🛑आता परवानगीची गरज नाही.- मैदानात उतरा अन् ठोकून काढा. ( राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांचा कार्यकर्त्यांना थेट आदेश.)
🟥गुन्हे शाखेच्या पाेलीसांनी किडणी प्रत्याराेपनच्या रँकेटचा केला पर्दाफाश.
( २५ ते ३० लाखाला किडनीची विक्री.)
पुणे :- प्रतिनिधी.
खोटी माहिती देऊन लोकांना लोकसभेला फसवलं. परंतु, आता हे शक्य नाही. कारण खोट हे कधी मोठं होत नसतं. खर हेच मोठ होत असतं. त्यामुळे महाविकास आघाडीचा फुगा लवकरच फुटणार आहे.मी कार्यकर्त्यांना सांगतो तुम्हाला कुणाची परवानगी लागणार नाही. मैदानात उतरा आणि ठोकून काढा असा थेट आदेशच राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिला आहे. ते पुण्यात रविवारी आयोजित केलेल्या भाजपच्या महाअधिवेशनात बोलत होते.दरम्यान, त्यांनी महाविकास आघाडीवर खोटारडे,लबाड लोक आहेत अशी थेट घणाघाती टीका केली.
🛑आज आपण फक्त ग्राऊंडवर राहून चालत नाही. ग्राऊंडवर तर काम करतच आहोत. परंतु, सोशल मीडियावर जर अपडेट नाही राहिल तर लोकांना फसवल जाऊ शकतं. त्यामुळे कार्यकर्त्यांसह लोकप्रतिनिधींनाही विनंती आहे की आपण रोज यावर बोललं पाहिजे. रोज एक पोस्ट अशी करा की हा फेक नरेटीव्ह संपला पाहिजे. तसंच, लोकप्रतिनिधीचीही यावर काही पोस्ट नसते. त्यांनी लक्ष घातलं पाहिजे. कारण ही लढाई फक्त ग्राऊंडवर नाही असंही फडणवीस यावेळी म्हणाले आहेत.
🟥शरद पवारांना प्रश्न
यावेळी बोलताना फडणवीसांनी आरक्षणावरही भाष्य केलं आहे. ते म्हणाले महाराष्ट्रात गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. समाज एकमेकांसमोर उभा आहे. कुणी कुणाशी बोलत नाही. सरकार येतील जातील परंतु, समाजात दुफळी राहिली तर समाज तीन तीन पिढ्या एकत्र येत नाही. त्यामुळे हे थांबलं पाहिजे. तसंच,भाजपचा आरक्षणाला पाठिंबा आहे. गरीब मराठा समाजाला आरक्षण मिळायला हव ही आमची भूमिका आहे. असंही फडणवीस म्हणाले आहेत. तसंच, चारवेळा मुख्यमंत्री राहिलेले शरद पवार मराठा समाजाला आरक्षण का देऊ शकले नाहीत.असा प्रश्नही फडणवीसांनी यावेळी उपस्थित केला आहे.
मराठा आरक्षणचा लढा कधी उभा राहिला. 1982 साली हा लढा उभा राहिला. आण्णासाहेब पाटील यांनी आरक्षणाची मागणी केली. त्यावेळी काँग्रेसचे मुख्यमंत्री होते. त्यांना अण्णासाहेब पाटील म्हणाले, तुम्ही आरक्षण नाही दिलं तर मी जीव देईल. त्यावर ते मुख्यमंत्री म्हणाले नाही. देत जा, त्यानंतर आण्णासाहेब पाटलांना गोळी घालून घेत स्वत: आत्महत्या केली. त्यामुळे मराठा आरक्षणाच पहिला बळी आण्णासाहेब पाटील हे आहेत. तसंच, माझा प्रश्न आहे उद्धव ठाकरे, शरद पवार आणि नाना पटोले यांना. तुम्ही हे जे आंदोलन सुरू आहे.त्यामधील जी ओबीसी आरक्षण देण्याची मागणी आहे.तीला समर्थन आहे का? हे सांगा अस जाहीर आव्हान फडणवीसांनी यावेळी दिलं.
🟥गुन्हे शाखेच्या पाेलीसांनी किडणी प्रत्याराेपनच्या रँकेटचा केला पर्दाफाश.
( २५ ते ३० लाखाला किडनीची विक्री.)
नवी दिल्ली :- वृत्तसंस्था.
दिल्ली पोलीसांच्या गुन्हे शाखेने आणखी एका किडनी प्रत्यारोपणाच्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे.याप्रकरणी गुन्हे शाखेच्या पथकाने ८ आरोपींना अटक केली आहे.हे लोक बनावट कागदपत्रांच्या आधारे दिल्ली, पंजाब, हरियाणा, मध्य प्रदेश आणि गुजरात या देशातील पाच राज्यांमध्ये असलेल्या रुग्णालयांमध्ये अवैध किडनी प्रत्यारोपण रॅकेट चालवत होते. अटक करण्यात आलेल्यांमध्ये टोळीचा म्होरक्या संदीप आर्य आणि त्याचा मेहुणा देवेंद्र झा यांचा समावेश आहे.
🟥संदीप आर्य हे प्रत्यारोपण समन्वयक आहेत. संदीपने ५ राज्यांतील जवळपास ११ खासगी हॉस्पिटलमध्ये ३४ किडनी प्रत्यारोपण केले आहे.यापूर्वी ९ जुलै २०२४ रोजी दिल्ली गुन्हे शाखेच्या पोलीसांनी आंतरराष्ट्रीय किडनी ट्रान्सप्लांट टोळीचा पर्दाफाश केला होता. यामुळे संपूर्ण देशभरात एकच खळबळ उडाली होती.या कारवाई नंतर दिल्लीतील इंद्रप्रस्थ अपोलो हॉस्पिटलच्या डॉ. विजया कुमारी यांच्यासह ७ जणांना अटक करण्यात आली होती.
🔴बनावट कागदपत्रे
अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून ३४ बनावट तिकिटे, १७ मोबाईल,२ लॅपटॉप,९ सिम,१ मर्सिडीझ कार,१.५ लाख रुपयांची बनावट कागदपत्रे आणि रुग्ण किंवा किडनी घेणाऱ्याच्या फाईल्स जप्त करण्यात आल्या आहेत.
🛑२५ ते ३० लाखांना किडनीची विक्री.
विजया कुमारी यांनी नोएडातील एका प्रसिद्ध रुग्णालयात बेकायदेशीररीत्या १५ हून अधिक किडनी प्रत्यारोपण केल्या होत्या. या टोळीशी संबंधित लोक ४ ते ५ लाख रुपयांना किडनी खरेदी करायचे आणि २५ ते ३० लाख रुपयांना विकायचे.त्यामुळे किडनी रॅकेटमध्ये आतापर्यंत एकूण १५ जणांना अटक करण्यात आली आहे.

