Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रमाता-भगिनींच्या प्रेमावर जीव ओवाळून टाकला तरी कमीच.- पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची कृतज्ञता(...

माता-भगिनींच्या प्रेमावर जीव ओवाळून टाकला तरी कमीच.- पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची कृतज्ञता( लाडकी बहीण योजनेची मंजुरीपत्रे व बांधकाम कामगारांना संसारोपयोगी साहित्याचे वाटप.)🛑ग्राहक पंचायत महाराष्ट्रचे कोल्हापूर येथे होणार राज्य अधिवेशन. ( गडहिंग्लज येथे आढावा बैठक संपन्न.)

🛑माता-भगिनींच्या प्रेमावर जीव ओवाळून टाकला तरी कमीच.- पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची कृतज्ञता
( लाडकी बहीण योजनेची मंजुरीपत्रे व बांधकाम कामगारांना संसारोपयोगी साहित्याचे वाटप.)
🛑ग्राहक पंचायत महाराष्ट्रचे कोल्हापूर येथे होणार राज्य अधिवेशन. ( गडहिंग्लज येथे आढावा बैठक संपन्न.)

कागल.‌- प्रतिनिधी

गेल्या ३५-४० वर्षांच्या राजकीय आणि सामाजिक वाटचालीत माता-भगिनींनी अनंत आशीर्वाद दिले आणि प्रेम केले. माता-भगिनींच्या या आशीर्वाद आणि प्रेमावर जीव ओवाळून टाकावा तितका कमीच आहे, अशी कृतज्ञता पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केली. या पुण्याईच्या कवचकुंडलामुळेच आजवरच्या वाटचालीत यशस्वी झालो आणि सुरक्षित राहिलो, असेही ते म्हणाले.
सिध्दनेर्ली ता. कागल येथे मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण योजनेची मंजुरीपत्रे आणि बांधकाम कामगारांना संसार उपयोगी साहित्य वाटप कार्यक्रमात पालकमंत्री श्री. मुश्रीफ बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कागल तालुका संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष व केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैया माने होते. भाषणात मंत्री श्री. मुश्रीफ पुढे म्हणाले, जनतेने दिलेल्या संधीच्या माध्यमातून आजपर्यंत अनेक योजनेच्या माध्यमातून कष्टकरी आणि वंचित घटकांसाठी वैयक्तिक लाभाच्या योजना राबविल्या आहेत. येत्या रक्षाबंधनापर्यन्त लाडक्या बहिनींना रक्षाबंधन भेट देणार आहे. तसेच; शेतमजूर, ड्रायव्हर यांच्यासाठी महामंडळ स्थापन करणारच, असेही ते म्हणाले. आज पर्यंत गोरगरीब जनतेसाठी विविध योजना राबिविल्या आहेत.यापुढे ही अश्या अनेक योजनेच्या माध्यमातून लोकांचे कल्याण करण्याची संधी द्यावी. जलजीवनच्या माध्यमातून करण्यात आलेल्या गावातील कामाची स्तुतीही ह्यावेळी त्यांनी केली.
अध्यक्षस्थानावरून बोलताना प्रताप उर्फ भया माने म्हणाले, हसनसाहेब मुश्रीफ यांच्यासारखा सुख -दुःखात सहभागी होणारा आमदार आपल्याला मिळाला आहे हे आमचे भाग्य आहे. काहीजण गुडघ्याला बाशिंग बांधून बसले आहेत. नक्कल आणि स्टंटबाजी करून आमदार होता येत नाही.
सरपंच दत्तात्रय पाटील म्हणाले, पालकमंत्री मुश्रीफसाहेबांनी आज पर्यन्त केलेल्या विकास कामाचा आणि जनतेसाठी विविध योजनेच्या माध्यमातून केलेला विकास हा फार मोठा आहे. लाडकी बहीण योजनेचा माध्यमातून चालू केलेलं महिलांच्या कल्याणकारी योजनेच्या माध्यमातून येत्या निवडणूकीत त्यांच्या विजयाच्या शिल्पकार ह्या महिलाच असणार आहेत.
भरदुपारी भरपावसात….या कार्यक्रमाची वेळ होती दुपारी तीनची. भरदुपारी आणि मुसळधार भरपावसातही गावातील उपस्थित माता-भगिनींची संख्या मोठ्या प्रमाणात होती. एवढ्या मुसळधार पावसातही कार्यक्रमाला उपस्थिती लावल्याबद्दल श्री. मुश्रीफ यांनी माता-भगिनींचे ऋण व्यक्त केले.

यावेळी केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाला सरपंच दत्ता पाटील, माजी उपसरपंच कृष्णात मेटील, उपसरपंच सौ. वनिता घराळ, मनोहर लोहार, विजय कुरणे, राजू गुरव, तानाजी पाटील, संदीप पाटील, सुभाष मगदूम, विलास पोवार, सागर माने, सौरभ साठे, सौ. वर्षा विनायक आगळे, सौ. रेखा सातापा मगदूम, सौ. कुसुम युवराज मेटील, सौ. रत्नप्रभा राजेंद्र गुरव आदी प्रमुखांसह ग्रामस्थ विशेषत: माता -भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.‌ स्वागत ग्रामपंचायत सदस्या सौ. रत्नप्रभा राजेंद्र गुरव यांनी केले. प्रास्ताविक सरपंच दत्ता पाटील यांनी केले. सूत्रसंचालन विवेक गवळी यांनी केले. आभार युवराज खदरे यांनी मानले.
सिद्धनेर्ली ता. कागल येथे लाडकी बहीण योजना मंजुरीपत्रे व बांधकाम कामगारांना संसारोपयोगी साहित्य वाटप पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते झाले. यावेळी व्यासपीठावर प्रताप उर्फ भैया माने, सरपंच दत्ता पाटील, उपसरपंच सौ. वनिता घराळ, माजी उपसरपंच कृष्णात मेटील व प्रमुख मान्यवर.
सिद्धनेर्ली ता. कागल येथे आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीबद्दल स्थानिक माता-भगिनींनी पालकमंत्री हसनसाहेब मुश्रीफ यांचा मोठा पुष्पहार घालून सत्कार केला. यावेळी व्यासपीठावर प्रताप उर्फ भैया माने, सरपंच दत्ता पाटील, उपसरपंच सौ. वनिता घराळ, माजी उपसरपंच कृष्णात मेटील व प्रमुख मान्यवर.

🛑ग्राहक पंचायत महाराष्ट्रचे कोल्हापूर येथे होणार राज्य अधिवेशन. ( गडहिंग्लज येथे आढावा बैठक संपन्न.)

गडहिंग्लज :- प्रतिनिधी.

येथील साने गुरुजी सहकारी पतसंस्थेमध्ये ग्राहक पंचायत महाराष्ट्रच्या चंदगड,आजरा व गडहिंग्लज उपविभागीय कार्यकारिणीची बैठक संपन्न झाली. या बैठकीत प्रारंभी विभागीय अध्यक्ष शिवाजीराव गुरव यांनी स्वागत केले. ग्राहक पंचायतीचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष श्री बी.जे. पाटील यांनी २४ व २५ ऑगस्ट २०२४ रोजी होत कोल्हापुरात होत असलेल्या राज्यस्तरीय कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराच्या कार्यक्रमाचे नियोजन करण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन करून ग्राहक चळवळ सर्वांच्या पर्यंत पोहोचावी यासाठी ग्राहक चळवळीतला कार्यकर्ता सक्षम व्हावा तसेच ही चळवळ सामान्यांना न्याय द्यावी यासाठी राज्य कार्यकारिणीचे सर्व पदाधिकारी विविध खात्याचे अधिकारी यांचे विशेष मार्गदर्शक लाभणार आहे. अशी माहिती दिली. जिल्हा कोषाध्यक्ष श्री अशोक पोतनीस यांनी ग्राहक चळवळीच्या कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी दोन दिवसीय कार्यशाळा अत्यंत मोलाची आहे. या कार्यशाळेचा लाभ ग्राहक पंचायतीचा कार्यकर्त्यांनी घ्यावा असे आवाहन करून ही कार्यशाळा सर्वांनी एकत्रित येऊन यशस्वीपणे पार पाडण्याचे आवाहन केले. जिल्हा उपाध्यक्ष सुधाकर भदरगे यांनी ग्राहक सेवेतूनच ईश्वरी भक्तीकार्याचा आनंद जपूया. सामाजिक कार्याचा आत्मिक आनंद मिळवूया. तालुक्यात ग्राहकांचे हित जपण्यासाठी ग्राहक मार्गदर्शन सेवा केंद्र सुरू करण्यासाठी विधायक उपक्रम लवकरच सुरू करण्याबाबतचे आवाहन केले व त्यावर सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी जिल्हा कोषाध्यक्ष अशोक पोतनीस यांची विद्युत ग्राहक तक्रार निवारण मंच पदी स्वतंत्र सदस्य म्हणून निवड झाल्याबद्दल ग्राहक पंचायत महाराष्ट्रच्या आजरा, गडहिंग्लज कार्यकारिणीच्या वतीने त्यांचे अभिनंदन करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. या बैठकीत ग्राहक पंचायत गडहिंग्लज तालुका उपाध्यक्ष तानाजी कुराडे यांच्या दिवंगत मातोश्रींना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. या बैठकीस गडहिंग्लज तालुकाध्यक्ष महादेव ढोकरे -पाटील, आजरा तालुका अध्यक्ष सुतार, अनिल शिंदे, सचिन लोहार सुरेश वडराळे आदी उपस्थित होते. आभार तालुका सचिव अनिल कलकुटकी यांनी मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.