🟥शरद पवार-मुख्यमंत्र्यांची तासभर बैठक.- मनोज जरांगे आणि लक्ष्मण हाकेंच्या आंदोलनावर चर्चा.- १५ मिनिटे मराठा आरक्षणावर खलबतं.
🛑 आजरा / हरपवडे गावामध्ये बंद असणारी एसटी. पुन्हा चालू करण्यात प्रवासी संघटनेला यश.
मुंबई :- प्रतिनिधी.

सद्या मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील वातावरण तापले आहे. काही दिवसांपूर्वी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी खासदार शरद पवार यांची भेट घेत सध्या राज्यातील वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला जात आहे. तुम्ही आरक्षणाच्या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी केली होती. विशेष म्हणजे शरद पवार यांनीदेखील या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला होता. त्यांनंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांची मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर पंधरा मिनिटे एकत्रित चर्चा झाली आहे.
🔴एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांच्यात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून 15 मिनिटे चर्चा झाली आहे. या चर्चेत एकनाथ शिंदे यांनी शरद पवार यांना सरकारने मराठा आरक्षणप्रश्नी आतापर्यंत काय प्रयत्न केले, याबाबत माहिती दिली. शरद पवार यांनी याआधी सरकार मनोज जरांगे किंवा लक्ष्मण हाके यांना काय आश्वासन देत आहे याबाबत विरोधी पक्षाला काहीच माहिती नसते असे बोलून दाखवले होते. त्यानंतर आता शिंदे यांनी सरकारने मराठा आरक्षणासाठी आतापर्यंत काय काय केले आहे, याची माहिती शरद पवार यांना दिली आहे. या भेटीनंतर आता विरोधी पक्ष काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
🟥याआधी मराठा आणि ओबीसी आरक्षणासंदर्भात चर्चा करण्यासाठी 9 जुलै रोजी सर्वपक्षीय बैठक बोलवली होती. विरोधी पक्षाने मात्र या बैठकीवर बहिष्कार टाकला होता. सरकार आंदोलकांना काय उत्तरं देतंय, काय आश्वासनं देतंय अशी भूमिका घेतली होती. या बैठकीनंतर पावसाळी अधिवेशनात चांगलीच खडाजंगी झाली होती. विरोधकांनी या बैठकीवर बहिष्कार टाकल्यामुळे सत्ताधारी आमदार आक्रमक झाले होते. त्यानंतर आता एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांच्यात मराठा आरक्षणासंदर्भात चर्चा झाली आहे.
🛑 आजरा / हरपवडे गावामध्ये बंद असणारी एसटी. पुन्हा चालू करण्यात प्रवासी संघटनेला यश.
आजरा.- प्रतिनिधी.

आजरा तालुका प्रवासी संघटनेच्या नेतृत्वाखाली, हरपवडे गावातील ग्रामस्थांनी आज दि. २२ रोजी डेपोमध्ये डेपोमॅनेजर यांना निवेदन देऊन चर्चा करुन हरपवडे या गावी बंद असलेल्या एसटी. पुन्हा चालू करण्यासाठी विनंती केली याबाबत दि. २३ जुलैपासून हरपवडे फाट्यावरून जाणाऱ्या एसटी हरपवडे या गावी चालू कराव्यात व का चालू कराव्यात हे पटवून दिल्यानंतर, डेपो मॅनेजर विजयसिंह शिंदे यांनी व वाहतुक निरीक्षक राजेश मातले यांनी उद्या मंगळवार पासून आम्ही हरपवडे या गावी एसटी चालू करतो असे आश्वासन दिले आहे. यावेळी
आजरा तालुका प्रवासी संघटनेचे अध्यक्ष सचिन इंदुलकर, महेश दळवी, विकास सुतार, हरपवडे गावचे सरपंच सागर पाटील, आदिल मुल्ला, बबन लटम, देवदास गुरव व सह ग्रामस्थ उपस्थित होते.
