Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रशहरातील भटकी कुत्री, रस्त्याच्या दुरअवस्था निषेधार्थ उबाठा सेनेचा - नगरपंचायतवर मोर्चा.( आंदोलनात...

शहरातील भटकी कुत्री, रस्त्याच्या दुरअवस्था निषेधार्थ उबाठा सेनेचा – नगरपंचायतवर मोर्चा.( आंदोलनात कुत्रे घेऊन नगरपंचायत समोर निदर्शने. )

शहरातील भटकी कुत्री, रस्त्याच्या दुरअवस्था निषेधार्थ उबाठा सेनेचा – नगरपंचायतवर मोर्चा.
( आंदोलनात कुत्रे घेऊन नगरपंचायत समोर निदर्शने. )

आजरा.- प्रतिनिधी.‌

आजरा येथील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने आजरा नगरपंचायत समोर भटकी कुत्री व रस्त्यांची दुरावस्था याबाबत उभाठा शिवसेनेच्या वतीने आंदोलकांनी हातात कुत्रे घेऊन घोषणा देत दि. २३ रोजी निदर्शने केली. यावेळी आंदोलन प्रतिक्रिया देताना म्हणाले.
मागील अनेक महिने आजरा शहरात भटक्या कुत्र्यांनी लहान मुले व अनेक नागरिकांवर हल्ला केल्याच्या घटना घडल्या आहेत. या घटना घडूनही प्रशासनाकडून कोणताही ठोस उपाय केलेला नाही. उलट या कुत्र्यांचा वावर व संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. हे धोकादायक आहे. या कुत्र्यांचा बंदोबस्त तात्काळ होणे गरजेचे आहे. तसेच शहरामध्ये अनेक कॉलनीमध्ये पाण्याची पाईपलाईन टाकल्याने रस्ते उखरुन ठेवलेले आहेत. त्यामुळे चिखलाचे साम्राज्य झालेले आहे. गांधीनगर येथील दरवाजकर कॉलनीमध्ये एक महिला आजारी होती पण रस्त्यावर चिखल झाल्यामुळे रुग्णवाहीका घरापर्यंत पोहचू शकली नाही. त्या महिलेला उचलून १०० मीटर पर्यंत नेवून गाडीत घालावे लागले हा प्रकार दुदैवी आहे. असा अनेक गल्लीत चिखल झाल्यामुळे लोकांना आपल्या घरापर्यंत जाण्यासाठी कसरत करावी लागते याकडे आपल्या नगरपंचायतीचे दुर्लक्ष आहे. हा सर्व प्रकार गंभीर असल्यामुळे आपला निषेध करण्यासाठी व यावर तात्काळ उपाययोजना करावी अन्यथा यापेक्षाही मोठ्या आंदोलनाला नगरपंचायत त्याला सामोरे जावे लागेल अशी मागणी मनोगतातून दयानंद भोपळे व समीर खेडेकर यांनी केली.

चौकट

oplus_131074

याबाबत उपजिल्हाप्रमुख संभाजी पाटील यांनी मुख्याधिकारी ज्यांना धारेवर धरत नागरिकांच्या जीवाशी खेळ होत. आरोग्याच्या दृष्टीने फवारणी नाही. डेंगू चा सारख्या रोगाचा फैलाव होत आहे. काही कॉलनीमध्ये रस्ते नाहीत. व ज्या ठिकाणी रस्ते आहेत. ते खचलेले आहेत त्या ठिकाणी मुरूम टाकून घ्यावा. अशा काही समस्या असताना नगरपंचायत चे दुर्लक्ष होत असल्याने संताप व्यक्त केला व जोपर्यंत तुम्ही आम्हाला उद्यापासून भटकी कुत्री पकडण्याची मोहीम राबवत हाती घेत व खचलेल्या रस्त्यामध्ये मुरूम टाकतो याबाबत असे लेखी पत्र देत नाही व उद्यापासून भटकी कुत्री पकडण्याची मोहीम हाती घ्यावी लागेल. तोपर्यंत आमचे आंदोलन थांबणार नाही या उभ्या पावसात आम्ही नगरपंचायतच्या दारात बसू अशी भूमिका घेतल्यामुळे नगरपंचायत मुख्याधिकारी श्री सुर्वे यांनी लागलीच लेखी पत्र दिले. यामुळे उद्यापासून भटक्या कुत्र्यापासून नागरिकांची मुक्तता होईल व ज्या कॉलनीमध्ये रस्ता खराब आहे त्याची दुरुस्ती होणार असल्याने आंदोलनाला यश आले आहे.
यावेळी शहरप्रमुख ओमकार माध्याळकर. सह अभिजीत मनगुतकर, भिकाजी विभूते, महेश पाटील, रोहन गिरी, आनंदा कागिनकर, राजू बंडगर, दिनेश कांबळे पदाधिकारी व शिवसैनिक आंदोलनात सहभागी झाले होते.‌ आजरा पोलीस स्टेशनचे सपोनि नागेश यमगर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस बंदोबस्त होता.‌

Oplus_0

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.