Homeकोंकण - ठाणेशिवाजी विद्यापीठाची बनावट प्रमाणपत्रे.- आणखी २ गुन्हे दाखल. (मोठे रॅकेट सक्रीय असल्याचा...

शिवाजी विद्यापीठाची बनावट प्रमाणपत्रे.- आणखी २ गुन्हे दाखल. (मोठे रॅकेट सक्रीय असल्याचा संशय.)🛑रत्नागिरीत पावसाचा कहर.-खेड, राजापूर आणि चांदेराईत पुराचे पाणी शिरले🟥राज्यात पावसाचा हाहाकार.- आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांसह सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आदेश.- मुंबई, कोकण, विदर्भात पावसाचे धुमशान.- जनजीवन विस्कळीत

🛑शिवाजी विद्यापीठाची बनावट प्रमाणपत्रे.- आणखी २ गुन्हे दाखल. (मोठे रॅकेट सक्रीय असल्याचा संशय.)
🛑रत्नागिरीत पावसाचा कहर.-
खेड, राजापूर आणि चांदेराईत पुराचे पाणी शिरले
🟥राज्यात पावसाचा हाहाकार.- आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांसह सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आदेश.- मुंबई, कोकण, विदर्भात पावसाचे धुमशान.- जनजीवन विस्कळीत

कोल्हापूर :- प्रतिनिधी.

शिवाजी विद्यापीठाचा लोगो आणि नावाचा वापर करून बनावट प्रमाणपत्र, गुणपत्रके तयार केल्याच्या दोन फिर्यादी राजारामपुरी पोलिस ठाण्यात शुक्रवारी दि.१९ जुलै रोजी दाखल झाल्या. दिप्ती वसंत गावडे (मूळ रा. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग, सध्या रा. जोगेश्वरी, मुंबई) आणि प्रवीण बाबूराव शेलार (रा. कोकण नगर, चेंबूर, मुंबई) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. बनावट क्रीडा प्रमाणपत्र तयार केल्याची एक फिर्याद गेल्या आठवड्यात दाखल झाली होती.
🛑सावंतवाडी येथील दिप्ती गावडे या तरुणीने एका बँकेत नोकरीसाठी अर्ज केला होता. संबंधित बँकेने गावडे हिची कागदपत्रे तपासणीसाठी शिवाजी विद्यापीठाकडे पाठवल्यानंतर तिच्याकडील बी.कॉम. भाग तीनचे गुणपत्रक, पदवी प्रमाणपत्र आणि स्थलांतर दाखला बनावट असल्याचे चौकशीत स्पष्ट झाले. हा प्रकार २१ जून २०२४ रोजी निदर्शनास आला. याबाबत विद्यापीठातील कर्मचारी प्रल्हाद बाबूराव जाखले (वय ५२, रा. कसबा बावडा) यांनी फिर्याद दिली.

🟥दुस-या घटनेत प्रवीण शेलार याने एका खासगी कंपनीत नोकरीसाठी अर्ज केला होता. त्याची प्रमाणपत्रे तपासणीसाठी विद्यापीठाकडे आल्यानंतर फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला. त्याने बी.कॉम. भाग १, २ आणि ३ चे गुणपत्रक, तसेच पदवीचे बनावट प्रमाणपत्र करून घेतल्याचे चौकशीत निष्पन्न झाले. विद्यापीठाचे नाव आणि लोगोचा गैरवापर केल्याची फिर्याद कर्मचारी दीपक दत्तात्रय अडगळे (रा. मोरेवाडी, ता. करवीर) यांनी राजारामपुरी पोलिस ठाण्यात दिली. बनावट प्रमाणपत्रे तयार केल्याचे तीन गुन्हे आठवडाभरात पोलिसात दाखल झाले, त्यामुळे यात मोठे रॅकेट सक्रीय असल्याचा संशय बळावला आहे.

🔴आणखी एक शिगाव विद्यापीठ?

विद्यापीठाची बनावट प्रमाणपत्रे तयार करून देणारी टोळी शिगाव (ता. वाळवा, जि. सांगली) येथे सक्रीय होती. अनेकदा त्या टोळीवर कारवाया झाल्या. त्यानंतरही बनावट प्रमाणपत्रे तयार केली जात होती. तशीच टोळी पुन्हा सक्रीय झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. याचा पर्दाफाश करण्यासाठी पोलिसांना सखोल चौकशी करावी लागणार आहे.

🛑रत्नागिरीत पावसाचा कहर.-
खेड, राजापूर आणि चांदेराईत पुराचे पाणी शिरले

रत्नागिरी.- प्रतिनिधी.

रत्नागिरीमध्ये जोरदार सरी बरसत असून जिल्ह्याला पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. खेड तालुक्यामध्ये जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून बाजारपेठेत पाणी शिरले आहे. तसेच जिल्ह्यातील अर्जुना, कोदावली आणि काजळी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. अतिमुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात मागील आठवडाभरापासून पावसाचा धुमाकूळ सुरू आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. रत्नागिरी तालुक्यातील काजळी नदीची पाणी पातळी वाढल्याने चांदरेाई पुलावर पाणी आले आहे. तसेच राजापूरातील अर्जुना आणि कोदवली नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने पुराचे पाणी राजापूर शहरातील जवाहर चौकात शिरले. जिल्ह्यातील कोदवली आणि मुचकुंदी या नद्या इशारा पातळीवर वाहत आहेत. तसेच तालुक्यातील काजळी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यामुळे पुलावरून पाणी वाहत आहेत. त्यामुळे आजुबाजुच्या गावांचा संपर्क तुटला आहे. शेतामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने शेतकऱ्यांचे सुद्धा नुकसान झाले आहे. संततधार पाऊस सुरू असल्याने नद्यांची पाणी पातळी वाढून राजापूर शहरात आतापर्यंत तिसऱ्यांदा पुराचे पाणी शिरले आहे.

🟥राज्यात पावसाचा हाहाकार.- आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांसह सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आदेश.- मुंबई, कोकण, विदर्भात पावसाचे धुमशान.- जनजीवन विस्कळीत

मुंबई :- प्रतिनिधी.

राज्यातील बहुतांश भागात सुरू असलेल्या धुव्वाधार पावसाने सर्वत्र एकाच दाणादाण उडवली आहे. काही भागात अतिवृष्टी सदृश्य पावसामुळं जनजीवन विस्कळीत झालं असून ग्रामीण भागासह शहरातील अनेक रस्त्यांना नदी नाल्याचे स्वरूप प्राप्त झालं आहे. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार, आजही राज्यातील बहुतांश भागात मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. तर या पावसाचा सर्वाधिक जोर हा मुंबई, मुंबई उपनगर, कोकणसह विदर्भात बघायला मिळाला असून मुसळधार पावसाचा फटका स्थानिक नागरिकांसह शेतकऱ्यांना देखील बसला आहे. याच अनुषंगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलिस अधिक्षक, राज्यातील सर्व महापालिका आयुक्त आणि आप्तकालिन यंत्रणांच्या प्रमुखांशी चर्चा करून सर्व यंत्रणांना सतर्क रहाण्याचे आदेश दिले आहेत.
🛑मुंबईसह कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये आज मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. त्याचबरोबर इतरही काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे.त्याच पार्श्वभूमीवर एसडीआरएफ, जिल्हा प्रशासन, पोलीस, महापालिका, नगरपालिका आदी विविध स्थानिक स्वराज्य संस्था यांनी सतर्क रहावे आणि नागरिकांना सर्वतोपरी मदत करावी, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत. सोबतच सर्व प्रशासनाने अलर्ट राहावे, हवामान खात्याकडून तसेच आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून परिस्थितीची वेळोवेळी माहिती घेण्यात यावी आणि त्यानुसार नियोजन आणि व्यवस्थापन करावे, अशाही सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.
🟥दुर्घटनेच्या संभाव्य क्षेत्रांचे सर्वेक्षण करावे, नागरिकांना त्याबाबत सतर्क करावे. राष्ट्रीय आपत्ती प्रतिक्रिया दल आणि राज्य आपत्ती प्रतिक्रिया दलाची तयारी उच्च पातळीवरची असावी. बंधारे, तलाव यांचे पाणीस्तर निर्धारित करावेत आणि पुराचा धोका निर्माण होऊ नये, यासाठी नियंत्रित पाण्याचा विसर्ग करण्याची यंत्रणा उपलब्ध करून ठेवावी. अशा सूचनाही यावेळी करण्यात आल्या आहेत. पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास अशा क्षेत्रात वाहतूक बंद करावी आणि ती पर्यायी मार्गावर वळवावी.
🔴हवामान खात्याशी समन्वय साधावा, त्यांच्याकडून देण्यात येणारे विविध अलर्टस् (इशारे), माहिती यासंदर्भात नागरिकांना जलद गतीने अवगत करावे. पूरग्रस्त क्षेत्रात अन्नधान्य, औषधे आणि साह्यकार्य साहित्य उपलब्ध करून ठेवावे. पर्यायी निवारास्थाने आणि राहण्यासाठी ठिकाणे उपलब्ध करून ठेवावीत, पूरस्थिती निर्माण झाल्यास जनावरांच्या स्थलांतराची व्यवस्था तयार ठेवावी, अशा विविध सूचना यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.