Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रकोल्हापुरात मुसळधार! जिल्ह्यात तब्बल ७८ बंधारे पाण्याखाली!! पहा - नृसिंहवाडीतील दत्त मंदिर...

कोल्हापुरात मुसळधार! जिल्ह्यात तब्बल ७८ बंधारे पाण्याखाली!! पहा – नृसिंहवाडीतील दत्त मंदिर ही ९० टक्के पाण्याखाली..!!!

🟥कोल्हापुरात मुसळधार! जिल्ह्यात तब्बल ७८ बंधारे पाण्याखाली!! पहा – नृसिंहवाडीतील दत्त मंदिर ही ९० टक्के पाण्याखाली!!

कोल्हापूर – प्रतिनिधी.

हवामान खात्याने आज (ता. २३) जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा दिल्याने चिंता कायम आहे. सर्वाधिक पाऊस शाहूवाडी तालुक्यात ९२.२ मिलिमीटर पडला. जिल्ह्यातील ७८ बंधारे पाण्याखाली आहेत.

🟣जिल्ह्यात कालही सर्वदूर पाऊस झाला. काल सकाळी पंचगंगा नदीने इशारा पातळी (३९ फूट) गाठली. धरण क्षेत्रातही दमदार पाऊस असल्याने दिवसभरात नदीच्या पातळीत वाढ होत राहिली. रात्री आठ वाजता पंचगंगेची पाणी पातळी ३९.९ तर मध्यरात्री १२ वाजता ४० फूट होती.

🔴सर्वाधिक पाऊस शाहूवाडी तालुक्यात ९२.२ मिलिमीटर पडला. जिल्ह्यातील ७८ बंधारे पाण्याखाली आहेत. जिल्ह्यातील बहुतांश लघुप्रकल्प पूर्ण भरले असून मोठ्या धरणांतील पाणी साठ्यातही झपाट्याने वाढ झाली आहे. जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांत बहुतांश भागात अतिवृष्टीसदृश पाऊस झाला आहे. त्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. पाणी आसपासच्या परिसरात पसरले आहे.

🟥काही गावांमधील मानवी वस्तीतही पाणी आल्याने तेथील नागरिकांना स्थलांतरित करावे लागले आहे. शहरात ७८ लोकांचे स्थलांतर केले आहे. धरणक्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे नदीची पाणी पातळी वाढत आहे. नदीची धोका पातळी ४३ फुटांवर आहे. जिल्ह्याला अतिवृष्टीचा इशारा दिला असून त्याप्रमाणे पाऊस पडला तर महापुराची स्थिती येण्याची भीती आहे. त्यामुळे चिंता वाढली आहे. त्यादृष्टीने प्रशासनाने तयारी केली असून पूरप्रवण क्षेत्रातील गावांमध्ये सतर्कतेचा इशारा दिला आहे. स्थलांतराची तयारी केली असून आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत.

🟥दत्त मंदिर ९० टक्के पाण्याखाली

नृसिंहवाडी येथील कृष्णा व पंचगंगा नदीच्या पात्रात गेल्या २४ तासांत साधारण पाच फुटांनी वाढ झाली आहे. येथील दत्त मंदिर नव्वद टक्के पूर्णपणे पाण्याखाली गेले आहे. दरम्यान नदीकाठच्या शेतात पाणी आल्याने शेतकरी चिंतेत आहे. काठची गवताची कुरणे पाण्यात गेल्याने चारा टंचाई निर्माण होत आहे.

🔴पंचगंगेची पातळी आणि पाणी येण्याची संभाव्य ठिकाणे

  • ४३ फूट- सुतारवाडा
  • ४५ फूट- जुने शिये नाका ओढ्यावर पाणी येऊन बावडा रस्ता बंद, रिलायन्स मॉल पिछाडीस कुंभार गल्ली, कामगार चाळ, कांदा बटाटा मार्केट शाहूपुरी कोंडा ओळ
  • ४५.५ फूट- व्हिनस कॉर्नर, व्हिनस टॉकीज ते बर्फ फॅक्टरी रस्ता बंद, नाईक मळा, पोलो ग्राउंड
  • ४७.२ फूट – पंचगंगा हॉस्पिटल, जामदार क्लब, शुक्रवार पेठ पश्चिम बाजू, आयडियल कॉलनी लक्षतीर्थ वसाहत, सुतार मळा व शिंगणापूर रस्ता बंद
  • ४७.४ फूट – शाहूपुरी कुंभार गल्ली, मुक्त सैनिक वसाहत, काटे मळा, यशोधा पार्क, मलयगिरी अपार्टमेंट, जाधववाडी, बापट कॅम्प, कपूर वसाहत
  • ४७.५ फूट – रेणुका मंदिर गुंजन हॉटेल, त्र्यंबोलीनगर, रेणुकानगर, घाडगे गृहयोग
  • ४७.५ फूट- विलसर पूल ते व्हिनस कॉर्नर रस्ता बंद, लक्ष्मीपुरी ते नाईक अँड नाईक कंपनी रस्ता बंद, गवत मंडई रस्त्याची पश्चिम बाजू पाण्यात
  • ४७. ७ फूट- सुभाष रोड (टायटन शोरुम ते फोर्ड कॉर्नर) रस्ता बंद
  • ४७. ८ फूट – पिनाक, सनसिटी, माळी मळा, महावीर कॉलेज पिछाडीस, पोलो ग्राउंड, जावडेकर अपार्टमेंट, ड्रीम वर्ल्डची मागील बाजू
  • ४८ फूट – मुक्त सैनिक रिक्षा स्टॉप ते मलयगिरी रस्ता बंद, काटे मळा ते सफायर पार्क रस्ता बंद, मेनन बंगला ते शेळकेसोा नगरसेवक घरासमोरील रस्ता बंद
  • ४८.८ फूट – शंकराचार्य मठ, पंचगंगा तालीम (जामदार क्लब ते पंचगंगा हॉस्पिटल रस्त्याची पश्चिम बाजू पूर्ण पाण्यात ), उषा टॉकिज (बी न्यूज ऑफिस ते व्हिनस कॉर्नर रस्ता बंद (स्टेशन रोड)
  • ४९.११ फूट – घोडकेवाडी, मुक्त सैनिक वसाहत पूर्व बाजू, एमएसईबी, बापट कॅम्प, कदमवाडी, गणेश पार्क
  • ५१ फूट – दुधाळी (कोल्हापूर ऑर्थोपेडिक सेंटर, महाराणा प्रताप हायस्कूल), उत्तरेश्वर गवत मंडई नाका, दुधाळी ग्राउंड परिसर
  • ५१.८ फूट – कोल्हापूर कमान ते टोल नाका रस्ता बंद
  • ५३ फूट – बसंत बहार ते जिल्हाधिकारी कार्यालय पूर्व भाग पाण्यात (जिल्हाधिकारी कार्यालय पिछाडीस उमेदपुरी)
  • दरम्यान, रेणुका मंदिर पिछाडीस पाणी येते. माळी मळा, मेडिकल कॉलेज बावडा, उलपे मळा, रमण मळा, जावडेकर इमारत, नाईक मळा, पॅलेस पिछाडीस, राजहंस प्रिंटिंग प्रेस, हरिपूजा पूरम, त्रिकोणी बाग ते महावीर कॉलेज रस्ता बंद, केव्हिज पार्क, दीप्ती पार्क, डायमंड हॉस्पिटल, अंतरंग हॉस्पिटल, खानविलकर पेट्रोल पंप ते जिल्हाधिकारी कार्यालय रस्ता बंद, जिल्हाधिकारी कार्यालय ते महावीर कॉलेज व्‍हाया पाटलाचा वाडा रस्ता बंद, बसंत बहार ते जिल्हाधिकारी कार्यालय रस्ता बंद, भालजी पेंढारकर हॉल परिसर (महावीर गार्डन दक्षिण बाजू), दसरा चौक ते व्हिनस कॉर्नर रस्ता बंद, दुर्गा मंदिर (लक्षतीर्थ वसाहत)

🟥आलमट्टीतून दीड लाखांचा विसर्ग कायम

चिक्कोडी :-आलमट्टी जलाशयातून सोमवारीही दीड लाख क्युसेकचा विसर्ग कायम ठेवला आहे. दोन दिवसांच्या तुलनेत धरणात पाण्याची आवक थोडीशी वाढली असली, तरी विसर्ग कायम ठेवल्याने सोमवारी कृष्णेची पातळी गतीने वाढलेली नाही. धरणात ९३ टीएमसी पाणीसाठा आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.