाठी आजरा महाविद्यालय आजरा येथे गुरुवार दि. २५ जुलै रोजी शिक्षण सप्ताह उपक्रमा अंतर्गत संस्कृतिक दिन साजरा करण्यात आला. ज्या दिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. आजरा महाविद्यालय आजरा मधील कनिष्ठ विभागातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यामध्ये विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गायन समूहगीत पोवाडा एकपात्री नाटक कथक नृत्य बहारदार लावणी अशा विविध उपक्रमांचे सादरीकरण करण्यात आले.
या कार्यक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सादळे यांनी केले. प्रमुख उपस्थितीत महाविद्यालयाचे उप.प्राचार्य डी पी संकपाळ सर व कार्यालयीन अधीक्षक योगेश पाटील सर उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील प्रा. सुवर्णा धामनेकर , प्रा.‌ नेहा पेडणेकर,, प्रा. रागिनी राजमाने प्राध्यापिका ज्योती कुंभार प्रा. शुभांगी सावंत प्रा. वैशाली देसाई, प्राध्यापिका रूपाली फोडेकर, प्रा. शोभा केंद्रे, प्रा. नार्वेकर, प्रा. पारकर, प्रा. पूनम लीचम, तसेच प्रा. रत्नदीप पवार , प्रा. मल्लिकार्जुन शिंत्रे, प्रा. रवींद्र मस्कर , प्रा. संजय गाईंगडे प्रा. भारत वायकसकर प्रा. अरुण सुरंगले प्रा. अल्बर्ट फर्नांडिस प्रा. विठ्ठल हक्के उपस्थिती होते. कार्यक्रमाचे आयोजन प्रा. स्वाती माने प्रा. वैशाली देसाई, प्राध्यापक फगरे प्रा. भूषण गावडे यांनी केले कार्यक्रमाचे स्वागत प्रा. अनिल निर्मळे यांनी केले तर प्रास्ताविक प्रा. विनायक चव्हाण यांनी केले, कार्यक्रमाचे आभार प्रा. रणजीत भादवणकर यांनी मानले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक संदीप देसाई व प्राध्यापिका संजीवनी कांबळे यांनी केले
.

मडिलगेत लाडकी बहिण योजना आढावा बैठक ग्रामपंचायत येथे संपन्न.

आजरा. – प्रतिनिधी .

oplus_131074

मडिलगे. ता. आजरा येथे लाडकी बहिण आढावा बैठक दि. २७ रोजी संपन्न झाली. यामध्ये अंगणवाडी, आशा सेविका यांच्या माध्यमातून सदर योजनेची नोंदणी सुरू आहे. यातील एकुण लाभार्थी किती व किती लाभार्थी यांची नोंद झाली आहे. यामधील फार्म जमा करून घेणे कोणताही लाभार्थी या योजनेपासून वंचित राहू नये याची खबरदारी म्हणून हि आढावा बैठक चावडी वाचन या बैठकीला सरपंच बापू निऊगरे अध्यक्षस्थानी होते. ग्रामसेवक राहुल सुतार स्वागत व प्रस्ताविक केले. अंगणवाडी सेवका यांनी यादी वाचन केले. तलाठी रेखा कांबळे, अंगणवाडी सेविका वंदना वजरेकर, वैभवी मुंज, मंगल गुरव, प्रतिक्षा कोळेकर, मंगल डोंगरे सी. आर. पी. रेश्मा भाईगडे, आशा सेविका सुमन कुंभार, वैशाली येसने, संगिता पाटील, संगणक परिचालक शारदा गुरव, ग्रामपंचायत सदस्य शांता सुतार सह ग्रामपंचायत कर्मचारी दत्ता जाधव उपस्थित होते. सरपंच श्री निऊगरे यांनी उर्वरित महिला लाभार्थी यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन केले. ग्रामपंचायत सदस्य सुतार यांनी आभार मानले

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.